Jump to content

"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
'''भारतातील नावे''' वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात ([[तमिळनाडू]], [[केरळ]]) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत.
'''भारतातील नावे''' वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात ([[तमिळनाडू]], [[केरळ]]) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत.


अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल
अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल.

भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ हा प्रत्यय असतो. मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर ’कर’ऐवजी ’[[वार]]’ हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, बोजेवार, मुनगंटीवार, हमपल्लीवार वगैरे. उत्तरी भारतात ’वार’ऐवजी ’वाल’असते. आगरवाल, बकलीवाल, धारीवाल इ.इ. धंद्यावरून किंवा गावांवरून ठेवली जाणारी बोहरी आणि पारशी आडनावे - कोलंबोवाला, दारूवाला, नडियादवाला, ताडीवाला, सोडावॉटरबॉटलओपनरवाला वगैरे.

याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -

* आंटिया
* कनोजिया
* कांकरिया
* कापडिया
* कुटमुटिया
* कोडिया
* चोरडिया
* छाब्रिया
* झकेरिया
* झाझरिया
* डालमिया
* डिया
* देढिया
* दोडिया
* फिरोदिया
* बगाडिया
* भांखरिया
* भाटिया
* मारडिया
* रुईया
* रेशमिया
* लोहिया
* वाडिया
* सिंघानिया
* सिसोदिया
* सुरपुरिया, वगैरे वगैरे.


==भारताच्या पूर्व भागातील नावे==
==भारताच्या पूर्व भागातील नावे==

०६:०६, १६ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

""आडनाव"" हे कटुंब, घराणे, अथवा मूळ गांव यांचे निदर्शक, तसेच उपनाम म्हणून वापरले जाते . एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी.

भारतातील नावे वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत.

अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल.

भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ हा प्रत्यय असतो. मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर ’कर’ऐवजी ’वार’ हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, बोजेवार, मुनगंटीवार, हमपल्लीवार वगैरे. उत्तरी भारतात ’वार’ऐवजी ’वाल’असते. आगरवाल, बकलीवाल, धारीवाल इ.इ. धंद्यावरून किंवा गावांवरून ठेवली जाणारी बोहरी आणि पारशी आडनावे - कोलंबोवाला, दारूवाला, नडियादवाला, ताडीवाला, सोडावॉटरबॉटलओपनरवाला वगैरे.

याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -

  • आंटिया
  • कनोजिया
  • कांकरिया
  • कापडिया
  • कुटमुटिया
  • कोडिया
  • चोरडिया
  • छाब्रिया
  • झकेरिया
  • झाझरिया
  • डालमिया
  • डिया
  • देढिया
  • दोडिया
  • फिरोदिया
  • बगाडिया
  • भांखरिया
  • भाटिया
  • मारडिया
  • रुईया
  • रेशमिया
  • लोहिया
  • वाडिया
  • सिंघानिया
  • सिसोदिया
  • सुरपुरिया, वगैरे वगैरे.

भारताच्या पूर्व भागातील नावे

पश्चिमी भारतातील नावे

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे ठेवले जाते. उदाहारण: सचिन रमेश तेंडुलकर या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.

स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात काही समाजांत पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.

मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर (माडगुळ गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावाच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.

गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.

यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही याकारान्त आडनावे असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.

मराठी आडनावे

महाराष्ट्रातील मराठी आडनावांइतकी विविधता जगात इतरत्र क्वचितच आढळेल. त्या आडनावांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल :-

गावावरून किंवा प्रदेशावरून

उदा० अकोले गावावरून अकोलकर, आरोंदे गावावरून आरोंदेकर, अडगुलवरून अडगुलवार, रेवणवरून रेवणवार, इंगळहळ्ळीकर, गुजराथी, पंजाबी, मारवाडी वगैरे.

