Jump to content

रेखा ढोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेखा ढोले (?? - २१ एप्रिल, इ.स. २०१४) या राजहंस प्रकाशनच्या साहित्यप्रेमी होत्या. राजहंस प्रकाशनच्या विविध पुस्तकांच्या दर्जेदार निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग असे.

पुरस्कार

[संपादन]

राजहंस प्रकाशन आणि ढोले यांचे कुटुंबीय अनुवाद आणि पुस्तकनिर्मिती या दोन रेखा ढोले यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये २०१५ पासून तीन रेखा ढोले पुरस्कार देत आहेत.

अन्य भाषांतून मराठी भाषेत साहित्यानुवाद करणाऱ्या अनुवादकास २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, असे एका पुरस्काराचे, ग्रंथनिर्मितीसाठी मुखपृष्ठकारास आणि अंतर्गत रचनाकारास १५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, असे दुसऱ्या पुरस्काराचे, तर प्रकाशन संस्थेस दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे तिसऱ्या पुरस्काराचे स्वरूप असते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये २७मे या वर्धापन दिनाच्या सुमारास हे पुरस्कार दिले जातात.

पुरस्कारविजेते

[संपादन]

२०१५

[संपादन]

२०१६

[संपादन]
  • मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल रवींद्र गुर्जर यांना
  • मुखपृष्ठकार पुंडलिक वझे यांना
  • बोस्कीच्या गोष्टी या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ग्रंथाली प्रकाशन संस्थेला.

२०१७

[संपादन]
  • मराठी अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल कलासक्त संस्थेच्या ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाला
  • ‘रस्किन बॅंड’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीसाठी चंद्रमोहन कुलकर्णी यांना
  • याच पुस्तकाच्या निर्मितीसाठी रोहन प्रकाशनला.