"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४२: | ओळ ४२: | ||
* १९९६मध्ये शेखर भोसले यांनी लाकूड कुजविणार्या बुरशींवर केलेले त्यांचे संशोधन प्रसिद्ध केले होते. |
* १९९६मध्ये शेखर भोसले यांनी लाकूड कुजविणार्या बुरशींवर केलेले त्यांचे संशोधन प्रसिद्ध केले होते. |
||
* ए.व्ही. साठे यांनी शंभरहून अधिक खाद्य बुरशींच्या जातींचा शोध लावला. |
* ए.व्ही. साठे यांनी शंभरहून अधिक खाद्य बुरशींच्या जातींचा शोध लावला. |
||
* डॉ रणदिवे : यांनी पुणे जिल्ह्यातील 'लाकूड कुजविणार्या बुरशी' या विषयावर संशोधन करून दीड हजारांहून अधिक बुरशींचा माहितीसाठा तयार केला होता. त्यांच्या फंगी फ्रॉम इंडिया या वेबसाइटसाठी नुकताच त्यांनी गेल्या बारा वर्षांत विशेष |
* [[सासवड]]च्या वाघिरे महाविद्यालयातील कवकवैज्ञानिक डॉ किरण रामचंद्र रणदिवे : यांनी पुणे जिल्ह्यातील 'लाकूड कुजविणार्या बुरशी' या विषयावर संशोधन करून दीड हजारांहून अधिक बुरशींचा माहितीसाठा तयार केला होता. त्यांच्या फंगी फ्रॉम इंडिया या वेबसाइटसाठी नुकताच त्यांनी गेल्या बारा वर्षांत विशेष प्रयत्न घेऊन देशभरातील साडे सात हजार बुरशींचा माहितीसंग्रह उपलब्ध केला आहे. |
||
* डॉ. विजय रानडे आणि डॉ. किरण रणदिवे : |
* डॉ. विजय डी. रानडे आणि डॉ. किरण रणदिवे : पुणे जिल्ह्यातील या दोन कवकवैज्ञानिकांनी सुमारे वीस वर्षे पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत फिरून 'स्लाइम मोल्ड' अर्थात मिक्झोमायसिस्ट या दुर्मिळ बुरशीच्या ८१ प्रकारांची नोंद केली आहे. |
||
* पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील बुरशींची एक प्राथमिक यादी प्रसिद्ध केली होती. |
* पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील बुरशींची एक प्राथमिक यादी प्रसिद्ध केली होती. |
||
== बाह्यदुवे == |
== बाह्यदुवे == |
१२:३२, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
बुरशी अन्नासाठी दुसर्यांवर अवलंबून असणारी मृतोपजीवी सजीव आहे. बुरशीची गणना वनस्पती वा प्राणी या दोन्ही गटांत होत नाही. विज्ञानाच्या सुरुवातीच्या कालखंडात या जीवाची गणना वनस्पतीमध्येच केली जाई, कारण ते एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हालचाल करत नाहीत. परंतु निरीक्षणानंतर लक्षात आले की, हा जीव नाश पावणार्य जीवांवरच जगतो आणि त्यात वनस्पतीं प्रमाणे त्यात हरितद्रव्य नाही. म्हणून बुरशी हा गट वर्गीकरण शास्त्राला पडलेले एक कोडे आहे. बुरशीच्या सुमारे एक लाख जाती ज्ञात आहेत. बुरशीच्या अभ्यासाला मायकोलॉजी असे म्हणतात
आढळ
बुरशीचा आढळ आणि विस्तार जवळजवळ सर्वत्र दिसून येतो. वाळवंट, बर्फाच्छादित प्रदेश, तसेच खोल समुद्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही बुरशीची वाढ होते.
उपयोग
बुरशीचा उपयोग मानवाला पुरातन काळापासून ज्ञात आहे. दारू बनवण्याची क्रिया पूर्णतः बुरशीच्या आंबण्यावर (Fermentation) अवलंबून असते. ब्रेड वा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी यीस्ट वापरले जाते तो एक बुरशीचाच प्रकार आहे. औषधे बनवण्यासाठी बुरशीचा वापर होतो. अळंबी प्रकारातील बुरशी खाण्यासाठी वापरली जाते. ही बुरशी चवीला रुचकर असते. निसर्गातील क्लिष्ट घटकांचं विघटन करून जमिनीला पोषक द्रव्ये परत मिळवण्यास बुरशीची मोठी मदत आहे. अन्नसाखळीचे चक्र बुरशीमुळेच पूर्ण होते.
