"महानुभाव साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* १२वे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन गुजरातेतील भरूच येथे दि. १६ व १७ फेब्रुवारी २०१४ या दिवशी आयोजित करण्यात आले होते.{{दुजोरा हवा}} (हे संमेलन खरोखरीच झाले?) |
* १२वे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन गुजरातेतील भरूच येथे दि. १६ व १७ फेब्रुवारी २०१४ या दिवशी आयोजित करण्यात आले होते.{{दुजोरा हवा}} (हे संमेलन खरोखरीच झाले?) |
||
* १३वे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन नाशिकमधील डोंगरे वसतीगृहात ८-९ मे २०१४ रोजी झाले. अध्यक्षस्थानी महंत बिडकरबाबा होते. |
* १३वे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन नाशिकमधील डोंगरे वसतीगृहात ८-९ मे २०१४ रोजी झाले. अध्यक्षस्थानी महंत बिडकरबाबा होते. |
||
* अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाच्यावतीने जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर २०१८ या काळात दरम्यान १२ वे साहित्य संमेलन होणार आहे, संमेलनाध्यक्ष डाॅ. आ.ह. साळुखे |
|||
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[महदंबा साहित्य संमेलन]] |
पहा : [[साहित्य संमेलने]]; [[महदंबा साहित्य संमेलन]] |
२१:२८, १५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
हे संमेलन राष्ट्रीय महानुभाव साहित्य संमेलन नावानेही भरते. आत्तापर्यंत झालेली महानुभाव साहित्य संमेलने :
- महानुभाव साहित्य, शिक्षण,संशोधन प्रतिष्ठानचे आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे भरले होते. आचार्य भानुकवी साहित्य नगरीत भरलेले हे संमेलन उत्साहात पार पडले या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके सर होते यावेळी महंत बाभुळगावकरशास्त्री यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- १९ डिसेंबर २०१०, ठाणे, संमेलनाध्यक्ष : लातूरचे गोविंदराजबाबा बिडकर
- अचलपूर येथे कृषि उत्पन्न बाजार समिती प्रांगणात १७-१८-१९ सप्टेंबर २०१२ या दरम्यान झालेल्या दहाव्या अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वैद्यराजबाबा यक्षदेव होते. अमेरिकेच्या महानुभाव साहित्य संशोधिका डॉ. ॲनफेल्ड हाऊस संमेलनाला उपस्थित होत्या. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आमदार बच्चू कडू, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, खासदार अडसूळ, राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार सुलभाताई खोडके, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, आमदार प्रवीण पोटे, प्रा. पुरुषोत्तम नागपुरे, अचलपूरचे नगराध्यक्ष अरुण वानखडे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई आदी मान्यवरही होते.,
त्यावेळी बोलताना श्री भुजबळ म्हणाले, "बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे [[चक्रधर स्वामी|चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. हातामध्ये समाजाची सूत्रे असणार्यांनी त्यांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले. चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणार्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रांत दिसून येत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील समतेची तत्त्वे ही तथागताच्या, श्री चक्रधरांच्या, महात्मा फुलेंच्या सामाजिक तत्त्वाशी थेट जाऊन भिडतात. श्री चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते."
मी चक्रधर स्वामींच्या सामाजिक क्रांतीतील एक शिपाई म्हणून येथे उपस्थित झालो आहे, अशी सुरुवात पाणीपुरवठा मंत्री प्रा. ढोबळे यांनी केली. ते म्हणाले, "चक्रधर स्वामींनी आपल्या अनुयायांना उपदेश करताना ’दुसर्याचा देव म्हणूनी काय दगडे हाणावा', असे सांगून पंथामध्ये धार्मिक सहिष्णुता व वैचारिक समतेचा पायंडा पाडला. श्री स्वामींचे साहित्य समाजातील सर्वस्पर्शी विचारांचे प्रतिबिंब आहे. बाराव्या शतकाच्या काळात पंथीय कार्यात स्त्री व शूद्रांना त्यांनी समाविष्ट केले. हे आरक्षणाचे तत्त्व मांडणारे एक सर्वव्यापी, सामाजिक समतेचे सर्वोत्तम तत्त्व होते. म्हणून धर्माच्या, जातीच्या नावावर आजवर आपली पोळी शेकणार्यांनी ते दूर ठेवले. "धूपम् दीपम् समर्पयामि', अशी मंत्रोक्ती करणार्यांनी नासके नारळ देवाला व चांगले खोबरे स्वतःकरिता ठेवले. या प्रवृत्तीनेच आपला धर्म नासविला याची खंत वाटते."
