"जोसेफ हुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
सर जोसेफ डाल्टन हुकर (जन्म : इंग्लंड, ३० जून १८१७; मृत्यू : इंग्लंड, १० डिसेंबर १९११) हे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी |
सर जोसेफ डाल्टन हुकर (जन्म : इंग्लंड, ३० जून १८१७; मृत्यू : इंग्लंड, १० डिसेंबर १९११) हे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी वनस्पतींच्या संशोधनासाठी जगभर भ्रमण करून वनस्पती वर्गीकरणाची पद्धत विकसित केली. ग्लासगो विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच १८३९ ते ६० या दरम्यान सर हुकर यांनी ‘इरॅबस’ आणि ‘टेरर’ या जहाजांतून वनस्पती शास्त्रज्ञ या नात्याने अंटार्टिका खंडाची सफर केली. नंतर ‘बॉटनी ऑफ अंटार्टिका व्हॉयेज’ या ग्रंथातून अंटार्टिका खंडावरील वनस्पतींचे विवेचन सादर केले. |
||
==विविध देशांतील वनस्पतींचा अभ्यास== |
|||
⚫ | |||
१८६४ साली न्यूझीलंडच्या सफरीनंतर ‘हँडबुक ऑफ न्यूझीलंड फ्लोरा’ या ग्रंथातून न्यूझीलंडमधील वनस्पतींचे विवेचन सादर केले तर सन १८७२ ते १८९७ या काळात त्यांनी भारतीय उपखंडातील वनस्पतींवर संशोधन केले. जॉर्ज बेंथम या सहयोगी शास्त्रज्ञाबरोबर लिहिलेल्या ‘जेनेरा प्लँटारम’ या गाजलेल्या पुस्तकातून वनस्पती वर्गीकरणाची पद्धती त्यांनी सादर केली. |
|||
वनस्पती वर्गीकरणाचा पाया घालणार्या सर हुकरने भारतीय उपखंडात दूरवर भ्रमंती करून हिमालयातील दुर्मीळ वनस्पती सर्वप्रथम जगापुढे आणल्या. त्यांनी सर्वप्रथम विस्तृत संशोधन करून ‘फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथातून भारतीय उपखंडातील सपुष्प वनस्पती प्रजातींची नोंद व वर्गीकरण सादर केले. |
|||
सर हुकर यांनी हिमालयातील वनस्पतींवर लिहिलेल्या ‘हिमालयन जर्नल्स’ या पुस्तकात दार्जिलिंग व सिक्कीममधील घनदाट जंगलांबाबत व हिमालयातील दुर्मीळ प्रजातींबाबत विस्तृत विवेचन आहे. |
सर हुकर यांनी हिमालयातील वनस्पतींवर लिहिलेल्या ‘हिमालयन जर्नल्स’ या पुस्तकात दार्जिलिंग व सिक्कीममधील घनदाट जंगलांबाबत व हिमालयातील दुर्मीळ प्रजातींबाबत विस्तृत विवेचन आहे. |
||
वयाच्या ९१व्या वर्षीही ते भारतीय उपखंडातील हिमालयीन भूभागात आढळणार्या ‘बाल्सम’ प्रजातीच्या वनस्पतींवर संशोधन करीत होते. हिमालयातील सुप्रसिद्ध ‘र्होडोडेंड्रॉन’ वनस्पतीवरील सर जोसेफ हुकर यांचे कार्य अनमोल आहे. |
|||
==एकूण कार्य== |
|||
सर जोसेफ हुकर यांनी जागतिक स्तरावर वनस्पतीविज्ञानाच्या विकासासाठी तळमळीने काम केले. जागतिक स्तरावर सर हुकर यांनी वनस्पती उद्यानांचे जाळे निर्माण केले. ब्रिटनमधील लंडन ते ऑस्ट्रेलियातील सिडनी असा त्यांचा पसारा आहे. भारतातील कलकत्ता ते वेस्ट इंडीजमधील त्रिनिदाद अशा विविध देशांतील वनस्पती उद्यानांचा जोसेफ हुकर यांनी परस्परांशी समन्वय घडवून आणला. जगातील विविध भागांत आढळून येणार्या वनस्पती प्रजातींचे संकलन करण्याचे काम त्यांनी केले. |
|||
⚫ | |||
[[वर्ग:वनस्पती]] |
[[वर्ग:वनस्पती]] |
१३:२८, ४ जुलै २०१७ ची आवृत्ती
सर जोसेफ डाल्टन हुकर (जन्म : इंग्लंड, ३० जून १८१७; मृत्यू : इंग्लंड, १० डिसेंबर १९११) हे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी वनस्पतींच्या संशोधनासाठी जगभर भ्रमण करून वनस्पती वर्गीकरणाची पद्धत विकसित केली. ग्लासगो विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच १८३९ ते ६० या दरम्यान सर हुकर यांनी ‘इरॅबस’ आणि ‘टेरर’ या जहाजांतून वनस्पती शास्त्रज्ञ या नात्याने अंटार्टिका खंडाची सफर केली. नंतर ‘बॉटनी ऑफ अंटार्टिका व्हॉयेज’ या ग्रंथातून अंटार्टिका खंडावरील वनस्पतींचे विवेचन सादर केले.
