Jump to content

"अश्विनी धोंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
त्यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत 'अजुनी चालतेची वाट' ह्या सदराचे लेखन २०१५ मध्ये वर्षभर केले.
त्यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत 'अजुनी चालतेची वाट' ह्या सदराचे लेखन २०१५ मध्ये वर्षभर केले.
लँग्वेज अँड जेन्डर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात त्यांच्या एका कवितेचा समावेश करण्यात आला आहे.
लँग्वेज अँड जेन्डर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात त्यांच्या एका कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

अश्विनी धोंगडे या सासवड येथे २०१८ साली भरलेल्या २१व्या [[आचार्य अत्रे साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्ष होत्या.


==पुस्तके==
==पुस्तके==

२२:४३, २८ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

अश्विनी रमेश धोंगडे (जन्म: २१ जानेवारी, १९४७,पुणे) एक मराठी स्त्रीवादी लेखिका आहेत. त्‍यांनी तीन कविता संग्रह, सहा कादंबऱ्या, दोन प्रवास वर्णने, तीन टीकात्मक लेखसंग्रह, लहान मुलांसाठी १५-२० बालपुस्तके आणि इतर विषयावर १९ पुस्तके लिहिली आहेत. एम.ए. (इंग्रजी) झाल्यावर १९७१ पासून त्यांनी एस.एन.डी.टी. महाविद्यालयात इंग्लिशच्या प्राध्यापिका म्हणून काम केले. पुढे ‘जाहिरातींची भाषाशैली’ (Linguistic Analysis of Commercial Display Advertisements) या विषयात डॉक्टरेट केली. तसेच इंग्रजीची प्रबंध मार्गदर्शक व परीक्षक म्हणून काम केले.

अश्विनी धोंगडे या कथालेखक द.के. बर्वे यांच्या कन्या होत. वडील हे लेखक आणि दिलीपराज प्रकाशनचे मालक असल्याने अनेक लेखकांचे त्यांच्या घरी जाणे येणे असे. धोंगडे पाचवी ते सहावीत असताना त्यांनी लिहिलेल्या कविता आणि लेख नववी आणि दहावीच्या मुलांना वाचून दाखविले जात असत. महाविद्यालयात असताना त्यांनी दोन दैनिकांसाठी लेख लिहिले.

अश्विनी धोंगडे उत्तर कोरियात एका शिष्टमंडळाच्या सभासद म्हणून गेल्या होत्या. त्यावर त्यांनी 'देशांतर' हे प्रवास वर्णन लिहिले तसेच फिनलंडच्या प्रवासावर त्यांनी मध्यरात्रीच्या सूर्याचा देश हे पुस्तक लिहिले.

अश्विनी धोंगडे यांनी लिहिलेल्या 'स्त्रीवादी स्वरूप आणि उपयोजना' या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे.

त्यांनी अनेक ठिकाणे स्त्रियांचे प्रश्न आणि स्त्रियांचा दर्जा याबद्दल २०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत 'अजुनी चालतेची वाट' ह्या सदराचे लेखन २०१५ मध्ये वर्षभर केले. लँग्वेज अँड जेन्डर या अमेरिकन पाठ्यपुस्तकात त्यांच्या एका कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

अश्विनी धोंगडे या सासवड येथे २०१८ साली भरलेल्या २१व्या आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.

पुस्तके

  • अन्वय (कवितासंग्रह)
  • अपौरुषेय (कवितासंग्रह)
  • घरकोंबडा
  • जगणे व्हावे सुंदर म्हणुनी (ललित)
  • जास्मिन (रूपांतरित कादंबरी)
  • देशांतर (प्रवास वर्णन)
  • पाषाण पुरुष (अनुवादित कादंबरी; मूळ -वॉशिग्टन स्क्वेअर)
  • बाई डॉट कॉम (स्त्रीविषयक)
  • बायकांविषयी बरेच काही (स्त्रीविषयक)
  • बाळंतपण : बोल अनुभवांचे (सव्वाशे स्त्रियांच्या अनुभवांचे सांस्कृतिक संचित)
  • बिलंदर, बारीकराव आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • मध्यरात्रीच्या सूर्याचा देश - फिनलंड (माहितीपर, प्रवास वर्णन)
  • मनस्वी (कथासंग्रह)
  • मराठी भाषा आणि शैली (सहलेखक - डॉ. रमेश धोंडगे)
  • मार्टिन ल्युथर किंग ... अमेरिकेतील दलित-शोषित कृष्णवर्णीय समा ...वर्तमान
  • यशच्या कल्पक कथा (बालसाहित्य)
  • सडकछाप (अनुवादित मूळ इंग्रजी लेखक - मेहेर पेस्तनजी
  • संदर्भ स्त्री पुरुष (माहितीपर) ...
  • सुदर्शना आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • स्त्रीवादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजन (स्त्रीविषयक)
  • स्त्री-सुप्‍त (कवितासंग्रह)
  • स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) (व्यक्तिचित्रण)
  • होरपळ आणि स्पर्श (कादंबरी)

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासन: मराठी वाड्.मय निर्मितीला राज्यपुरस्कार, उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी, कवी केशवसुत पारितोषिक: स्त्रीसूक्त १९८८-८९
  • महाराष्ट्र साहित्य परिषद श्रेष्ठता पारितोषिक: कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार: स्त्रीसूक्त १९८८
  • महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे: 'गदिमा' साहित्य पुरस्कार: अपौरुषेय १९९९
  • श्री. यशवंतराव चव्हाण मित्रमंडळ: कवितासंग्रहासाठी पुरस्कार: स्त्रीसूक्त १९८९
  • उत्कृष्ट समीक्षेसाठी महाबँक पुरस्कार: मराठी भाषा आणि शैली १९८८
  • मराठी बालकुमार साहित्य संमेलन: आजचे बालसाहित्य: प्रथम पुरस्कार
  • लोकहितवादी मंडळ, नाशिक: सर्वोत्कृष्ट एकांकिका: ये रे घना
  • सर्वोत्कृष्ट एकांकिका: युगवाणी नागपूर: अनुत्तरित
  • बंधुता प्रतिष्ठान: प्रेरणा पुरस्कार १९९९
  • डॉ. हेमंत इनामदार आदर्श शिक्षक पारितोषिक
  • भगिनी निवेदिता प्रतिष्ठान: शारदा पुरस्कार: देशांतर साठी
  • दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार: यशच्या कल्पक कथा: मराठी बालकुमार साहित्य संमेलन २००३
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान: यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मार्च २००४
  • लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार: साहित्य परिषद: संदर्भ स्त्री पुरुष २००६
  • बाबुराव शिरोळे पारितोषिक: साहित्य परिषद २००८
  • प्रणव प्रतिष्ठान पुरस्कार, श्रीपूर (सोलापूर)
  • न.चिं. केळकर पारितोषिक- मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे
  • कमल व के.पी.भागवत पारितोषिक: स्त्रीविषयक ग्रंथ - बायकांविषयी बरेच काही
  • साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझ - बालकथांसाठी पारितोषिक: सुदर्शना आणि इतर कथा
  • डॉ.वि.भि.कोलते समीक्षामित्र- ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार: बायकांविषयी बरेच काही
  • डिसेंबर २०१७मध्ये होणार्‍या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात अश्विनी घोंगडे यांना पुरस्कार मिळणार आहे.

संदर्भ

[]

  1. ^ http://ashwinidhongde.com अधिकृत संकेतस्थळ