त्यावेळी हिराईसा पाठावर आधारित प्रा. पुरुषोत्तम नागपुरे, उपाख्य पुरुषोत्तमदादा कारंजेकर यांनी संपादन केलेल्या "लीळाचरित्र'च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशनही भुजबळ यांच्या हस्ते पार पाडले. सुबोध हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी संजय ठाकरे यांच्या नेतृत्वात "पुत्रम् विशाल देवस्थ तानवा अनंत नायकम्' या महानुभवीय सूत्रपाठेतील वचनानंतर मान्यवरांचे स्वागत करणारे स्तवन करण्यात आले. रतन चव्हाण यांच्या गीताला संजय ठाकरे व अशोक ठाकरे यांनी स्वरसाज चढविला होता. यावेळी "लीळाचरित्र' ग्रंथाची पालखी काढण्यात आली. कार्यक्रमाला प्रभाकरशास्त्री जिंतूरकर, डॉ. सुरेश ठाकरे, राधेराजबाबा पालीमकर, विजय काळे, अजय उभाड, प्रकाश घोम, रमा प्रकाश घोम, गजानन भोरे, प्रताप अभ्यंकर, ॲड. मधुकर सोनोने, विलास काशीकर, बाबूराव गावंडे, रामेश्वर अभ्यंकर, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, प्रकाश घोम, डॉ. अशोक राऊत, गजानन लहाने, डॉ. प्रमोद गोरडे, अनिरुद्ध पाटील, डॉ. अण्णासाहेब अडसोड, विनोद खेरडे आदी उपस्थित होते.
- बुलडाणा जिल्ह्यातील महानुभाव क्षेत्र जाळीचा देव परिसरात झालेल्या ११व्या महानुभाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यु.म. पठाण होते. हे संमेलन १५ ते १७ फेब्रुवारी २०१३ या तारखांना झाले. या महानुभाव साहित्य संमेलनासाठी महानुभावपंथीय संत महंत, अभ्यासक, संशोधक संमेलनाला उपस्थित होते. संमेलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी संमेलनाध्यक्ष डॉ. यु.म. पठाण यांचे अध्यक्षीय भाषण झाले. शनिवारी (ता.१६) दुपारी प्रमुख महानुभावी महंतांची "संतपीठ व महानुभाव पंथ' या विषयावर चर्चा झाली. या प्रसंगी पैठण येथील संतपीठाचे पीठाचार्य बोधले महाराज यांची विशेष उपस्थिती होती. शिवाय या संमेलनात परिसंवाद, युवा संमेलन, महानुभव महंतांना पुरस्कार व महंती प्रदान आदी कार्यक्रम झाले.
- १२वे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन गुजरातेतील भरूच येथे दि. १६ व १७ फेब्रुवारी २०१४ या दिवशी आयोजित करण्यात आले होते.[ दुजोरा हवा] (हे संमेलन खरोखरीच झाले?)
- १३वे अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन नाशिकमधील डोंगरे वसतीगृहात ८-९ मे २०१४ रोजी झाले. अध्यक्षस्थानी महंत बिडकरबाबा होते.
- अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाच्यावतीने जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर २०१८ या काळात दरम्यान १२ वे साहित्य संमेलन होणार आहे, संमेलनाध्यक्ष डाॅ. आ.ह. साळुखे