"जी.एन. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४९: ओळ ४९:

==पहिले भावगीत==
==पहिले भावगीत==
‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्‍या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत [[मेहेकर]]चे कवी [[ना.घ. देशपांडे]] यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.
‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्‍या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत [[मेहेकर]]चे कवी [[ना.घ. देशपांडे]] यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत (हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन कंपनीत) प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.

इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफन खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.
इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.

एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्‍याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रुपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे. अर्थात त्यात जोशी यांचा मुख्य वाटा नसला तरी स्टुडिओ उपलब्ध करून देणे, गायक व वादकांची रिहर्सलचे वेळापत्रक याचे ताळतंत्र पुन्हा त्यांनाच बघावे लागे. त्यात कलाकारांचा मूड सांभाळणे, त्यांना न दुखावणे ही मोठी जबाबदारी असायची. एचएमव्हीत ४० वर्षे जी. एन. जोशी यांनी हे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी. एन. जोशी हे एचएमव्हीतले दादा अधिकारी समजले जात.

==जी.एन. जोशींच्या भावगीतांच्या सीडीज==
जी.एन. जोशींच्या जन्म शताब्दी वर्षात म्हणजे २००९ साली, एचएमव्हीने जोशींना मानवंदना देण्यासाठी कंपनीने त्यांच्या आवाजातील जुन्या ४३ भावगीतांच्या ‘स्वरगंगेच्या तीरी’ नावाचा दोन सीडींचा संच बाजारात आणला असून त्यात जोशी यांच्या आवाजातील फिरत, लयकारी, खटके-मुरके याचा आस्वाद रसिकांना घेता येतो.

==जी.एन. जोशी यांनी गायलेली सुरुवातीची अन्य लोकप्रिय भावगीते==
==जी.एन. जोशी यांनी गायलेली सुरुवातीची अन्य लोकप्रिय भावगीते==

००:१९, २३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

जी.एन. जोशी
आयुष्य
जन्म ६ एप्रिल, इ.स. १९०९
जन्म स्थान भारत
मृत्यू सप्टेंबर २२, १९९४
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
नातेवाईक गायक अभिजित ताटके (नातू)
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

जी.एन. जोशी (६ एप्रिल, इ.स. १९०९ - सप्टेंबर २२, १९९४) हे मराठीतले भावगीत गायक होते. रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत मराठीतले पहिले भावगीत समजले जाते.

जी.एन. जोशी हे मुळात उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्ही (हिज मास्टर्स व्हॉईस रेकॉर्ड कंपनी)मध्ये अधिकारी असताना शास्त्रीय संगीताच्या कलाकारांकडून जोशी यांनी अनेक रेकॉर्ड्स करून घेतल्या.

एचएमव्हीत रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचा अधिकार दिला. जी.एन. जोशी, रमाकांत रूपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला आकार दिल्याचे समजले जाते.

एचएमव्हीत ४० वर्षे जी.एन. जोशी यांनी हे काम सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते.

पहिले भावगीत

‘रानारानांत गेली बाई शीळ गं, राया तुला रे काळवेळ नाही, ताळमेळ नाही’ असे म्हणणार्‍या एका प्रेमात पडलेल्या तरुणीचे हे मनोगत मेहेकरचे कवी ना.घ. देशपांडे यांनी लिहिले होते. जोशी यांनी ते निवडले व चाल लावून म्हणायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात रमाकांत रूपजी यांनी ते ऐकले व त्याची रेकॉर्ड करण्याचे ठरले. या शीळेच्या गाण्यामुळेच जोशी यांचा एचएमव्हीत (हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन कंपनीत) प्रवेश झाला व पुढे या शीळेनेच त्यांना वकिलीचे ज्ञान विसरण्यास भाग पाडले.

इ.स. १९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला.

एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्‍याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रुपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे. अर्थात त्यात जोशी यांचा मुख्य वाटा नसला तरी स्टुडिओ उपलब्ध करून देणे, गायक व वादकांची रिहर्सलचे वेळापत्रक याचे ताळतंत्र पुन्हा त्यांनाच बघावे लागे. त्यात कलाकारांचा मूड सांभाळणे, त्यांना न दुखावणे ही मोठी जबाबदारी असायची. एचएमव्हीत ४० वर्षे जी. एन. जोशी यांनी हे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी. एन. जोशी हे एचएमव्हीतले दादा अधिकारी समजले जात.