निसर्गातील एखाद्या स्थलविशेषावरून

ओढे, डोंगरे, ढगे, पर्वते, वगैरे

प्राण्याच्या किंवा पक्ष्याच्या नावावरून

कावळे, कोकीळ, कोळी, कोल्हे, गरुड, गाढवे, घारे, घोडावत (राजस्थानी आडनाव), घोडे, घोडके, घोडचौरे, चोचे, चोरघोडे, डुकरे, ढोक, तरस, नाग, पाखरे, पाल (बंगाली आडनाव), पिसे, पोपट, पोळ, बकरे, मुंगी, मोरे, लांडगे, वाघ, वाघमारे, शेळके, सरडे, मुंगुसमारे, ससाणे, वगैरे

पूर्वजांच्या व्यवसायावरून

कुलकर्णी, कुळकर्णी, कोळी, गुरव, देशपांडे, देशमुख, पाटील, लोहारे, लोहोकरे, वाणी, शिंपी, सुतार, सोनार, सोनी (गुजराथी)

फार्सी धातू नविश्तन्‌ लागून होणारी आडनावे

कापडणवीस, कारखानीस, कोटणीस, खासनीस, चिटणीस, जमेनीस, तटणीस, पागनीस, पारसनीस, पोतनीस, फडणीस, फडणवीस वाकनीस, हसबनीस

वस्तूवरून

ताटे, पाटे, पोटे, लाटे, लोटे,

मुस्लिम संस्कृतीतून आलेली नाव/आडनावे

आबाजी, पागे, पेशवे, बाजीराव, बाबूराव, मिराशी, मुकादम, मुतालीक, मोगल, वकील, शहाजी

महाराष्ट्रातील नावे

महाराष्ट्र
मराठी, कोकणी

अंकलीकर, अकोलकर, अग्निहोत्री, अडगुलवार, अधिकारी, अवचट

आगरकर, आगलावे, आजगावकर, आठवले, आडवे, आडे, आडेकर, आपटे, आंबेकर, आंबेडकर, आमले, आरोंदेकर,

इ/ए/ओ

इंगळहळ्ळीकर, इंगळे, इचलकरंजीकर, इरुळे, एकबोटे, ओगले, ओतूरकर

कडू, कदम, कन्नाके, कपाळे, करकरे, करडे, करमरकर, करवंदे, कर्वे, कल्याणी, काकडे, काजळे, कांडलकर, काण्णव, कातोते, कांदळकर, कानडे, कानफाडे, कानविंदे, कानिटकर, कापसे, कांबळे, कामत, कामाने, कामारकर, कामेरकर, कारखानीस, कारुळकर, कारेकर, कालगुडे, काशीकर, काळे, किर्लोस्कर, कीर्तनकार, कीर्तिकर, कुरसंगेˌ कुर्लेकर, कुलकर्णी, कुलसंगेˌ केकडे, केरकर, केरूळकर, केसकर, केळकर, कोकाटे, कोचे, कोठारे, कोडगिरवार, कोतवाल, कोरगावकर, कोहोजकर, कोळी, कोळे, कोळेकर,

खड्ये, खंदारे, खरे, खर्चे, खाटमोडे, खाडे, खांडेकर, खाड्ये, खानवलकर, खानविलकर, खानोलकर, खुतारकार, खोचरे, खोटे, खोपडे,

गजेंद्रगडकर, गडकर, गडकरी, गणगोत्रे, गद्रे, गबाळे, गरुड, गवस, गवळी, गवाणकर, गव्हाणे, गांजावाला, गाडगीळ, गाढे, गांधी, गायतोंडे, गावडे, गावणकर, गावसकर, गुजर, गुप्‍ते, गुरव, गोखले, गोडसे, गोंदकर, गोरुले, गोरे, गोवारीकर, गोवित्रीकर, गोवेकर, गोसावी

घरवाडे, घाटगे, घाडगे, घुर्ये, घेवडे, घोलप

चंद्रवंशी, चंद्रात्रे, चंद्रात्रेय, चनशेट्टी, चमकेरी, चरपे, चव्हाण, चव्हाणके, चांदे, चांदोरकर, चांदोलकर, चापेकर, चाफे, चाफेकर, चिकटे, चिकणे, चिटको, चिटणीस, चितळे, चिंतामणी, चित्रे, चिंदरकर, चिपळूणकर, चोडणकर, चौगुले, चौधरी, चोपे, चौरे,

छत्रे,

जगताप, जगदाळे, जयकर, जवळकर, जाधव, जांभळे, जावकर, जिचकर, जोशी,

झरे, झरेकर, झारापकर, झेंडे, झोपे,

टकले, टिळक, टिळेकर, टेकवडे, टेंबे,

डफळ, डफळे, डोईफोडे, डोके, डोंगरे,

ढमढेरे, ढमाले, ढोबळे,

तळपदे, तळेले, ताकसांडे, ताटे, तांबे, तारमळे, तावडे, तुळसकर, तेंडुलकर, तोकडे, तोडणकर,

