"बाळ ज. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बांधणी |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
त्यांनी विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीस सुरुवात केली. लहानपणापासूनच मराठी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारे प्रेम यांमुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयीचे लेखन सुरू केले. तत्कालीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुळपुळे यांनी पंडितांचे नाव आकाशवाणीत सुचविले होते. क्रिकेट समालोचन करताना त्यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत क्रिकेट घराघरांत पोचवले. मैदानावर २० आणि मैदानाबाहेर ५० वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. त्यांनी शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन केले. रणजी, दुलीप आणि इराणी करंडक स्पर्धेच्या असंख्य सामन्याचेही समालोचन करून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. दीर्घ काळ (४२ वर्षे) समालोचन करण्याबद्दल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'नेही याची दखल घेतली. |

क्रीडा समीक्षक म्हणून जवळजवळ ५० वर्षे |
बाळ ज. पंडितांनी क्रीडा समीक्षक म्हणून जवळजवळ ५० वर्षे वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यांची ३० हून अधिक क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या 'पराक्रमी दौरा' आणि 'दी लिटल मास्टर' या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. ’आमने सामने’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांनी रसरंग. क्रीडाविश्व अशा अनेक मराठी मासिकांमधून लेखन केले आहे. |
||
क्रिकेटमध्ये मराठीमध्ये समालोचन त्यांच्यापासून झाले. त्यांनी मराठीत क्रिकेटमधील वेगवेगळे शब्द शोधून काढले आणि क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचविले. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेट समजण्यास सोपे गेले. क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचे योगदान राहिले आहे. |
क्रिकेटमध्ये मराठीमध्ये समालोचन त्यांच्यापासून झाले. त्यांनी मराठीत क्रिकेटमधील वेगवेगळे शब्द शोधून काढले आणि क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचविले. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेट समजण्यास सोपे गेले. क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचे योगदान राहिले आहे. मराठी वृत्तपत्रांत वापरले जाणारे षटक, षट्कार, चौकार, यष्टी, बाद, गोलंदाज, फलंदाज, सीमापार, आपटबार (बंपर) आदी क्रिकेटविषयक शब्द पंडितांनी सुचविलेले आहेत. |
||
बाळ पंडित एमए, एल्एलबी होते. एल्एलबीच्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठात तिसरे आले होते. क्रिकेट समालोचनाच्या कामाशिवाय बाळ ज. पंडित यांनी शैक्षणिक आणि धार्मिक संस्थावरही काम केले आहे. आळंदी देवस्थानचे देखील ते काही काळ विश्वस्त होते. शिक्षण प्रसारक मंडळींसारख्या नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. |

१५:३८, १९ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
बाळ जगन्नाथ पंडित (२४ जुलै, इ.स. १९२९ - १७ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते.
वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. ते रणजी चषक सामन्यांत खेळले. त्यासाठी मामा, चुलत भाऊ, वडील जगन्नाथ पंडित यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना रामभाऊ लेले यांसारखे क्रीडाप्रेमी शिक्षक लाभले. या शिक्षकाकडूनच त्यांना क्रिकेटच्या तंत्राबरोबरच जीवनाचे तंत्रही त्यांनी शिकविल्याची भावना पंडित नेहमीच व्यक्त करीत असत. लेले यांनी राजा केतकर, वसंत हसबनीस, मधु गुप्ते, माधव बर्वे अशा खेळाडूंनाही घडविलेले होते. रोहिंग्टन बारिया चषक स्पर्धेतून क्रिकेट खेळल्यानंतर बाळ ज. पंडितांनी सन १९५९-६० च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. मात्र मैदानापेक्षा मैदानाबाहेरील त्यांची कारकीर्द विशेष गाजली.
त्यांनी विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीस सुरुवात केली. लहानपणापासूनच मराठी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारे प्रेम यांमुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयीचे लेखन सुरू केले. तत्कालीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुळपुळे यांनी पंडितांचे नाव आकाशवाणीत सुचविले होते. क्रिकेट समालोचन करताना त्यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत क्रिकेट घराघरांत पोचवले. मैदानावर २० आणि मैदानाबाहेर ५० वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. त्यांनी शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन केले. रणजी, दुलीप आणि इराणी करंडक स्पर्धेच्या असंख्य सामन्याचेही समालोचन करून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. दीर्घ काळ (४२ वर्षे) समालोचन करण्याबद्दल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'नेही याची दखल घेतली.
बाळ ज. पंडितांनी क्रीडा समीक्षक म्हणून जवळजवळ ५० वर्षे वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यांची ३० हून अधिक क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या 'पराक्रमी दौरा' आणि 'दी लिटल मास्टर' या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. ’आमने सामने’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांनी रसरंग. क्रीडाविश्व अशा अनेक मराठी मासिकांमधून लेखन केले आहे.
क्रिकेटमध्ये मराठीमध्ये समालोचन त्यांच्यापासून झाले. त्यांनी मराठीत क्रिकेटमधील वेगवेगळे शब्द शोधून काढले आणि क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचविले. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेट समजण्यास सोपे गेले. क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचे योगदान राहिले आहे. मराठी वृत्तपत्रांत वापरले जाणारे षटक, षट्कार, चौकार, यष्टी, बाद, गोलंदाज, फलंदाज, सीमापार, आपटबार (बंपर) आदी क्रिकेटविषयक शब्द पंडितांनी सुचविलेले आहेत.
बाळ पंडित एमए, एल्एलबी होते. एल्एलबीच्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठात तिसरे आले होते. क्रिकेट समालोचनाच्या कामाशिवाय बाळ ज. पंडित यांनी शैक्षणिक आणि धार्मिक संस्थावरही काम केले आहे. आळंदी देवस्थानचे देखील ते काही काळ विश्वस्त होते. शिक्षण प्रसारक मंडळींसारख्या नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
बाळ ज. पंडित यांनी लिहिलेली पुस्तके (एकूण ३० हून अधिक)
- अटीतटीचे नियम
- अटीतटीचे सामने
- असे सामने असे खेळाडू
- आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग
- कसोटी क्रिकेटमधील मराठी खेळाडू (१९३२-२०००)
- क्रिकेट चौकार षटकार, भाग १ व २.
- क्रिकेट तंत्र आणि मंत्र
- दी लिटल मास्टर
- पराक्रमी दौरा
- पी. बाळू (चरित्र)
- लोकमान्यांचा मानसपुत्र : श्रीमंत जगन्नाथ महाराज पंडित
- सचिन तेंडुलकर
बाळ ज. पंडित यांची अनुवादित पुस्तके
- आयडॉल्स (व्यक्तिचित्रे, मूळ लेखक - सुनील गावसकर)
- रन्स अॅन्ड रुइन्स (मूळ लेखक - सुनील गावसकर)
- सनी डेज : एक आत्मचरित्र (मूळ लेखक - सुनील गावसकर)
- सुनील (मूळ लेखक - सुनील गावसकर)