"थिएटर ॲकॅडमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ‘थिएटर अॅकॅडमी’ ही पुण्यामधील एक नाट्यसंस्था आहे. हिची स्थापना... |
(काही फरक नाही)
|
००:२०, २६ मे २०१७ ची आवृत्ती
‘थिएटर अॅकॅडमी’ ही पुण्यामधील एक नाट्यसंस्था आहे. हिची स्थापना २७ मार्च १९७३ रोजी झाली.
विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक १९७२ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेतून रंगभूमीवर आले. डॉ. जब्बार पटेल यांनी त्याचे दिग्दर्शन, पं. भास्कर चंदावरकर यांनी संगीत आणि कृष्णदेव मुळगुंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, नंदू पोळ, श्रीराम रानडे, रवींद्र साठे, मोहन गोखले, सतीश आळेकर असे अनेक कलावंत ‘घाशीराम कोतवाल’मध्ये होते.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम अशा दोन्ही फेर्यांमध्ये या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले. मात्र त्यानंतर काही काळाने हे नाटक म्हणजे नाना फडणविसांचे चारित्र्यहनन आहे, समस्त ब्राह्मणवर्गाची बदनामी केलेली आहे, असा सूर पुण्यात उमटू लागला. त्यातून ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’-(पीडीए)वर दबाव निर्माण करण्यात आला. नाटकाचे प्रयोग थांबवावे लागले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. भालबा केळकर यांनी नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संस्थेत जुनी पिढी आणि नवी पिढी असा वाद उभा राहिला. परिणामी पी.डी.ए. फुटली. बाहेर पडलेल्या कलावंतांनी २७ मार्च १९७३ रोजी (जागतिक रंगभूमी दिनी) ‘थिएटर अॅकॅडमी’ या नव्या नाट्यसंस्थेचा जन्म सतीश आळेकर यांच्या शनिवार पेठेतील घराच्या गच्चीवर झाला.