निसर्गाच्या अन्नसाखळीत बुरशी सफाईकामगार म्हणून काम करते. टाकाऊ घटकांचे विघटन करण्याबरोबरच नैसर्गिक बीजारोपण प्रक्रियेत तिचा मोलाचा वाटा असतो. जंगलात, गवताळ प्रदेशात वनस्पती वाचण्यास बुरशीचा आधार असतो. वनस्पतींच्या बिया मातीमध्ये पडल्यानंतर हवेतील आर्द्रतेतून त्यांच्यावर बुरशीचे कवच तयार होते. बियांना आवश्यक असलेले प्रोटीन्सही बुरशीच देते. पावसाळ्यात या बिया रुजतात आणि रोपे येतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही बुरशी ही संजीवनी आहे. सर्दी, तापापासून ते कर्करोग, एड्स अशा गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे गुणधर्म या घटकामध्ये आहेत.
औषधी उपयोग
भारतातील आदिवासींना अनेक बुरशींचे गुणधर्म पूर्वजांकडून आलेल्या ज्ञानामुळे माहिती आहेत. हवामान बदलामुळे येणारा ताप, सर्दीखोकला, कावीळ, पित्त अशा आजारांबरोबरच जखमी बरी करण्यासाठी, भाजलेले वण घालविण्यासाठी ते विविध प्रकारच्या बुरशींचा वापर करतात. लोणावळ्यात पावसाळ्यादरम्यान छोट्या बाजारपेठांमध्ये आदिवासी अळिंब ही बुरशी विक्रीसाठी ठेवतात. ही बुरशी चविष्ट असते. त्यामध्ये मुबलक प्रथिने असतात.
अनेक औषधी गुणधर्म असलेल्या बुरशी आपल्या पश्चिम घाटामध्ये आढळतात. बुरशांचे हे वैद्यकीय गुणधर्म आतापर्यंत आदिवासींच्या समाजाकडे परंपरागत चालत आले. पण, हळूहळू हे ज्ञान लुप्त होते आहे. अनेक बुरशींची वैशिष्ट्ये अलीकडच्या पिढीला माहिती नाहीत. कित्येक बुरशींपर्यंत अद्याप आदिवासी देखील पोहोचलेले नाहीत.
फणसोंबा :- भारतातील पश्चिम घाटात फेलिनस ही बुरशी मोठ्या संख्येने आढळते. स्थानिक भाषेत तिला फणसोंबा म्हणतात. या बुरशीचे नियमित मात्रेत सेवन केल्यास दात आणि हिरड्यांचे आजार बरे होतात.
गॅनडर्मा :- या प्रकारातील बुरशीचा तुकडा खाल्यास कोलेस्टोरॉल कमी होते.
दगडफूल :- दगडफूल हे आपल्या खाण्याच्या मसाल्यांमध्ये सर्रास वापरले जाते. ही एक प्रकारची वाळवलेली बुरशी अहे. या दिसायलाही रेखीव असलेल्या बुरशीमध्ये दगडांना फोडणार्या हत्यारांचे रासायनिक गुणधर्म असतात. आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वीच ते जाणले होते. त्यामुळेच दगडफुलाचा मसाल्यांमध्ये वापर केला जातो. या बुरशीतील रसायनांमुळे किडनी स्टोन होत नाही.
ऑरिक्युलारिया :- हिमाचल प्रदेशमध्ये आढळणार्या या बुरशीचे सेवन अंगदुखी थांबविण्यासाठी केले जाते.
कुत्र्याची छत्री :- पावसाळ्यात ओलसर जागेत घट्ट जमिनीवर किंवा झाडाच्या बंध्यावर उगवणारी ही बुरशी सर्वांच्या परिचयाची असते.
मशरूम :- लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेकांना आवडणारा मशरूम हा देखील बुरशीचा प्रकार आहेत, पण त्यांच्यावर झालेल्या सखोल अभ्यासामुळे त्यांचे गुणधर्म घराघरात पोहोचले आणि ढाब्यापासून पंचातारांकित हॉटेलपर्यंत मशरूमची डिश लोकप्रिय ठरली आहे. अर्थात काही जातींचे मशरूम विषारीही असतात.