धकाते, धनावडे, धामणीकर, धामणे, धारप, धोंगडे

नखरे, नगरनाईक, नरवाडे, नाईक, नाखरे, नाडकर्णी, नातू, नांदरे, नायक, नारकर, नालुगडे, नाले, नावकर, नासरे, निकम, निगडे, निंबाळकर, निंभोरकर, निमकर, निवंगुणे, नुपनर, नेने, नेमाडे, नेमाणे, नेरुरकर, नेसनतकर,

पगारे, पांगारकर, पंचनदीकर, पंचपोर, पटवर्धन, पडवळ, परमार, पाचोरे, पांडे, पंडित, परांजपे, परांजप्ये, परते, परब, पवार, पाचपोर, पाटकर, पाटणकर, पाटील, पाठक, पाताडे, पानतावणे, पारकर, पारखी, पारगावकर, पालेकर, पावगी, पायगुडे, पितळे, पिसाळ, पिळगावकर, पिळणकर, पुजारी, पुडके, पुरोहित, पुसाळकर, पुळेकर, पेठे, पेडणेकर, पेंडसे, पेंढारकर, पेशवे, पोटदुखे, पोतदार, पोतनीस, पोवार, पोटे, पोरजे, पोरंपाजे, पोवार, प्रभू, प्रभुदेसाई,

फडके, फाकले, फाटक, फुटाणे, फुलझेले, फुलपगार, फुलपगारे, फुलमाळी, फुलसुंदर, फुले

बनसोडे, बर्वे, बागगावकर, बागवान, बागवे, बापट, बामणे, बारटक्के, बाळफाटक, बांदोडकर, बूसाठे, बेडगे, बेंद्रे, बेर्डे, बेलसरे, बोंडाळे. बोबडे, बोरकर, बोरगावकर, बोरसे,

भोर, भट, भाटवडेकर, भाटकर, भांडारकर, भालेकर, भालेराव, भुजबळ, भिडे, भोगले, भोते, भोमकर, भोले, भोसले, भोळे.

मडके, मराठे, मसुरकर, मसुरेकर, महागावकर, महाजन, महाडिक, महामुनी, महेंद्रकर, मांगले, मांजरेकर, माडीवाले, मातुरे, माने, मालवणकर, मयेकर, मा(हि)हीमकर, मिरजकर, मिरासदार, मिसाळ, मिस्त्री, मुंडे, मुजुमदार, मुरकुटे, मुळे, मेश्राम, मेस्त्री, मेहेंदळे, मोटे, मोडक, मोने, मोरे, मोहरीर, मोहरील, मोहिते, म्हात्रे, म्हापणकर

यवतकर, यादव, येरावार, येवले, येवलेकर

रतनाळीकर, रत्‍नपारखी, रसम, रांगणेकर, राचमले, रांजणे, राजे, राठोड, राणे, रानडे, राव, रावते, राहते, रिकामे, रिसबूड, रेगे, रेणावीकर, रेवणकर, रेवणवार, रेवणशेट्टे

लाखे, लागू, लाड, लाले, लिमये, लेले, लोखंडे, लोटलीकर

वकटे, वंजारे, वझे, वडाभाते, वर्तक, वाघ, वाघधरे, वाघमारे, वाघमोडे, वाटवे, वाटेकर, वायंगणकर, वाळवे, विचारे, विंझे, विद्वांस, वेंगुर्लेकर, वैद्य

शंभरकर, शहाणे, शिंदे, शिरोडकर, शिर्के, शिवडे, शेट्ये, शेळके, ,

सकारकर, सप्रे, सरंजामे, सरदेशपांडे, सरनाईक, सरवदे, सरोदे, सहस्रबुद्धे, साटम, साठे, सातपुते, सातारकर, साने, साप्‍ते, साबडे, सामंत, सावंत, सावदेकर, सावरकर, सावर्डेकर, सावळेकर, सासवडकर, साळगावकर, साळवी, साळसकर, साळुंखे, सुखटणकर, सुर्यवंशी, सुर्वे, सोंदनकर, सोनटक्के, सोनवणे, सोनारकर, सोनावणे, सोनावळे, सोपारकर, सोवनी, सोहोनी,

