Jump to content

"धनंजय चंद्रचूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:

==वकिली आणि न्यायाधीशी==
==वकिली आणि न्यायाधीशी==
मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना चंद्रचूडांनी रिझव्‍‌र्ह बँक, ओएनजीसी यासह अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांसह अन्य महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मुंबईतील चौपाट्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून झालेल्या दुरवस्थेबाबत अहवाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत ते सदस्य होते. त्यांची १९९८ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, तर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी शपथविधी झाला.
मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना चंद्रचूडांनी रिझव्‍‌र्ह बँक, ओएनजीसी यासह अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांसह अन्य महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मुंबईतील चौपाट्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून झालेल्या दुरवस्थेबाबत अहवाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत ते सदस्य होते. त्यांची १९९८ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, तर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी शपथविधी झाला. १३ मे २०१६ रोजी चंद्रचूड सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झाले.

==मुंबईच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना==

ओळ १३: ओळ १३:
मानवाधिकार आयोगाने सरकारला किंवा प्रशासनाला दिलेले निर्देश हे सरकारवर बंधनकारकच असतात’, ‘शिक्षणाचा मूलभूत हक्क यशस्वी होण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांनी सरकारी शाळांतच आपल्या पाल्यांना शिकवावे’ यासारखे निर्णय त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिले. बेकायदा वाळू उत्खनन, लैंगिक छळवादातून झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणासारख्या जनहिताच्या बाबींवर महत्वाचे निकालही त्यांनी तेथून दिले.

==व्याख्याबे==
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
जगभरातील विद्यापीठे आणि परिषदांमध्ये धनंजय चंद्रचूड यांची त्यांची नियमितपणे व्याख्याने होत असतात.
[[वर्ग:भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश]]

०६:०९, १८ मे २०१६ ची आवृत्ती

डॉ. धनंजय चंद्रचूड (जन्म : पुणे, ११ नोव्हेंबर, इ.स. १९५९) हे भारताच्या दिल्ली येथल्या सर्वोच्च न्यायालयातील एक मराठी न्यायमूर्ती आहेत. त्यांचे वडील यशवंतराव उर्फ वाय.व्ही. चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते, आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय संगीत गायिका आहेत.

शिक्षण

धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथ्रेडल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केल्यावर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एल्‌‍एल.बी. आणि हार्वर्ड विद्यापीठातून एल्‌‍एल.एम.प्राप्त केली. त्यानंतर हॉर्वर्डमधून ‘जोसेफ बेले’ पारितोषिकासह न्यायशास्त्र (ज्युरिडिकल सायन्स) विषयात डॉक्टरेटही मिळविली.

वकिली आणि न्यायाधीशी

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना चंद्रचूडांनी रिझव्‍‌र्ह बँक, ओएनजीसी यासह अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांसह अन्य महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मुंबईतील चौपाट्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून झालेल्या दुरवस्थेबाबत अहवाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत ते सदस्य होते. त्यांची १९९८ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, तर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी शपथविधी झाला. १३ मे २०१६ रोजी चंद्रचूड सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झाले.

मुंबईच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना

मुंबईच्या कारकीर्दीत ‘भारतातील कंपनीचे समभाग परदेशात हस्तांतर केल्यावर झालेल्या भांडवली वृद्धीवर (कॅपिटल गेन) भारतात कर आकारला जाऊ शकतो,’ हा त्यांचा निकाल देशासाठी आजही महत्त्वाचा आहे. ‘मुंबईतील वारसा-वास्तूंवर जाहिरातफलक लावू नयेत’, ‘मुंबईतील सर्व टॅक्सी व बसगाड्या डीझेलवर न चालवता त्यांचे सीएनजीकरण करावे’ , ‘मुंबई महानगर प्रदेशातील सर्व कांदळवनांचे उपग्रह-नकाशे तयार करावे’ यासारखे मुंबईची शान राखणारे, तसेच पुण्यातील हरित पट्ट्यांचे संरक्षण व त्यांची वाढ करणे, वृक्षप्राधिकरणाचे अधिकार आदींबाबतचे निर्णयही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून दिले.

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना

मानवाधिकार आयोगाने सरकारला किंवा प्रशासनाला दिलेले निर्देश हे सरकारवर बंधनकारकच असतात’, ‘शिक्षणाचा मूलभूत हक्क यशस्वी होण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांनी सरकारी शाळांतच आपल्या पाल्यांना शिकवावे’ यासारखे निर्णय त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिले. बेकायदा वाळू उत्खनन, लैंगिक छळवादातून झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणासारख्या जनहिताच्या बाबींवर महत्वाचे निकालही त्यांनी तेथून दिले.

व्याख्याबे