"मल्लखांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १८: | ओळ १८: | ||
वेतावर केला जाणारा प्रकार. |
वेतावर केला जाणारा प्रकार. |
||
==टांगता मल्लखांब== |
==टांगता मल्लखांब== |
||
== |
==जुन्या काळचे प्रसिद्ध मल्लखांबपटू व प्रचारक== |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* |
* कोंडभटनाना गोडबोले |
||
* दामोदरगुरू मोघे - वडोदरा |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* गोविंदराव तातवडेकर - वडोदरा |
* गोविंदराव तातवडेकर - वडोदरा |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* |
* दामोदरगुरू मोघे - वडोदरा |
||
⚫ | |||
⚫ | |||
* दामोदर बळवंत भिडे - सातारा |
* दामोदर बळवंत भिडे - सातारा |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* भाऊराव गाडगीळ - पुणे |
* भाऊराव गाडगीळ - पुणे |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* वसंत बळवंत कप्तान - वडोदरा |
|||
⚫ | |||
⚫ | |||
===सद्य=== |
===सद्य=== |
||
⚫ | |||
* आबा घाडगे |
* आबा घाडगे |
||
⚫ | |||
* दत्ता शिरसाठ |
* दत्ता शिरसाठ |
||
* दीपक पाटील |
* दीपक पाटील |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* नेहा घायाळ |
* नेहा घायाळ |
||
⚫ | |||
⚫ | |||
* मानके शिवप्रसाद |
|||
* पूनम कुलथे |
* पूनम कुलथे |
||
⚫ | |||
* मीनल बाठे (महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेच्या आजीवन सदस्य) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* शिवप्रसाद मानके |
|||
==संस्था== |
==संस्था== |
||
* मुंबई उपनगर जिल्हा मलखांब संघटना |
* मुंबई उपनगर जिल्हा मलखांब संघटना |
१२:११, २० जून २०१६ ची आवृत्ती
मल्लखांब अथवा मलखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे.
कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते.
इतिहास
मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. परंतु लिखित स्वरूपात हा फारसा आढळत नाही. रामायणकाळात हनुमंतानी मल्लखांबाचा शोध लावला असे सांगितले जाते. सोमेश्वर चालुक्याने सन ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवे कालावधी नंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली. गुराखी समाजात मलखांबाचे महत्त्व मोठे आहे.
बाळंभट देवधर
दुसर्या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर (जन्म : इ.स. १७८०; मृत्यू : इ.स. १८५२) यांचे नाव घेतले जाते. मीनल बाठे यांनी ‘एक होता बाळंभट’ नावाचे बाळंभटांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहासही आला आहे. बडोदा येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा ३रा खंड इ.स. १९३२मध्ये प्रकाशित झाला. या खंदात बाळंभट देवधरांचे मल्लखांबाचे आद्यगुरू म्हणून उल्लेख आहे. महाराष्ट्राबाहे उज्जैन आखाडा, झांशी व ग्वाल्हेर आखाड्यांचे स्मृतिअंक, वाराणसी येथील व्यायाम नावाचे मासिक्यांत बाळंभटांपासून सुरू झालेली व्यायाम परंपरा आणि मल्लखांब यांचा उल्लेख आहे. गुजराथमध्ये आजही मल्लखांब असलेली आखाडे आहेत.
मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या चरित्रपुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे.
स्वरूप
लाकडी स्तंभ
मल्लखांब हा लाकडाचा एक स्तंभ असतो. याची उंची सुमारे आठ फूट असते. हा सरळ, गुळगुळीत, वर निमुळता होत जाणारा असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत पक्का बसवलेला असतो. त्याच्या जमिनीवरील भागाचा आकार वर गोल , मग अरुंद भाग खाली भक्कम खांब असा असतो.
दोरी
हा हलता मलखांबाचा प्रकार टांगलेल्या दोरखंडावर केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो.
वेताचा मल्लखांब
वेतावर केला जाणारा प्रकार.
टांगता मल्लखांब
जुन्या काळचे प्रसिद्ध मल्लखांबपटू व प्रचारक
- सरदार अनंत हरी खासगीवाले - पुणे
- कासमभाई - पुणे
- कोंडभटनाना गोडबोले
- गजाननपंत टिळक - वडोदरा
- गणेश सखाराम वझे मास्तर - पुणे
- गोविंदराव तातवडेकर - वडोदरा
- जुम्मादादा - वाराणसी
- टके जमाल - वाराणसी
- दामोदरगुरू मोघे - वडोदरा
- दामोदर बळवंत भिडे - सातारा
- धोंडो नारायण विद्वांस - वडोदरा
- नारायणगुरू देवधर
- बाळंभटदादा देवधर - दुसर्या बाजीराव पेशव्यांचा काळ (पहिला ‘आखाडा’ वाराणसी येथे स्थापन केला.)
- भाऊराव गाडगीळ - पुणे
- प्रा. माणिकराव
- रंगनाथ वाटोरे - वडोदरा
- रामचंद्र हरनाथ पेंटर - ग्वाल्हेर
- लक्ष्मण नारायण सप्रे - वडोदरा
- वसंत बळवंत कप्तान - वडोदरा
- विष्णू मार्तंड डिंगरे - उज्जैन
- हरी महादेव तथा तात्यासाहेब सहस्रबुद्धे - वडोदरा
सद्य
- आदित्य म्हसकर
- आबा घाडगे
- दत्ता शिरसाठ
- दीपक पाटील
- नेहा घायाळ
- पूनम कुलथे
- मंगेश वायकूळ
- मीनल बाठे (महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेच्या आजीवन सदस्य)
- यशवंत जाधव
- रमेश वझे
- राजेश्वरी पिल्लई
- विवेक तापकिरे
- शिवप्रसाद मानके
संस्था
- मुंबई उपनगर जिल्हा मलखांब संघटना
- साने गुरुजी आरोग्य मंदिर (मिलन सिग्नलजवळ, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई (9869121410, 9869577130))
- हौशी मलखांब संघटना
- अकोला जिल्हा मलखांब संघटना
- नाशिक जिल्हा मलखांब संघटना
स्पर्धा
- जिल्हा निवड स्पर्धा
- जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा
- भाऊसाहेब रानडे नवोदित मलखांब स्पर्धा
- प्रबोधन मल्लखांब स्पर्धा
- आंतरशालेय मलखांब स्पर्धा
- मुंबई महापौर चषक
- अखिल भारतीय निमंत्रित मलखांब स्पर्धा
- राज्यस्तरीय मिनी स्पर्धा
- सबज्युनिअर मलखांब स्पर्धा
- मॉरिशस विश्व मलखांब स्पर्धा
हे सुद्धा पहा
पुस्तके
- म म मल्लखांबाचा महाराष्ट्राचा - श्रीनिवास हवालदार