हर्षद राव
Appearance
हर्षद राव हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठी गिर्यारोहक आहेत.
हे मूळचे पुण्याचे असून यांचे शिक्षण मुक्तांगण शाळेत झाले. पुणे विद्यापीठातून त्याने बी.एस्सी. केले आहे. त्यांनी सह्याद्रीतील खडा पारशी आणि ड्यूक्स नोज, इतयादींवर चढाई केली. उत्तरकाशीमधील नेहरू गिर्यारोहण संस्थेतून आणि दार्जिलिंगच्या हिमालयन इन्स्टिट्यूटमधून त्याने गियारोहणाचे प्रशिक्षण घेतले.
हर्षद रावने पुढे हिमालयातील जोगीण १ व जोगीण ३ ही गंगोत्रीजवळ असलेली शिखरे, तसेच उत्तराखंडमधील जॉनली हे शिखर सर केले.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हर्षदने २० मे रोजी एव्हरेस्ट चढणे सुरू केले आणि अनुकूल हवामानात रात्री त्याने अंतिम चढाई करून २१ मे २०१६ च्या सकाळी सव्वाआठ वाजता एव्हरेसट शिखर सर केले.