हगवणे, हरदास, हर्डीकर

क्ष

क्षीरसागर


मराठी आडनावांत ओकारान्त, याकारान्त आडनावे असतात, तशीच ’जे’कारान्त, ‘डे’कारान्त, 'बे'कारान्त, आणि 'भे'कारान्त आडनावेही असतात. अशी काही आडनावे :-

जेकारान्त

  • ताटपुजे
  • नागरगोजे

डेकारान्त

अरगडे, अलगडे, आडे, उंडे, कदमबांडे, करडे, करंडे, काकडे, कातुर्डे, कानफाडे, कारंडे, काळगुडे, केकडे, खाटमोडे, खाडे, खांडे(कर), खुडे, खोडे, खोपडे, गराडे, गवांडे, गाडे(कर), गायतोंडे, गावडे, गावंडे, गोडे, घरवाडे, घांगुर्डे, घालुगडे, घेवडे, घोडे, घोरपडे, जानगुडे, झगडे, झेंडे, टेकवडे, डोईफोडे, तांगडे, तावडे, तोकडे, दामगुडे, देशपांडे, धनावडे, धांगुर्डे, धांडे, धोंगडे, नरवाडे, नलावडे, नालुगडे, निगडे, नेमाडे, पांडे, पायगुडे, पिंडे, पुंडे, बनसोडे, बलकवडे, बागडे, बानुगडे, बांडे, बेर्डे, बोबडे, बोर्‍हाडे, भाईगडे, भांडे, भिंडे, भुंडे, भेंडे, मांडे, मातीगडे, मुंडे, राजवाडे, रानडे, रेडे, रोकडे, रोडे, लकडे, लांडे, लोखंडे, वाईंगडे, वाघमोडे, शिवडे, शेंडे, सरदेशपांडे, साबडे, हांडे, हुंडे(करी), वगैरे

बेकारान्त

  • गोडांबे
  • गोलांबे
  • चौबे (गुजराती आडनाव)
  • टेंबे
  • तांबे
  • दुबे (गुजराती आडनाव)
  • बिंबे
  • बोंबे
  • लांबे
  • वाळंबे
  • वाळिंबे
  • शेंबे
  • सुंबे

भेकारान्त

  • उभे
  • चोभे
  • जांभे
  • टेंभे
  • लंभे
  • लेंभे
  • लोभे
  • सुंभे

दक्षिणी भारतातील नावे

प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एका खास प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :

  • त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., इंकोल्लु, उद्यवारा, कुलार, कोकर्डी, चावली, चिट्टी, जनस्वामी, दासिग, बंगळूर, सिंग्री (सिंगिरी), हट्टंगडी, हट्टिंगडी, हुबळी, इत्यादी.
  • त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
  • जातीवरून नाव, उदा. अय्यंगार, अय्यर, राव, नायर.

आडनाव हा प्रकार दक्षिणी भारतीयांत नाही.

उत्तरेकडील आडनावे

अग्निहोत्री, अग्रवाल, आगरवाल, आर्य, आहुजा, कपूर, कोहली, खन्ना, खान, खुराणा, गोयल, चतुर्वेदी, चोपडा, चोप्रा, चौहान, त्यागी, त्रिपाठी, त्रिवेदी, दास, देसाई, द्विवेदी, पांडे, पाण्डेय, बेदी, भट, भट्टी, मल्होत्रा, माथूर, मिश्रा, मिस्त्री, मौर्य, यादव, रंधावा, राजपूत, राठोड, रायजादा, रोशन, वर्मा, व्यास, शर्मा, शास्त्री, श्रीवास्तव, सिंघल, सिंघानिया, सेठी,

बंगालमधील आडनावे

(आडनावात शेवटी अकारान्त जोडाक्षर आल्यास त्याचा उच्चार आकारान्त होतो.)

गुप्त (उच्चार गुप्ता), घोष, चक्रवर्ती (उच्चार चोक्रोबोर्ती), चटोपाध्याय(चॅटर्जी), ठाकुर (टागोर), दास, बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वर्मन् (उच्चार बर्मन), वसु-बसु-बोशू, (बोस), भौमिक, मिश्र (उच्चार मिश्रा), मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन, सरकार (सोरकार)

जोडनावे

दासगुप्त, रॉयभौमिक, रॉयचौधरी, सेनगुप्त, सेनरॉय,

गुजरातमधील आडनावे

अंबानी, गढा, गांधी, चौहान, मेहता, मोदी, शहा, शाह,

पहा

ओकारान्त नावे : याकारान्त आडनावे : मराठी नावे