"उमा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. उमा विरुपाक्ष कुलकर्णी (माहेरच्या सुषमा कुलकर्णी) या यू.आर. अन...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==कौटुंबिक==
==कौटुंबिक==
कर्नाटकमधल्या कुलकर्णी या मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या सुषमांच्या घरामध्ये लिखाणापेक्षाही संगीताला पोषक वातावरण होते. वडील बासरी वाजवायचे. १९७० मध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने पत्रिका बघून, मुलगी दाखवून त्यांचा विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबरोबर विवाह झाला, तेव्हा सुषमा बीएच्या शेवटच्या वर्षांला होत्या. विरुपाक्ष हे शंकराचे नाव, म्हणून लग्नानंतर सुषमाची उमा झाली. विरुपाक्ष कुलकर्णी तेव्हा संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करत होते. लग्नानंतर उमा पुण्याला आल्या.



==डॉ. उमा कुलकर्णी यांची काही मराठी पुस्तके==
==डॉ. उमा कुलकर्णी यांची काही मराठी पुस्तके==

००:१५, १८ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. उमा विरुपाक्ष कुलकर्णी (माहेरच्या सुषमा कुलकर्णी) या यू.आर. अनंतमूर्ती, एस.एल. भैरप्पा, वैदेही, के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्यासारख्या कन्‍नड लेखकांच्या कथा-कादंबर्‍यांचे मराठीमध्ये अनुवाद करणार्‍या लेखिका आहेत. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला, ‘तनमनाच्या भोवर्‍यात’ त्यानंतर त्यांनी भैरप्पांची ‘वंशवृक्ष’ ही कन्नड कादंबरी मराठीमध्ये आणली; तिचे जोरदार स्वागत झाले. तेव्हापासून उमा कुलकर्णी लिहीतच गेल्या. आतापर्यंत उमाताईंनी केलेले ५५हून अधिक पुस्तकांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

कौटुंबिक

कर्नाटकमधल्या कुलकर्णी या मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या सुषमांच्या घरामध्ये लिखाणापेक्षाही संगीताला पोषक वातावरण होते. वडील बासरी वाजवायचे. १९७० मध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने पत्रिका बघून, मुलगी दाखवून त्यांचा विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबरोबर विवाह झाला, तेव्हा सुषमा बीएच्या शेवटच्या वर्षांला होत्या. विरुपाक्ष हे शंकराचे नाव, म्हणून लग्नानंतर सुषमाची उमा झाली. विरुपाक्ष कुलकर्णी तेव्हा संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करत होते. लग्नानंतर उमा पुण्याला आल्या.

डॉ. उमा कुलकर्णी यांची काही मराठी पुस्तके

  • अनंतमूर्ती यांच्या कथा (मूळ कन्‍नड लेखक यू.आर. अनंतमूर्ती)
  • अवस्था (अनुवदित, मूळ कन्न्‍नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती)
  • आवरण (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • कर्वालो (अनुवदित प्रवासवर्णन, मूळ कम्‍मड लेखक के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र)
  • काठ (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • कारंत चिंतन (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
  • कुडीय (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
  • केतकरवहिनी (आत्मकथनात्मक स्वतंत्र कादंबरी)
  • क्रौंचपक्षी (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड लेखिका वैदेही)
  • खेळता खेळता आयुष्य (अनुवादित आत्मचरित्र, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • चिदंबर रहस्य (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
  • जिगर (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक श्रीधर अग्नी)
  • टिपू सुलतानचे स्वप्न (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • डॉलर बहू (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका सुधा मूर्ती)
  • डोंगराएवढा (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
  • तडा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • तनमनाच्या भोवर्‍यात (अनुवादित)
  • तलेदण्ड (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • नागमंडल (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • परिशोध (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • परीघ (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका सुधा मूर्ती)
  • पर्व (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • पारखा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड 'तब्बलियु नीनादे मगने' लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा (अनुवादित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
  • फ्लॉरिस्टन बंगला (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक नरसिंह मळगी)
  • मंद्र (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • महाश्वेता (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक सुधा मूर्ती)
  • ययाती (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • वंशवृक्ष (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • वैदेही यांच्या निवडक कथा (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड लेखिका वैदेही)
  • व्रत आणि इतर कथा ((अनुवादित कथासंग्रह फकीर मोहम्मद कात्पदी)
  • सार्थ (अनुवदित कादंबरी मूळ कन्‍नड लेखक, डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • सामान्यातले असामान्य (अनुवादित व्यक्तिचित्रणे, मूळ कन्‍नड लेखिका सुधा मूर्ती)

उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्र फाउन्डेशन पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे पुरस्कार
  • रेखा ढोले पुरस्कार