"तुळशीबाग राम मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
दुवे |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''तुळशीबाग राम मंदिर''' हे [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे]]कालीन राम |
'''तुळशीबाग राम मंदिर''' हे [[पुणे|पुण्यातील]] [[पेशवे]]कालीन राम मंदिर आहे. ते पुण्यातील [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठेत]] [[तुळशीबाग]] भागात आहे. पुण्यनगरीस वैभवशाली असलेले हे मंदिर कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) यांनी स्थापन केले. नारो आप्पाजींचे बालपणीचे नाव नारायण होते. समर्थ रामदास स्वामींनी ज्या डोंगरावरील मारुतीची एकनिष्ठ सेवा केली त्या जरांड्याच्या पवित्र भूमीत नारो आप्पाजींचा जन्म झाला. मौजीबंधनापर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळी येथेच होते. |
||
==बांधकाम== |
|||
तुळशीबाग मंदिराचे बांधकाम इ.स. १७६१ मध्ये सुरु झाले परंतु ते सुमारे १७९५ पर्यंत चालू होते. मंदिराचे आवार सुमारे एक एकर आहे. उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सन १८३२ मध्ये सभामंडपाचा काही भाग निसटल्यामुळे दुरुस्त केला. सध्या असलेला सभामंडप ह सन १८८४ मध्ये नंदरामजी नाईक यांनी बांधला व पूर्वी असलेल्या शिखरावरच वरचे बाजूस नवीन उत्तुंग शिखर बांधले. हे शिखर म्हणजे पुण्यनगरीला भूषण झालेले आहे. शिखरावर अनेक साधुसंतांच्या व पेशवेकालीन पोशाखातील काही व्यक्तींच्या मूर्ती बसविल्या आहेत. मूर्ती बसविलेले सुमारे ७० कोनाडे आहेत व त्यांवर १०० कळसही आहेत. शिखर सुमारे १४० फूट उंच असून वरचा कळस सुमारे ४ फूट उंचीचा आहे. त्यास सोन्याचा पत्रा मढविलेला आहे. हा कळस बसविणेचे अगोदर गांवातून वाजत गाजत मिरवणुकीने येथे आणला असे सांगतात. सन १८५५ मध्ये देवाच्या गाभार्याच्या मुख्य चौकटीस पितळी पत्रे बसविले व त्यावर चांदीचा मुलामा दिला. त्यानंतर श्रीमंत पंतसचिव भोर यांनी त्या दरवाज्याला चांदीची चौकट करून दिली. मंदिराच्या आंतल्या व बाहेरच्या गाभार्यात संगमरवरी फरशी आहे. श्रीराम, लक्षमण व सीता या तिन्ही मूर्ती पांढर्या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या, जटायुक्त व धनुर्धारी आहेत. सीतामाईचे एका हातांत कमळ असून दुसर्या हातांत कलश आहे. तिन्ही मूर्ति संगमरवरी असून अतिशय नाजूक, रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. १७६७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्ती उमाजी बाबा पंढरपूरकर यांच्याकडून करवून घेतल्याची नोंद आढळते. |
|||
<!--http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/tulsibag/articleshow/44523696.cms--> |
|||
[[वर्ग:पुण्यातील देऊळे]] |
[[वर्ग:पुण्यातील देऊळे]] |
१५:४७, ११ जून २०१७ ची आवृत्ती
तुळशीबाग राम मंदिर हे पुण्यातील पेशवेकालीन राम मंदिर आहे. ते पुण्यातील बुधवार पेठेत तुळशीबाग भागात आहे. पुण्यनगरीस वैभवशाली असलेले हे मंदिर कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) यांनी स्थापन केले. नारो आप्पाजींचे बालपणीचे नाव नारायण होते. समर्थ रामदास स्वामींनी ज्या डोंगरावरील मारुतीची एकनिष्ठ सेवा केली त्या जरांड्याच्या पवित्र भूमीत नारो आप्पाजींचा जन्म झाला. मौजीबंधनापर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळी येथेच होते.
बांधकाम
तुळशीबाग मंदिराचे बांधकाम इ.स. १७६१ मध्ये सुरु झाले परंतु ते सुमारे १७९५ पर्यंत चालू होते. मंदिराचे आवार सुमारे एक एकर आहे. उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सन १८३२ मध्ये सभामंडपाचा काही भाग निसटल्यामुळे दुरुस्त केला. सध्या असलेला सभामंडप ह सन १८८४ मध्ये नंदरामजी नाईक यांनी बांधला व पूर्वी असलेल्या शिखरावरच वरचे बाजूस नवीन उत्तुंग शिखर बांधले. हे शिखर म्हणजे पुण्यनगरीला भूषण झालेले आहे. शिखरावर अनेक साधुसंतांच्या व पेशवेकालीन पोशाखातील काही व्यक्तींच्या मूर्ती बसविल्या आहेत. मूर्ती बसविलेले सुमारे ७० कोनाडे आहेत व त्यांवर १०० कळसही आहेत. शिखर सुमारे १४० फूट उंच असून वरचा कळस सुमारे ४ फूट उंचीचा आहे. त्यास सोन्याचा पत्रा मढविलेला आहे. हा कळस बसविणेचे अगोदर गांवातून वाजत गाजत मिरवणुकीने येथे आणला असे सांगतात. सन १८५५ मध्ये देवाच्या गाभार्याच्या मुख्य चौकटीस पितळी पत्रे बसविले व त्यावर चांदीचा मुलामा दिला. त्यानंतर श्रीमंत पंतसचिव भोर यांनी त्या दरवाज्याला चांदीची चौकट करून दिली. मंदिराच्या आंतल्या व बाहेरच्या गाभार्यात संगमरवरी फरशी आहे. श्रीराम, लक्षमण व सीता या तिन्ही मूर्ती पांढर्या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या, जटायुक्त व धनुर्धारी आहेत. सीतामाईचे एका हातांत कमळ असून दुसर्या हातांत कलश आहे. तिन्ही मूर्ति संगमरवरी असून अतिशय नाजूक, रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. १७६७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्ती उमाजी बाबा पंढरपूरकर यांच्याकडून करवून घेतल्याची नोंद आढळते.