जी.एन. जोशींच्या भावगीतांच्या सीडीज

जी.एन. जोशींच्या जन्म शताब्दी वर्षात म्हणजे २००९ साली, एचएमव्हीने जोशींना मानवंदना देण्यासाठी कंपनीने त्यांच्या आवाजातील जुन्या ४३ भावगीतांच्या ‘स्वरगंगेच्या तीरी’ नावाचा दोन सीडींचा संच बाजारात आणला असून त्यात जोशी यांच्या आवाजातील फिरत, लयकारी, खटके-मुरके याचा आस्वाद रसिकांना घेता येतो.

जी.एन. जोशी यांनी गायलेली सुरुवातीची अन्य लोकप्रिय भावगीते

  • अशी घाल गळा मिठी बाळा
  • आकाशीच्या अंतराळी (कवी - अनिल)
  • आमराईत कोयल बोले (कवी - स.अ. शुक्ल)
  • आमुचे नाव आंसू ग
  • आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला
  • उघड दार उघड दार
  • एकटीच भटकत नदीकाठी
  • एकत्र गुंफून जीवित-धागे
  • कन्हैय्या दिसशी किती साधा (कवी - स.अ. शुक्ल)
  • काळ्या गढीच्या जुन्या
  • चकाके कोर चंद्राची (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगूबाई हनगळ). कवी - स.अ. शुक्ल
  • चल रानात साजणा (कवी - स.अ. शुक्ल)
  • जादुगारिणी सखे साजणी (कवी - स.अ. शुक्ल)
  • झुळझुळ वाहे चंद्रभागा (कवी - स.अ. शुक्ल)
  • डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको (कवी ना.घ. देशपांडे).हे गाणे पुढे सुधीर फडके यांच्याही आवाजात ध्वनिमुद्रित झाले.
  • डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका (कवी भा.रा. तांबे. हे गाणे पुढे लता मंगेशकर यांनीही गायले. तेव्हा त्याचे संगीत वसंत प्रभू यांचे होते.
  • तू तिथे अन मी इथे हा (सहगायिका गांधारी ऊर्फ गंगूबाई हनगळ). कवी - स.अ. शुक्ल
  • देव माझा तू कन्हैय्या (कवी - स.अ. शुक्ल)
  • नज सोडवे पदाला
  • नदीकिनारी, नदीकिनारी गं (कवी ना.घ. देशपांडे)
  • प्रिय जाहला कशाला (कवि.- वि.द. घाटे)
  • प्रेम कोणीही करेना, का अशी फिर्याद खोटी
  • फार नको वाकू जरी
  • बहु असोत सुंदर
  • मंजूळ वच बोल सजणा (सहगायिका लीला लिमये). कवी - स.अ. शुक्ल
  • मध्यरात्रिला पडे तिच्या दारावरती थाप
  • माझ्या फुला उमल जरा (कवि.- वि.द. घाटे)
  • या तारका सूर बालिका (कवी - स.अ. शुक्ल)
  • रानारानांत गेली बाई शीळ
  • राया येता जवळ मनमोहना (कवी - स.अ. शुक्ल)
  • विसरून जा (कवी - अनिल)
  • क्षणभर भेट आपुली

जी.एन. जोशी यांनी लिहिलेले पुस्तक

  • स्वरगंगेच्या तीरी (आत्मचरित्र). या पुस्तकाचे Down Melody Lane नावाचे इंग्रजी भाषांतर Orient Longman या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

कॉम्पॅक्ट डिस्क्स

  • एचएमव्हीने जी.एन.जोशींच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या इ.स. १९३५ सालापासूनच्या जुन्या ४३ गाण्याच्या दोन सीडीज काढल्या आहेत, त्या सीडीजचेही नाव ’स्वरगंगेच्या तीरी’ असे आहे.

जी.एन. जोशी यांच्यावरील माहितीपट

  • स्वरगंगेचा साधक (माहितीपट)

बाह्य दुवे