पेनिसिलीन
इतिहास
इ. स. १९२९ मध्ये अॅलेक्झांडर फ्लेमिंग यांना असे आढळले की, संवर्धन माध्यमात (सूक्ष्मजीवांची वाढ व्हावी यासाठी तयार केलेल्या पोषक पदार्थांच्या मिश्रणात) होत असलेली स्टॅफिलोकॉकस जंतूंची वाढ अकस्मात एका बुरशीच्या संसर्गाने खुंटली. ही बुरशी पेनिसिलियम वंशाची आहे आणि तिचे संवर्धन केले असता मिळणारा द्रव आणि त्यातील पदार्थ यांच्या अंगी जंतुप्रतिकारक गुण आहे. हे समजल्यावर त्यांनी त्या पदार्थांला ‘पेनिसिलीन’ हे नाव दिले. ही बुरशी पेनिसिलयम नोटॅटम आहे हे चार्ल्स टॉम यांनी दाखविले. पेनिसिलीन अस्थिर असल्यामुळे ते शुद्ध रूपात वेगळे काढणे आणि त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करणे त्या वेळी शक्य झाले नाही.
बुरशीचे संवर्धन करून पेनिसिलीन वेगळे करण्यासंबंधीचे प्राथमिक प्रयोग पी. डब्ल्यू. क्लटरबक, आर. लोएल आणि एच. रेसट्रिक यांनी १९३२ च्या सुमारास केले. त्यानंतर १९३८-४० या कालखंडात एच्. डब्ल्यू. फ्लोरी, ई. चेन आणि त्यांचे सहकारी यांनी ऑक्सफर्ड येथे संशोधन करून पेनिसिलिनाचे एक घनरूप लवण मिळविले. हे पूर्णपणे शुद्ध नव्हते, तरी मानव व इतर प्राणी यांवर त्याचा काय परिणाम होतो ह्याचा अभ्यास करता आला आणि त्यावरून असे दिसून आले की, ते जतुंप्रतिकारक म्हणून वापरण्यायोग्य आहे.
पेनिसिलिनांची निर्मिती करून त्यांच्या उपयोगासंबंधी सांगोपांग माहिती मिळविण्याचे महत्त्वाचे कार्य ब्रिटन व अमेरिका यांच्या सहकार्याने दुसर्या महायुद्धाच्या काळी पार पडले आणि या आद्य प्रतिजैवाचा प्रसार झाला. इतकेच नव्हे, तर त्यामुळे जे ज्ञान प्राप्त झाले त्याच्या साहाय्याने दुसरे अनेक प्रतिजैव पदार्थ प्रचारात आले.
बुरशीवर संशोधन करणारे कवकवैज्ञानिक (Mycologists)
- डॉ. प्रा. लीफ रिव्हरर्डन : हे नॉर्वेत वास्तव्यास असलेले जगप्रसिद्ध बुरशी अभ्यासक वयाच्या ७८ व्या वर्षीही अॅमेझॉनच्या जंगलात बुरशीचे संशोधन करतात.
- डॉ. जितेंद्र वैद्य : संशोधक डॉ. जितेंद्र वैद्य यांनी काही वर्षांपूर्वी बुरशींबद्दल बरीच उल्लेखनीय माहिती जाहीर केली होती.
- १९९६मध्ये शेखर भोसले यांनी लाकूड कुजविणार्या बुरशींवर केलेले त्यांचे संशोधन प्रसिद्ध केले होते.
- ए.व्ही. साठे यांनी शंभरहून अधिक खाद्य बुरशींच्या जातींचा शोध लावला.
- सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातील कवकवैज्ञानिक डॉ किरण रामचंद्र रणदिवे : यांनी पुणे जिल्ह्यातील 'लाकूड कुजविणार्या बुरशी' या विषयावर संशोधन करून दीड हजारांहून अधिक बुरशींचा माहितीसाठा तयार केला होता. त्यांच्या फंगी फ्रॉम इंडिया या वेबसाइटसाठी नुकताच त्यांनी गेल्या बारा वर्षांत विशेष प्रयत्न घेऊन देशभरातील साडे सात हजार बुरशींचा माहितीसंग्रह उपलब्ध केला आहे.
- डॉ. विजय डी. रानडे आणि डॉ. किरण रणदिवे : पुणे जिल्ह्यातील या दोन कवकवैज्ञानिकांनी सुमारे वीस वर्षे पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत फिरून 'स्लाइम मोल्ड' अर्थात मिक्झोमायसिस्ट या दुर्मिळ बुरशीच्या ८१ प्रकारांची नोंद केली आहे.
- पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील बुरशींची एक प्राथमिक यादी प्रसिद्ध केली होती.