"भाऊ फक्कड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भाऊ फक्कड हे तमाशातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते सातारा जि... |
(काही फरक नाही)
|
२१:२३, २६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
भाऊ फक्कड हे तमाशातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील हुंबरणे या गावचे होते. त्यांनी तमाशात नायकापासून ते खलनायकापर्यंत सर्व कामे केली. ते तमाशात स्वत: नाच करीतच, शिवाय अनेक वाद्ये वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची बुद्धी अलौकिक होती. मात्र, दुर्दैवाने त्यांना उपेक्षित आणि अंधारात रहावे लागले.
साक्षात् पठ्ठे बापूरावसारख्या नामवंताला सवाल जवाबात हरवणारा अत्यंत ज्ञानी शाहीर म्हणून शाहीर भाऊ फक्कड यांचे नाव इतिहासात आजरामर झाले आहे. या शाहिराने लिहिलेल्या लावण्या, गण-गवळणी वाचल्यानंतर आणि त्यांचा अभिनय व संवादफेक पाहिल्यानंतर या शाहिराची उंची लक्षात येते.
प्रा. डाॅ. रुस्तुम अचलखांब यांनी भाऊ फक्कड यांच्यावरील केलेले संशोधन प्रसिद्ध आहे.
भाऊ फक्कड यांच्यावरील पुस्तके
- शाहिरांचे शाहीर : भाऊ फक्कड (लेखक - प्रा. डॉ. पांडुरंग ऐवळे)
- शाहीर भाऊ फक्कड (लेखक - माधव मोडक ऊर्फ बंधु माधव)