"हर्षद राव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पुण्याचे हर्षद राव हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठी ग... |
(काही फरक नाही)
|
२२:०२, २२ मे २०१६ ची आवृत्ती
पुण्याचे हर्षद राव हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठी गिर्यारोहक आहेत.
हर्षदचे शिक्षण पुण्याच्या मुक्तांगण शाळेत झाले. पुणे विद्यापीठातून त्याने बी.एस्सी. केले आहे. गिर्यारोहणाच्या आवडीतून त्याने सह्याद्रीतील खडा पारशी आणि ड्यूक्स नोज आदी चढाया यशस्वी केल्या. उत्तरकाशीमधील नेहरू गिर्यारोहण संस्थेतून आणि दार्जिलिंगच्या हिमालयन इन्स्टिट्यूटमधून त्याने गियारोहणाचे प्रशिक्षण घेतले.
हर्षद रावने पुढे हिमालयातील जोगीण १ व जोगीण ३ ही गंगोत्रीजवळ असलेली शिखरे, तसेच उत्तराखंडमधील जॉनली हे शिखर सर केले.
हर्षद राव एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी पुण्यातून २०१६ सालच्या मार्च महिन्यात काठमांडूला रवाना झाला. एप्रिलच्या प्रारंभी त्याने बेस कॅम्प गाठला. खुंबू ग्लेशियरमध्ये त्याने सराव केला.मग त्याने १ ते ३ या कॅम्पपर्यंत टप्प्याटप्प्याने चढाई करून, परत बेस कॅम्पवर येण्याचा सराव केला. त्यामुळे हवामानाशी जुळवून घेणे त्याला शक्य झाले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हर्षदने २० मे रोजी एव्हरेस्ट चढणे सुरू केले. हवामान अनुकूल असल्याचा अंदाज मिळताच रात्री त्याने अंतिम चढाई केली आणि २१ मे २०१६च्या सकाळी सव्वाआठ वाजता एव्हरेसट शिखर सर केले.