विविध देशांतील वनस्पतींचा अभ्यास
१८६४ साली न्यूझीलंडच्या सफरीनंतर ‘हँडबुक ऑफ न्यूझीलंड फ्लोरा’ या ग्रंथातून न्यूझीलंडमधील वनस्पतींचे विवेचन सादर केले तर सन १८७२ ते १८९७ या काळात त्यांनी भारतीय उपखंडातील वनस्पतींवर संशोधन केले. जॉर्ज बेंथम या सहयोगी शास्त्रज्ञाबरोबर लिहिलेल्या ‘जेनेरा प्लँटारम’ या गाजलेल्या पुस्तकातून वनस्पती वर्गीकरणाची पद्धती त्यांनी सादर केली.
वनस्पती वर्गीकरणाचा पाया घालणार्या सर हुकरने भारतीय उपखंडात दूरवर भ्रमंती करून हिमालयातील दुर्मीळ वनस्पती सर्वप्रथम जगापुढे आणल्या. त्यांनी सर्वप्रथम विस्तृत संशोधन करून ‘फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथातून भारतीय उपखंडातील सपुष्प वनस्पती प्रजातींची नोंद व वर्गीकरण सादर केले.
सर हुकर यांनी हिमालयातील वनस्पतींवर लिहिलेल्या ‘हिमालयन जर्नल्स’ या पुस्तकात दार्जिलिंग व सिक्कीममधील घनदाट जंगलांबाबत व हिमालयातील दुर्मीळ प्रजातींबाबत विस्तृत विवेचन आहे.
वयाच्या ९१व्या वर्षीही ते भारतीय उपखंडातील हिमालयीन भूभागात आढळणार्या ‘बाल्सम’ प्रजातीच्या वनस्पतींवर संशोधन करीत होते. हिमालयातील सुप्रसिद्ध ‘र्होडोडेंड्रॉन’ वनस्पतीवरील सर जोसेफ हुकर यांचे कार्य अनमोल आहे.
एकूण कार्य
सर जोसेफ हुकर यांनी जागतिक स्तरावर वनस्पतीविज्ञानाच्या विकासासाठी तळमळीने काम केले. जागतिक स्तरावर सर हुकर यांनी वनस्पती उद्यानांचे जाळे निर्माण केले. ब्रिटनमधील लंडन ते ऑस्ट्रेलियातील सिडनी असा त्यांचा पसारा आहे. भारतातील कलकत्ता ते वेस्ट इंडीजमधील त्रिनिदाद अशा विविध देशांतील वनस्पती उद्यानांचा जोसेफ हुकर यांनी परस्परांशी समन्वय घडवून आणला. जगातील विविध भागांत आढळून येणार्या वनस्पती प्रजातींचे संकलन करण्याचे काम त्यांनी केले.
जोसेफ हुकर हे उत्क्रांतिवादाचे जनक चार्ल्स डार्विनचे समकालीन होते व डार्विनच्या सिद्धान्ताला पाठिंबा देणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते.