"भोई समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
दुवे |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''भोई समाज''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], [[रत्नागिरी]] जिल्हे व इतरत्र आढळतो. मासेमारी हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात. तर घाटावरचे भोई गोड्यापाण्यात म्हणजे नदी, तलाव |
'''भोई समाज''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[मुंबई]], [[ठाणे]], [[रायगड]], [[रत्नागिरी]] जिल्हे व इतरत्र आढळतो. मासेमारी हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात. तर घाटावरचे भोई गोड्यापाण्यात म्हणजे नदी, तलाव इत्यादीमध्ये मासेमारी करतात. भोई समाजातील सर्व रीती, परंपरा ह्या कोळ्यांप्रमाणेच आहेत. |
||
मासळी विक्रीच्या व्यवसायात भोई समाजाचा पूर्वापार मोठा सहभाग असला, तरी आता हे प्रमाण २५ टक्के इतके झाले आहे. त्याला कारणे देखील अनेक आहेत. पुणे शहरात या समाजाची सुमारे चार हजार घरे असल्याचे समजले. पूर्वी कसबा पेठेत केंद्रित असलेला हा समाज, शहर विकासाबरोबर आणि मुख्यत्वे पानशेत पुरानंतर पर्वती, लक्ष्मीनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर आणि पौड रोड परिसरात विखुरला गेला. शिक्षण आणि रोजगाराच्या उपलब्धीमुळे विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आणि अनेकांनी परंपरागत व्यवसाय सोडून विविध क्षेत्रांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. प्रशासन, व्यापार, वकिली, वैद्यकीय, साहित्य, कला अशा क्षेत्रात या मंडळींनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या अन्य भटक्या जमाती या प्रवर्गात, तर केंद्र शासनाच्या ओबीसी इतर मागासवर्गीय या विभागात हा समाज समाविष्ट आहे. या सोयीसवलतींचा लाभ घेऊन काही जणांनी निश्चितच विकास साधला असला तरी बहुसंख्य समाज २०१७ सालातही वंचित आणि उपेक्षित अाहे |
|||
समस्त भोई पंच मंडळी ही समाजाची शिखर संस्था आहे. राज, परदेशी, कहारू, पालेवार, नावाडी, दुराया, झिंगा, मच्छिंद्र, जालिया या आणि अशा एकूण २६ उपजाती या समाजात आहेत. धार्मिक विधी, तंटामुक्ती, शैक्षणिक महत्त्व, गणेशोत्सव, दहीहंडी संघ, व्यायामशाळा, जीवरक्षक सेवा, स्वतंत्र वारकरी दिंडी, वधू-वर मेळावा असे अनेक समाजोपयोगी उपक्रम, ज्ञाती संस्थेतर्फे चालवले जातात. पुण्यातील कसबा पेठेतील इतर अठरा पगड जाती-जमातींच्या तुलनेत हा समाज प्रगतीच्या तुलनेत थोडा मागे आहे. भोई समाजातील बहुसंख्य मंडळी भोकरे, तारू, तिकोने, शिनगारे, ढगे, नंदनवार, शिर्के, गायकवाड अशा आडनावांची आहेत. |
|||
शिवाजीच्या आणि पेशव्यांच्या काळात नामवंतांच्या पालख्या उलण्याचे काम भोई करत असत. |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] |
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] |
११:५४, ८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
भोई समाज हा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्हे व इतरत्र आढळतो. मासेमारी हा भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. कोकणातले भोई मासेमारी बरोबर भातशेतीही करतात. कोकणातले भोई खाडी व समुद्रात मासेमारी करतात. तर घाटावरचे भोई गोड्यापाण्यात म्हणजे नदी, तलाव इत्यादीमध्ये मासेमारी करतात. भोई समाजातील सर्व रीती, परंपरा ह्या कोळ्यांप्रमाणेच आहेत.
मासळी विक्रीच्या व्यवसायात भोई समाजाचा पूर्वापार मोठा सहभाग असला, तरी आता हे प्रमाण २५ टक्के इतके झाले आहे. त्याला कारणे देखील अनेक आहेत. पुणे शहरात या समाजाची सुमारे चार हजार घरे असल्याचे समजले. पूर्वी कसबा पेठेत केंद्रित असलेला हा समाज, शहर विकासाबरोबर आणि मुख्यत्वे पानशेत पुरानंतर पर्वती, लक्ष्मीनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर आणि पौड रोड परिसरात विखुरला गेला. शिक्षण आणि रोजगाराच्या उपलब्धीमुळे विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आणि अनेकांनी परंपरागत व्यवसाय सोडून विविध क्षेत्रांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. प्रशासन, व्यापार, वकिली, वैद्यकीय, साहित्य, कला अशा क्षेत्रात या मंडळींनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या अन्य भटक्या जमाती या प्रवर्गात, तर केंद्र शासनाच्या ओबीसी इतर मागासवर्गीय या विभागात हा समाज समाविष्ट आहे. या सोयीसवलतींचा लाभ घेऊन काही जणांनी निश्चितच विकास साधला असला तरी बहुसंख्य समाज २०१७ सालातही वंचित आणि उपेक्षित अाहे
समस्त भोई पंच मंडळी ही समाजाची शिखर संस्था आहे. राज, परदेशी, कहारू, पालेवार, नावाडी, दुराया, झिंगा, मच्छिंद्र, जालिया या आणि अशा एकूण २६ उपजाती या समाजात आहेत. धार्मिक विधी, तंटामुक्ती, शैक्षणिक महत्त्व, गणेशोत्सव, दहीहंडी संघ, व्यायामशाळा, जीवरक्षक सेवा, स्वतंत्र वारकरी दिंडी, वधू-वर मेळावा असे अनेक समाजोपयोगी उपक्रम, ज्ञाती संस्थेतर्फे चालवले जातात. पुण्यातील कसबा पेठेतील इतर अठरा पगड जाती-जमातींच्या तुलनेत हा समाज प्रगतीच्या तुलनेत थोडा मागे आहे. भोई समाजातील बहुसंख्य मंडळी भोकरे, तारू, तिकोने, शिनगारे, ढगे, नंदनवार, शिर्के, गायकवाड अशा आडनावांची आहेत.
शिवाजीच्या आणि पेशव्यांच्या काळात नामवंतांच्या पालख्या उलण्याचे काम भोई करत असत.