"गौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०: ओळ २०:
ही मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते.
ही मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते.

==अभय मुद्रा==
ही मुद्रा निर्भयता अथवा आशीर्वादाचे प्रतीक आहे, जी सुरक्षा, शांती, परोपकार आणि भय दूर करणे यांचं प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहुला दुमडून हाताच्या बोटांना वर उचलले जाते.
==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==

१५:१६, ७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

बुद्धांच्या विविध मुद्रा, हस्त संकेत यासर्वांतून गौतम बुद्धांनी जीवनातील विविध घटकांना दर्शविले आहे. बुद्धांच्या १० हस्त मुद्रा आणि त्या मुद्रांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. 

धम्मचक्र मुद्रा

या मुद्रेला “धम्म चक्र ज्ञान” (Teaching of the wheel of the Dhamma) याचे संकेत देणारे चिन्ह म्हणूनही ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.

ध्यान मुद्रा

या मुद्रेला समाधी किंवा योग्य मुद्रा म्हणून ओळखले जाते. ही मुद्रा “बुद्ध शाक्यमुनी”, “ज्ञानी बुद्ध अमिताभ” आणि “चिकित्सक बुद्ध” इत्यादी बौद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते. या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो.

भूमीस्पर्श मुद्रा

या मुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे (Touching The Earth) असे देखील म्हणतात. जी बुद्धांची ज्ञान प्राप्तीला दर्शवते, कारण बुद्ध म्हणायचे की पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. या मुद्रेत उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेऊन त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते.

वरद मुद्रा

ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरित्या ठेवण्यात येतो.

करण मुद्रा

ही मुद्रा वाईटापासून वाचविण्याचे सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. ही कर्त्याला स्वास सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते.

वज्र मुद्रा

ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि धातू यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मुठी करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अश्या प्रकारे ठेवले जाते की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल.

वितर्क मुद्रा

ही मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते.

अभय मुद्रा

हे सुद्धा पहा