Jump to content

"सु.रा. चुनेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०: ओळ २०:
* अंतरंग
* अंतरंग
* जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध
* जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध
* जी.एं. ची निवडक पत्रे (चार खंड, संपादित, सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, [[श्री.पु. भागवत]])
* बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची तसेच समग्र वाङ्मयाची सूची
* बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची तसेच समग्र वाङ्मयाची सूची
* माधव ज्युलियन
* माधव ज्युलियन
* [[माधव जूलिअन]] (मराठी कवी)
* माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन
* माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन
* सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर)
* सूचींची सूची


==संपादन==
==संपादन==

२२:५९, १ एप्रिल २०१९ ची आवृत्ती


प्रा. डॉ. सु. रा. चुनेकर ऊर्फ सुरेश रामकृष्ण चुनेकर (जन्म : २७ एप्रिल १९३६; मृत्यू : १ एप्रिल २०१९) हे मराठी समीक्षक, संपादक आणि मराठी वाङ्मय सूचीकार होते. ते संगमनेर महाविद्यालय येथे तसेच मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे येथे प्राध्यापक होते. एम. ए. च्या परीक्षेत ते मराठी-संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांच्या पीएच. डी. प्रबंधास १९६३-६४ साली पारितोषिक मिळाले. त्यांनी विविध ग्रंथ संपादित केले असून अनेक वाङ्ममयीन नियतकालिकांत संशोधनपर व समीक्षात्मक लेखन केले आहे. ते 'मराठी विश्वकोश', 'मराठी वाङमयकोश' यांचे लेखक होते.' मराठी संशोधन पत्रिके' चे ते संपादक होते.[] शिक्षण प्रसारक संस्थेच्या 'दर्शन' या ग्रंथाचे ते मुख्य संपादक होते.[][]

साहित्य संशोधनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणारी ‘सूचीनिर्मिती’ ही अभ्यासकांसाठी मोठीच सोय असते आणि अशा अनेक सूचींची सूची तयार करण्याचे महत्त्वाचे काम चुनेकर यांनी केले. सुमारे पावणेसातशे सूचींमधून किमान तीस-पस्तीस हजार नोंदी संकलित करून एक मौलिक संदर्भसाहित्य त्यांनी उपलब्ध करून दिले.

शिक्षण

  • बी. ए. १९५६ : स. प. महाविद्यालय, पुणे
  • एम ए. १९५८ : पुणे विद्यापीठ, पुणे
  • पीएच. डी. १९६३ : पुणे विद्यापीठ, पुणे

कारकीर्द

  • प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
  • प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
  • मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन

लेखन

  • अंतरंग
  • जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध
  • जी.एं. ची निवडक पत्रे (चार खंड, संपादित, सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत)
  • बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची तसेच समग्र वाङ्मयाची सूची
  • माधव ज्युलियन
  • माधव जूलिअन (मराठी कवी)
  • माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन
  • सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर)
  • सूचींची सूची

संपादन

  • जी.एं.ची निवडक पत्रे; खंड ३ व ४ (सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत)
  • 'समग्र माधव ज्यूलियन' - संकलन व संपादन (सहसंपादक : प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले)[]
  • सूचीची सूची
  • माडगांवकरांचे संकलित वाड्मय (संपादित; सहसंपादक - स.गं. मालशे)

पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट प्रबंध : अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई विद्यापीठ[]
  • राज्य पुरस्कार, १९७४-७५ : माधवराव पटवर्धन : वाङमयदर्शन

संदर्भ

  1. ^ a b "दर्शन" ग्रंथ, पान ४९, संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिण्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा.ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय्&ZWBJ;ज ॲडव्हरटायझिंग, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-
  2. ^ Dutt, Kartik Chandra (1999). (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. p. 256. ISBN 9788126008735 https://books.google.co.in/books?id=QA1V7sICaIwC&pg=PA256&lpg=PA256&dq=Suresh+Ramakrishna+Chunekar&source=bl&ots=i0n553VOGb&sig=2hmDP3eHw4jmURTjA5FfcEI7Zkc&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwioupLrqYnaAhUBbo8KHaeGAS0Q6AEIJjAA#v=onepage&q=Suresh%20Ramakrishna%20Chunekar&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8
  4. ^ http://liveweb.archive.org/web/20121110084010/http://esakal.com/esakal/20090927/5466968332314581685.htm