Jump to content

"समीर अंजान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७५: ओळ ७५:
* १९९३ - सर्वोत्तम गीतकार - [[दीवाना (१९९२ चित्रपट)|दीवाना]] मधील ''तेरी उम्मीद तेरा इंतजार''
* १९९३ - सर्वोत्तम गीतकार - [[दीवाना (१९९२ चित्रपट)|दीवाना]] मधील ''तेरी उम्मीद तेरा इंतजार''
* १९९४ - सर्वोत्तम गीतकार - [[हम हैं राही प्यार के]] मधील ''घुंघट की आड से''
* १९९४ - सर्वोत्तम गीतकार - [[हम हैं राही प्यार के]] मधील ''घुंघट की आड से''

==संदर्भ==
[https://www.google.co.in/search?q=sameer+lyricist+songs+list&ie=utf-8&oe=utf-8&gws_rd=cr&ei=8Xa7VsPNOY6vuQTO8oGICQ समीरच्या गीतांची जंत्री]


{{कॉमन्स वर्ग|Sameer (lyricist)|समीर}}
{{कॉमन्स वर्ग|Sameer (lyricist)|समीर}}

२३:१९, १० फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

समीर

समीर अंजान
आयुष्य
जन्म २४ फेब्रुवारी, १९५८ (1958-02-24) (वय: ६६)
जन्म स्थान बनारस, उत्तर प्रदेश
संगीत साधना
गायन प्रकार गीतकार
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९८४ - चालू

'समीर अंजान पाण्डेय (जन्म : २४ फेब्रुवारी, इ.स. १९५८) ऊर्फ शीतल पांडे'' हे एक भारतीय चित्रपट गीतकार आहेत. समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदले गेले आहे. (पूर्वीचे रेकॉर्ड गीतकार आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती.)

इतिहास

बॅंक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि या बेभरवशाच्या सिनेक्षेत्रात पाऊल टाकले.

सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.

संगीत दिग्दर्शक

चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी ३५ वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली.

चित्रपट

‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, या आणि अन्य अनेक चित्रपटांसाठी समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत.

समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत.

गाजलेली गाणी

समीर यांची गाजलेली गाणी

  • आए हो मेरी जिंदगी में
  • आखों ने तुम्हारी
  • आपके प्यार मे हम
  • घुंगट की आड से
  • चाहा है तुझको
  • जो हाल दिल का
  • तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
  • तेरी उम्मीद तेरा इंतजार
  • धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
  • धूम मचा ले धूम
  • दिल ने दिल से क्या कहा
  • दिल है के मानता नही
  • देखो जरा देखो
  • नजर के सामने जिगर के पास
  • परदेसी परदेसी जाना नही
  • पहेली नजर में
  • मुझे नींद न आए, मुझे चैन न आए न
  • मुश्कील बडी है रस्म ए मोहब्बत
  • मेरी साँसों में तुम
  • मैं दीवानी हूँ
  • मैंै दुनिया भूला दुंगा
  • मैने प्यार तुम्हीसे
  • सांसो की जरुरत है जैसे, वगैरे वगैरे.

पुरस्कार

सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून समीर यांना ‘स्क्रीन’ पुरस्कारासह अन्य अनेक पुरस्कार विविध गाण्यांसाठी मिळाले आहेत.

फिल्मफेअर पुरस्कार

संदर्भ

समीरच्या गीतांची जंत्री

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत