"विजय सुरवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ८: ओळ ८:


महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती'च्या फोटो अल्बम व पत्रव्यवहार खंड प्रकाशन समितीचे सदस्य होते.
महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती'च्या फोटो अल्बम व पत्रव्यवहार खंड प्रकाशन समितीचे सदस्य होते.
* ''समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' – प्रकाशन: लोकवाङमय गृह 
==लेखन==
*
''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे : भाग पहिला'', प्रकाशन: लोकवाङमय गृह<ref>http://www.akshardhara.com/en/phule-ambedkar-books/22119-Dr-Babasaheb-Ambedkaranchi-Nivadak-Bhashane-Part--1-Vijay-Survade-Lokvangmay-Gruha-buy-marathi-books-online-at-akshardhara-9788188284009.html</ref>
* ''पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर'' (खंड १ व २)

==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

०७:३८, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

विजय सुरवाडे (जन्म: ३० जून १९५६) मराठी लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक व संग्रहक आहेत. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांची त्यांचा संबंध असून जागतिक किर्तीच्या अग्रणी वित्तिय संस्थेत प्रबंधक या पदावर ते कार्यरत आहेत.

सुरवातीचे जीवन व शिक्षण

जळगाव जिल्ह्यातील भूसावळ येथे ३० जून १९५६ रोजी एका गरीब कुटुबांत त्यांचा जन्म झाला. भूसावळ, चाळीसगाव, ठाणे, मुंबई येथून त्यांनी शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. (स्पे. इकॉनॉमिक्स) पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.

कारकीर्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व चळवळींचा इतिहास हा त्यांचा आवडीचा, जिव्हाळ्याचा व सदैव संशोधनाचा विषय आहे, या व्यासगांतून फुले-आंबेडकर चळवळीसंबंधीचे ग्रंथ, मूळ छायाचित्रे, पत्रे, संबधित संदर्भ आदी दुर्मिळ अस्सल दस्तावेजांचा समृद्ध वैयक्तीक संग्रह तयार केला. डॉ. आंबेडकर जीवन व चळवळीवर लेखन किंवा संशोधन करणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना विजय सुरवाडे सहकार्य व मार्गदर्शन करतात.

चरित्रकार धनंजय कीर यांच्या 'कृतज्ञ मी कृतार्थ मी' व डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्राचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 'डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती'च्या फोटो अल्बम व पत्रव्यवहार खंड प्रकाशन समितीचे सदस्य होते.

  • समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रकाशन: लोकवाङमय गृह 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे : भाग पहिला, प्रकाशन: लोकवाङमय गृह[१]

  • पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर (खंड १ व २)

संदर्भ