Jump to content

"रवींद्र जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो दुवा
(चर्चा | योगदान)
ओळ १५: ओळ १५:
* गीत गाता चल
* गीत गाता चल
* चितचोर
* चितचोर
* चोर मयाचे शोर
* चोर मचाये शोर
* तपस्या
* दो जासूस
* दो जासूस
* नदियाँ के पार
* [[बारोमास (चित्रपट)]]
* पति, पत्‍नी और वो
* फकिरा
* [[बारोमास|बारोमास (चित्रपट)]]
* राम तेरी गंगा मैली
* राम तेरी गंगा मैली
* विवाह
* सौदागर
* सौदागर
* हीना
* हीना

१८:०१, ११ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

रवींद्र जैन (२१ फेब्रुवारी, इ.स. १९४४:अलीगड, उत्तर प्रदेश, भारत - ९ ऑक्टोबर, इ.स. २०१५):मुंबई, महाराष्ट्र हे एक गीतकार गायक व हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक होते.

आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन हे रवींद्र जैन यांचे आईवडील होते. अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच 'कान' होता. जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पं‌डित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले.

चित्रपट संगीताची कारकीर्द

ऑल इंडिया रेडिओ'साठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली व त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यावर जैन यांनी मोठमोठ्या निर्मात्यांसोबत काम करायला सुरुवात केली. १९७२ मध्ये जैन यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला 'काँच और हिरा' या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. महंमद रफी यांच्या आवाजात त्यांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. मात्र, ते गाणे रिलीज झाले नव्हते.

१९७०च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी त्यांनी ‌संगीत दिलेले चित्रपट गाजले. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराथी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले.

रवींद्र जैन यांचे भक्ति संगीताचे काही आल्बम आहेत. मॉर्निंग सन’ हा त्यांचा आल्बम विशेष प्रसिद्ध आहे.

रवींद्र जैन यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट

  • आँखियोंके झरोके से
  • एक विवाह ऐसा भी था
  • गीत गाता चल
  • चितचोर
  • चोर मचाये शोर
  • तपस्या
  • दो जासूस
  • नदियाँ के पार
  • पति, पत्‍नी और वो
  • फकिरा
  • बारोमास (चित्रपट)
  • राम तेरी गंगा मैली
  • विवाह
  • सौदागर
  • हीना

रवींद्र जैन यांचे संगीत असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • अलीफ लैला
  • इतिहास की प्रेरम कहानियाँ
  • जय गंगा मैय्या
  • रामायण
  • लवकुश
  • साई बाबा


रवींद्र जैन यांचे संगीत असलेली काही प्रसिद्ध गाणी

  • अखियोंके झरोके से (चित्रपट - अखियोंके झरोके से)
  • गंगासागर
  • गोपालकृष्ण
  • गोरी तेरा गाँव बडा प्यारा (चित्रपट -चितचोर)
  • जब दीप जले आना (राग यमन, चित्रपट -चितचोर)
  • तू जो मेरे सुरमें (चित्रपट -चितचोर)
  • मेघा ओ रे मेघा (चित्रपट - सुनयना)
  • मैं वही दर्पण वही (चित्रपट - गीत गाता चल)
  • मैं हूँ खुशरंग (चित्रपट - हीना)
  • श्याम तेरी बन्सी पुकारे नाम (चित्रपट - गीत गाता चल)
  • सजना है मुझे सजना के लिये (चित्रपट - सुदागर)
  • सुन साहिबा सुन (चित्रपट - राम तेरी गंगा मैली)
  • हर हर गंगे

रवींद्र जैन यांना मिळालेले पुरस्कार

  • १९८५ मध्ये 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटासाठी जैन यांना सर्वोत्कृष्ट संगीतकारासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
  • २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार देऊन जैन यांचा गौरव केला होता.
  • फिल्मफेअर पुरस्कार २००३
  • महाराष्ट्र सरकारनेही जैन यांचा गानसम्राज्ञा लता मंगेशकर हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे.
  • आशा भोसले पुरस्कार)
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमीर खुस्रो पुरस्कारानेही जैन यांना गौरवले होते.
  • २०१५ सालचा पद्मश्री पुरस्कार
  • पुणे पीपल्स बँकेचा पुणे पीपल्स पुरस्कार

आत्मचरित्र

  • रवींद्र जैन यांनी ’सुनहरेपल’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे