"मिर्झा गालिब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Mirza Ghalib photograph.jpg|thumb|right|मिर्झा गालिब]] |
[[चित्र:Mirza Ghalib photograph.jpg|thumb|right|मिर्झा गालिब]] |
||
'''मिर्झा असदुल्लाखान गालिब''' ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) एक प्रसिद्ध [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[उर्दू]] कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी [[इस्लाम धर्म|इस्लामचे]] धडे घेतले, फारसी भाषा शिकले. |
'''मिर्झा असदुल्लाखान गालिब''' ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) एक प्रसिद्ध [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[उर्दू]] कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, र्जा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी [[इस्लाम धर्म|इस्लामचे]] धडे घेतले, फारसी भाषा शिकले. |
||
मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नी [[मस्तानी]] हिच्या वंशात जन्माला आले होते. |
मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नी [[मस्तानी]] हिच्या वंशात जन्माला आले होते. |
||
गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १,०००-१,२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. |
गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १,०००-१,२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. |
||
गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर [[मोगल]] काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत ''माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार''. |

गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. |
|||
गालिबच्या कवितांचा परिचय [[सेतू माधव पगडी]], [[वसंत पोतदार]] आणि [[विद्याधर गोखले]] आदी मराठी लेखकांनी करून दिला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी तर ’गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा ग्रंथराज लिहिला असून रसिकांना शब्दागणिक तो समजावा म्हणून गालिबच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ देऊन त्यांनी गालिब जाणत्या वाचकांपर्यंत पोचविण्याची अपूर्व धडपड केली आहे. या ग्रंथात गालिबच्या गझलाच्या पहिल्या ओळीची सूची, पहिल्या शेरातील दुसर्या चरणाची अंत्ययमकानुसार (रदीफनुसार) सूची अशी परिशिष्ठे असल्याने ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे. |

ओळ १५: | ओळ १७: | ||
---- |
---- |
||
== गालिब यांच्या |
== गालिब यांच्या रचनांची पुस्तके == |
||
'''दीवान-इ-गालिब''' (१८४१) उर्दू |
'''दीवान-इ-गालिब''' (१८४१) उर्दू |
||
ओळ २९: | ओळ ३१: | ||
'''उर्दू-द-मुंआल्ला''' (१८६९) उर्दू ग्रंथ |
'''उर्दू-द-मुंआल्ला''' (१८६९) उर्दू ग्रंथ |
||
---- |
|||
==मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती== |
|||
* दिले नादाँ तुझे हुआँ क्या |
|||
* नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने |
|||
* हजारो ख्वाईशे ऐसी, काबां किस नूर से जाओगे गालिब |
|||
२३:३६, २२ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
मिर्झा असदुल्लाखान गालिब ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, र्जा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले.
मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते.
गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १,०००-१,२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले.
गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.
गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते.
गालिबच्या कवितांचा परिचय सेतू माधव पगडी, वसंत पोतदार आणि विद्याधर गोखले आदी मराठी लेखकांनी करून दिला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी तर ’गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा ग्रंथराज लिहिला असून रसिकांना शब्दागणिक तो समजावा म्हणून गालिबच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ देऊन त्यांनी गालिब जाणत्या वाचकांपर्यंत पोचविण्याची अपूर्व धडपड केली आहे. या ग्रंथात गालिबच्या गझलाच्या पहिल्या ओळीची सूची, पहिल्या शेरातील दुसर्या चरणाची अंत्ययमकानुसार (रदीफनुसार) सूची अशी परिशिष्ठे असल्याने ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे.
चित्रपट
मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला असून दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्या चित्रपटाचे गुलझार होते.
गालिब यांच्या रचनांची पुस्तके
दीवान-इ-गालिब (१८४१) उर्दू
कुल्लियत-इ-गालिब (१८४५) फारसी
कातिअ-ह-बुर्हान (१८६१) फारसी ग्रंथ
मिहर-ह-नीमरोज (१८५४) फारसी ग्रंथ
कल्लियत-ह-नस्र (१८६८) फारसी ग्रंथ
उद-द-हिंदी (१८६८) उर्दू ग्रंथ
उर्दू-द-मुंआल्ला (१८६९) उर्दू ग्रंथ
मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
- दिले नादाँ तुझे हुआँ क्या
- नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
- हजारो ख्वाईशे ऐसी, काबां किस नूर से जाओगे गालिब