Jump to content

"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३२: ओळ ३२:


==उल्लेखनीय==
==उल्लेखनीय==
प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
* प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
* प्रशांत दामले यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कार प्रदान झाला आहे. (२०-१-२०१६)


==कार्य==
==कार्य==

२३:१०, ९ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

प्रशांत दामले
जन्म प्रशांत पुरुषोत्तम दामले
५ एप्रिल, इ.स. १९६१
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी, हिंदी दूरचित्रवाणी
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८३ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके चार दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे
प्रमुख चित्रपट वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन
पुरस्कार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
नाट्यदर्पण
अखिल भारतिय नाट्य पारिषद

प्रशांत पुरुषोत्तम दामले (५ एप्रिल, इ.स. १९६१[]; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे.

जीवन

मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९७८(की १९८३?) मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.

उल्लेखनीय

  • प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
  • प्रशांत दामले यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कार प्रदान झाला आहे. (२०-१-२०१६)

कार्य

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत(५-१-२०१३) एकूण १०७०० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत. ५ जानेवारीला २०१३रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.

प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.

चित्रपट

प्रशांत दामले यांनी भूमिका केलेले मराठी चित्रपट --


नाटके

हिंदी मालिका

  • चंद्रकांत चिपलुनकर सिढी बम्बावाला

संदर्भ

  1. ^ http://www.prashantdamle.com/profile.html. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे