"विद्या पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

विद्या पटवर्धन यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि त्या मुंबई-दादर येथील बालमोहन शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. चित्रकलेच्या शिक्षिका असूनही नाटकाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दूरदर्शन आणि भारतीय विद्या भवन या ठिकाणी होणार्‍या स्पर्धेसाठी त्यांनी शाळेतर्फे मुलांची नाटके बसवायला सुरुवात केली. यानिमित्ताने मुलांच्या भावविश्वात त्या इतक्या रममाण झाल्या की, त्यांची चित्रकला कधी मागे पडली ते त्यांना कळलेच नाही.

कधी मोठमोठया लेखकांची तर कधी पाठयपुस्तकांवर आधारित नाटकेही त्यांनी मुलांसाठी बसवली. पाठयपुस्तकावर नाटक बसवून हसतखेळत अभ्यासक्रम मुलांना शिकवला जाऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मुलांवर न रागावता, गोड बोलून, मजा-मस्ती-धमाल करत, त्यांच्यातच मिसळत अगदी अलगदपणे त्यांनी मुलांना अभिनयाचे बाळकडू पाजले. अशा मुलांतून त्यांनी कित्येक कलावंत घडवले.

केवळ नाटकच नाही तर ‘दे धमाल’सारख्या मालिकेतून त्यांनी मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्‍न केला. नाटक करता करता त्यांनी स्वतःदेखील कित्येक मालिकांमधून अभिनय केला. निवृत्तीनंतरही त्या मुलांसाठी धडपडतात. बालकलाकारांच्या निवडीसाठी प्रथम त्यांच्या कार्यशाळेला आवर्जून भेट दिली जाते.

==पुरस्कार==
* [[वसंत सोमण]] पुरस्कार

[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|पटवर्धन, विद्या]]

००:०४, १८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

विद्या पटवर्धन
जन्म विद्या पटवर्धन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

पुरस्कार