"सुहास विठ्ठल मापुस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर (मृत्यू : २१ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे समाजसेव...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

१३:०३, २७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर (मृत्यू : २१ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे समाजसेवी उपक्रम राबवणारे एक मराठी डॉक्टर होते. त्यांचे मूळ गाव वाकेड (लांजा तालुका,. रत्‍नागिरी जिल्हा) असले तरी त्यांचा जन्म मुंबईतच झाला. तेथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी घेतली. १९५९ मध्ये ते देहू गावात आले आणि तेथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

आरोग्यसेवेचा व्यवसाय करता करताच त्यांनी अप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. महाराष्ट्रभर लौकिक असलेल्या त्या देहू गावात त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एकही शौचालय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते व्यथित झाले. गावांतील रुग्णांची तपासणी करताना बहुतांशी आजार अस्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अस्वच्छता हेच आजार आणि रोगांचे मूळ स्थान असून, त्यावर मात करण्यासाठी निधीवाटप किंवा योजनांची घोषणा करून उपयोग नाही तर, योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी त्यांनी गावातील तत्कालान कारभार्‍यांची मदत घेऊन अनेक मोहिमा राबविल्या. गावपातळीवर संडास बांधकाम समितीची स्थापना केली. प्रत्येकी चारशे रुपये देऊन गावात परदेशी डिझाइनची दहा शौचालये बांधली. परंतु, ती वर्षातच पडली. त्यानंतर त्यांनी संशोधनावर भर देत घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. कणकवली येथे अप्पासाहेब पटवर्धन यांनी संशोधन केलेल्या ‘सोपा संडास’ म्हणजेच सुलभ शौचालयांचा मॉडेल म्हणून वापर सुरू केल्याचे समजताच तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. एवढेच नव्हे तर सरकारच्या मदतीशिवाय ७० टक्के संडास बांधून ते सुरू करण्यात यश प्राप्त केले.

लोकसहभागातून संडास

दारिद्ररेषेखालील लोकांनाच सरकारने अनुदान द्यावे, राजकीय हेतूने सरसकट रक्कम देऊ नये. लोकांना स्वखर्चाने शौचालय बांधण्यास प्रवृत्त करावे, अशी डॉ. मापुस्कर यांची भावना होती. लोकांचे मतपरिवर्तन झाल्यावर त्यांना स्वच्छतेविषयी सांगावे लागणार नाही, असा त्यांचा दृढ विश्वास होता. प्रयत्‍नांत सातत्य ठेवल्यास निश्चितच यश येईल हे त्यांनी स्वानुभवातून सांगितले. गावागावांत स्वच्छता समिती बळकट करावी, आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, संडास बांधकाम समित्यांची निर्मिती करावी, लोकसहभागातून संडास बांधून त्यांचा वापर करणे शक्य आहे. लोकसहभाग वाढविण्यावर आणि प्रबोधनावर अधिक खर्च करून देशातील आरोग्य सुकर करण्याचा प्रयत्न करावा, यासाठीही त्यांनी प्रयत्‍न केले होते.

मलप्रभा बायो गॅ्स

जनावरांचे शेण आणि मूत्राचा वापर करून अप्पासाहेब पटवर्धन यांनी ‘वॉटर जॅकेट’ पद्धतीचा बायोगॅस प्रकल्प तयार केला होता. त्यात अधिक सुधारणा करून डॉ. मापुस्कर यांनी ‘मलप्रभा बायोगॅस प्रकल्पा’चे डिझाइन विकसित केले आणि त्यात मानवी विष्ठेचा वापर करून गॅसची निर्मिती करणे शक्य आहे, हे लोकांना पटवून दिले.

देशभर प्रचार

देहूतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर डॉ. मापुस्करांनी शासनाच्या अनेक समित्यांवर काम केले. त्याची दखल देशपातळीवरही घेण्यात आली. मात्र, निःस्वार्थी भावनेने काम केल्यानंतर सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारामुळे ते उद्विग्न होऊन ते सर्व समित्यांमधून बाहेर पडले, मात्र गावात, महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांत त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य चालू ठेवले.

डॉ. गोपुस्कर यांना मिळालेल पुरस्कार आणि सन्मान

  • अनेक संस्थांकडून गौरव
  • भारत सरकारचा निर्मलग्राम पुरस्कार (२०००).
  • भारत सरकराच मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार (२०१७)
  • महाराष्ट्र सरकारकडून स्वच्छता दूत पुरस्कार (२०००)