"उर्वशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
उर्वशी पुढे पुरूरव्याची पत्नी झाली. ही कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका आहे. |
उर्वशी पुढे पुरूरव्याची पत्नी झाली. ही कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका आहे. |
||
[[महाभारत|महाभारतात]] वनपर्वात [[अर्जुन]] व [[उर्वशी|उर्वशीमधील]] संवाद येतो. [[उर्वशी]] ही कुरुवंशातील राजा [[पुरूरवा|पुरुरव्याची]] पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरूरव्याचा वंशज असल्याने, कामातुर [[उर्वशी]]चा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर [[उर्वशी]] सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरूरव्याची मुले-नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर." |
|||
अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन [[उर्वशी]] त्याला शाप देते. हा शाप पुढे [[अर्जुन#बृहन्नडा|बृहन्नडेच्या]] रूपाने खरा ठरतो. |
|||
[[वर्ग:अप्सरा]] |
[[वर्ग:अप्सरा]] |
२३:३८, ३० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील सर्वात सुंदर गणली जाणारी अप्सरा होती.
जन्म
हिंदू पौराणिक कथांनुसार नर व नारायण हे हिमालयात उग्र तपश्चर्येला बसले होते. त्यांच्या तपश्चर्येने आपले इंद्रपद डळमळते आहे अशी भीती वाटल्याने इंद्राने आपल्या दरबारातील अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा कावा लक्षात आल्याने संतापलेल्या या ऋषींनी आपल्या मांडीवर थाप मारली व त्यातून इंद्राच्या दरबारातील इतर अप्सरांपेक्षा अतीव सुंदर असणार्या उर्वशीचा जन्म झाला. (संस्कृतात 'उरू' म्हणजे मांडी.) तिचे स्वर्गीय सौंदर्य पाहून इंद्राने पाठवलेल्या अप्सरांचे गर्वहरण झाले आणि त्या लाजेने चूर झाल्या. स्वतः इंद्राने नर व नारायणांची क्षमा मागितली. या ऋषींनी राग विसरून उर्वशीला इंद्राच्या दरबारात पाठवले.
उर्वशी पुढे पुरूरव्याची पत्नी झाली. ही कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका आहे.
महाभारतात वनपर्वात अर्जुन व उर्वशीमधील संवाद येतो. उर्वशी ही कुरुवंशातील राजा पुरुरव्याची पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरूरव्याचा वंशज असल्याने, कामातुर उर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर उर्वशी सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरूरव्याची मुले-नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर."
अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन उर्वशी त्याला शाप देते. हा शाप पुढे बृहन्नडेच्या रूपाने खरा ठरतो.