"पतंगराव कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ५: | ओळ ५: | ||
==कार्य== |
==कार्य== |
||
डॉ. पतंगराव कदम यांनी केवळ विशीत असताना १९६४ मध्ये पुण्यतल्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. ते भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे नुसतेच संस्थापक नसून कुलगुरू देखील होते. |
डॉ. पतंगराव कदम यांनी केवळ विशीत असताना १९६४ मध्ये पुण्यतल्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. ते भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे नुसतेच संस्थापक नसून कुलगुरू देखील होते. स्थापनेनंतरच्या ५३ वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस आहेत, त्यांत दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये नवी दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान या विषयांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. भारती विद्यापीठ ही भारतातलया नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश: साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना पतंगरावांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले. |
||
* डॉ. कदम काॅंग्रॆस पक्षातर्फे महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून गेले होते.<ref>[http://marathi.vishwajeetkadam.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8+/default.aspx]</ref> |
* डॉ. कदम काॅंग्रॆस पक्षातर्फे महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून गेले होते.<ref>[http://marathi.vishwajeetkadam.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8+/default.aspx]</ref> |
||
* डॉ. कदम |
* डॉ. कदम याणी स्थापन केलेल्या संस्थांमध्यॆ सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड (भारती सहकारी) बँक, पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे. |
||
* |
|||
* नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान या विषयांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
२२:३७, १० मार्च २०१८ ची आवृत्ती
पतंगराव कदम (जनम : सोनसळ-सांगली, ८ जानेवारी, इ.स. १९४४; मृत्यू : मुंबई, – ९ मार्च इ.स. २०१८) हे मराठी राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील वने, मदत व भूकंप पुनर्वसन मंत्री होते.
बालपण आणि शिक्षण
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आणि काहीशा दुर्गम भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला आणि 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली. १९६१ मध्ये ते पुण्यात आले. 'रयत'च्याच एका हायस्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. काही काळाने त्यांनी '१९८० च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या' या विषयावर डॉक्टरेट मिळविली.
कार्य
डॉ. पतंगराव कदम यांनी केवळ विशीत असताना १९६४ मध्ये पुण्यतल्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. ते भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे नुसतेच संस्थापक नसून कुलगुरू देखील होते. स्थापनेनंतरच्या ५३ वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस आहेत, त्यांत दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये नवी दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान या विषयांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. भारती विद्यापीठ ही भारतातलया नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश: साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना पतंगरावांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले.
- डॉ. कदम काॅंग्रॆस पक्षातर्फे महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून गेले होते.[१]
- डॉ. कदम याणी स्थापन केलेल्या संस्थांमध्यॆ सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड (भारती सहकारी) बँक, पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे.
पुरस्कार
त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” हे होत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |