द.के. बर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. दत्तात्रेय केशव बर्वे (७ एप्रिल, इ.स. १९१७ - २४ डिसेंबर १९८१) हे एक मराठी कथालेखक आणि बालसाहित्यकार होते. लेखिका अश्विनी धोंगडे या त्यांच्या कन्या होत. बर्वे काही वर्षे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल (नानावाडा) या शाळेत मराठीचे शिक्षक होते.

त्यांनी दिलीपराज प्रकाशन ही पुण्यातील पुस्तक प्रकाशन संस्था चालविली होती.

अधिक माहिती[संपादन]

प्रा. द. के. बर्वे यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१७ रोजी बेळगाव येथे झाला. बी. ए. व एम. ए.चे त्यांचे शिक्षण मराठी प्रमुख विषय घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयात  व पुणे विद्यापीठात झाले. बी. एड. बेळगाव इथून शिक्षण महाविद्यालयातून केले. न्यू इंग्लिश स्कूल नानावाडा आणि नंतर टिळक रोड या शाळेत त्यांनी मराठीचे नामवंत शिक्षक म्हणून नाव कमावले. त्यानंतर विवेकानंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमधून उस्मानाबाद, तासगावकोल्हापूर इथे त्यांनी मराठीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला.

बेळगावच्या सुप्रसिद्ध सरदार हायस्वूलमध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांचे शालेय शिक्षण झाल्यामुळे त्यांचे इंग्रजीही उत्तम होते, त्याची साक्ष वोरा आणि वंâपनीने त्यांच्याकडून शेक्सपिअरच्या अनेक नाटकांवरून कुमारांसाठी करून घेतलेल्या कादंबरिकांवरून येईल. प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी ‘निवडक नवनीत’ व वामन मल्हारांच्या आश्रमहरिणीच्या समीक्षेचे ‘आश्रमहरिणीचे अंतरंग’ ही पुस्तके लिहिली. त्या वेळचे सुप्रसिद्ध व्हिनस प्रकाशनचे स. कृ. पाध्ये यांनी ती छापली आणि बर्वे यांनी अधिक समीक्षालेखन करावे, असे सुचवले; पण त्यांचा खरा पिंड सर्जनशील लेखकाचा होता.

सन १९५० मध्ये आंबटषौक हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली. गुलछबू, पुâलराणी, गोड गुपित, देशासाठी दर्यापार, बोलका मासा, चंद्रावर ससा, किती वाजले, नन्नी, छबुकड्या गोष्टी, डॉक्टर पोटफोडे ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली काही पुस्तके आहेत. त्यातली काही पुस्तके समर्थ प्रकाशन— वा. रा. ढवळे यांनी काढली, तर नंतर बर्व्यानी स्वतः सुरू केलेल्या दिलीपकुमार प्रकाशनाने काही पुस्तके काढली.

महाराष्ट्र शासनाने नवसाक्षर प्रौढांसाठी काही पुस्तके लिहून घेण्यासाठी महाराष्ट्रातील मान्यवर लेखकांचे एक निवासी शिबिर भोर येथे भरवले होते. त्यात भाऊंनी लिहिलेले ‘गणूचा गाव’ हे पुस्तक महाराष्ट्रभर ग्रामीण भागात सर्वदूर पोचले. ही कादंबरी इतकी पकड घेणारी होती की, पुढे राष्ट्रीय स्तरावर लखनौ येथे भरलेल्या लेखक शिबिरातून त्यांची व प्रसिद्ध कादंबरीकार वि. वि. बोकील यांची निवड झाली.

सेवानिवृत्तीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बर्व्यांनी पुण्यात प्रकाशनव्यवसाय सुरू केला. सन १९७१ मध्ये दिलीपराज प्रकाशन संस्थेची सुरुवात रविवार पेठेतील बर्व्यांच्या राहत्या घरीच झाली. त्यांनी अगडबंब राक्षस, पिपातला राक्षस, माकडबाळ, चिव चिव चिमणी वगैरे लहान मुलांसाठी पुस्तके लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली, पण त्यात त्यांचा जीव आता रमेना. लेखनाची उर्मी, आयुष्यभरातले कडू-गोड अनुभव गाठीला आणि जात्याच असलेली प्रतिभा यांच्या जोरावर त्यांनी १९८०-८१ या दोन वर्षांत पुट्टी, पोकळी व पंचवेडी या तीन कादंबNया लिहिल्या. साहित्य परिषदेच्या सभागृहात त्यांचे प्रकाशन समारंभही झाले.

बालपणापासूनचे त्यांचे जिवलग मित्र बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती रावसाहेब बा. म. गोगटे यांचे चरित्र लिहिण्याचा घाट त्यांनी घातला आणि मुंबई, बेळगाव, पुणे अशा त्यांच्या वारया सुरू झाल्या. हे चरित्र सर्वतोपरी उत्कृष्ट व्हावे, असा त्यांचा ध्यास होता. त्याचा ताण नकळतपणे त्यांच्यावर आला की काय नकळे, पण पुस्तक छापून होण्यापूर्वी केवळ दोन दिवस आधी २४ डिसेंबर १९८१ रोजी झोपेत हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा दुःखद अंत झाला. दि. १२ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ ठरला होता, तो त्यांच्या आठवणी काढत पार पडला. रणजित देसार्इंनी त्या वेळी काढलेले भावोद्गार.

‘‘लेखक या नात्याने मी सांगू इच्छितो की, दत्तोपंतांनी अत्यंत सुंदर भावकाव्य निर्माण वेâले आहे. एक ज्येष्ठ ग्रंथकार मराठीत अवतरला आहे— रूपाने आणि गुणानेही!’’

पुस्तके[संपादन]

  • अगडबंब राक्षस (बालसाहित्य)
  • आंबट-षोक (कथासंग्रह)
  • खादाडवाडीचा राक्षस (बालसाहित्य)
  • गुलछबू (बालसाहित्य)
  • गोड गुपित (बालसाहित्य)
  • चिमुताई चिमुताई दार उघड व इतर कथा (बालसाहित्य)
  • डाॅ. पोटफोडे (बालसाहित्य)
  • दुर्वांकुर (संपादित, गणपतीचे २१ श्लोक) (बर्व्यांनी हे पुस्तक दत्तमाधव या टोपणनावाने लिहिले आहे.)
  • देशासाठी दर्यापार-कांहीं तरी नवेंच करा (बालसाहित्य)
  • नन्नी (कथासंग्रह)
  • निवडक नवनीत (संपादित कवितासंग्रह)
  • पंचवेडी (कथासंग्रह)
  • पिपातला राक्षस (बालसाहित्य)
  • पुष्पमाला (संपादित)
  • पोकळी (कथासंग्रह)
  • मिटुकल्या गोष्टी (बालसाहित्य)
  • लगीन करतो उंदिरमामा (बालसाहित्य)
  • शंभू आणि शारी (बालसाहित्य)
  • सागरमेघ (उद्योगपती बा.म. गोगटे यांचे चरित्र)