नंदू पोळ
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नंदू पोळ | |
---|---|
जन्म | नंदू पोळ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
नंदू पोळ हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. 'घाशीराम कोतवाल' नाटकाच्या 'श्री गणराय नर्तन करी' या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती म्हणजे नंदू पोळ.
वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बालवयातच 'साष्टांग नमस्कार' नाटकापासून नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ते 'थिएटर ॲकॅडमी'चे एक संस्थापक-सदस्य आहेत. ते ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःचा स्टुडिओ काढला आहे. त्यांनी ’मी नंदू पोळ’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. उत्कर्ष प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
नंदू पोळ यांची भूमिका असलेले चित्रपट
[संपादन]- गाढवाचं लग्न (भूमिकेचे नाव राजा)
- सामना (भूमिकेचे नाव वेटर)
नंदू पोळ यांची भूमिका असलेली नाटके
[संपादन]- घाशीराम कोतवाल
पक पक पकाक।
नंदू पोळ यांची भूमिका असलेले दूरचित्रवाणी कार्यक्रम
[संपादन]- नाजुका (भूमिकेचे नाव धम्र्या)