"आनंदऋषीजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
==पहिले प्रवचन== |
==पहिले प्रवचन== |
||
आनंदऋषीजींनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिकून १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले. |
आनंदऋषीजींनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिकून १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले. संस्कृत-प्राकृत बरोबरच त्यांना मातृभाषा मराठी, आणि इंग्रजी, उर्दू, फारसी, गुजराती, हिंदी या भाषा उत्तम येत होत्या. गोड गळ्याची जन्मजात देणगी असलेल्या आनंदऋषीजींचे वक्तृत्व प्रभावी असल्याने त्यांच्या प्रवचनांची श्रोत्यांवर छाप पडे. |
||
==जैन धर्म प्रचार== |
==जैन धर्म प्रचार== |
||
आनंदऋषीजींनी पुढे रतनऋषीजींसोबत जैन धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलिपूर येथील (संथारा व्रतपश्चात्) |
आनंदऋषीजींनी पुढे रतनऋषीजींसोबत जैन धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलिपूर येथील (संथारा व्रतपश्चात्) मॄत्यूनंतर आनंदऋषीजींनी त्यांच्या गुरूशिवाय हिंगणघाट येथे पहिला चातुर्मास केला. |
||
==संस्थास्थापना== |
==संस्थास्थापना== |
||
आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ रोजी |
आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ रोजी ’तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डा’ची स्थापना केली. |
||
==आनंदऋषीजींची शिकवण== |
==आनंदऋषीजींची शिकवण== |
||
धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोडण्यासाठी आहे हा मानवकल्याणाचा मूलमंत्र मानून सुमारे ७५ वर्षे देशभर भ्रमण करून हा संदेश त्यांनी दिला. भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे पोथ्यांत बंदिस्त होते, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आनंदऋषीजींनी केले. जैन धर्मग्रंथ आणि अन्य धर्मांची शिकवण यांची सांगड हे त्यांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अन्य धर्मांचा बारकाईने अभ्यास केला होता..त्यांच्या प्रवचनांमध्ये संत [[ज्ञानेश्वर]], संत [[तुकाराम]], [[नामदेव]], [[एकनाथ]]महाराजांबरोबर [[गुरुनानक]] इतकेच नाही तर महंमद पैगंबराची वचने यांचा समावेश असे; संत [[कबीर]], [[तुलसीदास]], [[नरसी मेहता]] यांच्या कवनांचाही उल्लेख असे. |
|||
धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोड्ण्यासाठी आहे हा मानवकल्याणाचा मूलमंत्र आहे. |
|||
आपलाच धर्म श्रेष्ठ्हा हेका त्यांनी कटाक्षाने टाळला. खुद्द जैन धर्मातील सर्व पंथांनी संघटितरीत्या धर्मकार्य करावे, मात्र त्याचा केंद्रबिंदू हा देशकार्याचा, सर्वसामान्यांच्या उत्थानाचाच असावा अशी त्यांची धारणा होती. |
|||
१३:१५, २८ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
आचार्य आनंदऋषीजी (जन्म " चिंचोडी, पाथर्डी तालुका-अहमदनगर, २७ जुलै, १९००-श्रावण शुद्ध प्रतिपदा, शके १८२२; मृत्यू : अहमदनगर, २८मार्च, इ.स. १९९२) यांचे नाव नेमीचंद होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंदजी गुगळे आणि आईचे नाव हुलसाबाई असे होते. उत्तमचंदजी हे त्यांच्या मोठ्या भावाचे नाव होते.
जैन संतपदाची दीक्षा
आनंदऋषीजी यांनी दहा वर्षांचे असताना जैन धर्माचा अभ्यास सुरू केला आणि वयाच्या १३व्या वर्षी, ७ डिसेंबर १९१३ रोजी (मार्गशीर्ष शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दीक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.
पहिले प्रवचन
आनंदऋषीजींनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिकून १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले. संस्कृत-प्राकृत बरोबरच त्यांना मातृभाषा मराठी, आणि इंग्रजी, उर्दू, फारसी, गुजराती, हिंदी या भाषा उत्तम येत होत्या. गोड गळ्याची जन्मजात देणगी असलेल्या आनंदऋषीजींचे वक्तृत्व प्रभावी असल्याने त्यांच्या प्रवचनांची श्रोत्यांवर छाप पडे.
जैन धर्म प्रचार
आनंदऋषीजींनी पुढे रतनऋषीजींसोबत जैन धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले. रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलिपूर येथील (संथारा व्रतपश्चात्) मॄत्यूनंतर आनंदऋषीजींनी त्यांच्या गुरूशिवाय हिंगणघाट येथे पहिला चातुर्मास केला.
संस्थास्थापना
आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ रोजी ’तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डा’ची स्थापना केली.
आनंदऋषीजींची शिकवण
धर्म हा तोडण्यासाठी नाही, तर तो जोडण्यासाठी आहे हा मानवकल्याणाचा मूलमंत्र मानून सुमारे ७५ वर्षे देशभर भ्रमण करून हा संदेश त्यांनी दिला. भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे पोथ्यांत बंदिस्त होते, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आनंदऋषीजींनी केले. जैन धर्मग्रंथ आणि अन्य धर्मांची शिकवण यांची सांगड हे त्यांच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अन्य धर्मांचा बारकाईने अभ्यास केला होता..त्यांच्या प्रवचनांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथमहाराजांबरोबर गुरुनानक इतकेच नाही तर महंमद पैगंबराची वचने यांचा समावेश असे; संत कबीर, तुलसीदास, नरसी मेहता यांच्या कवनांचाही उल्लेख असे.
आपलाच धर्म श्रेष्ठ्हा हेका त्यांनी कटाक्षाने टाळला. खुद्द जैन धर्मातील सर्व पंथांनी संघटितरीत्या धर्मकार्य करावे, मात्र त्याचा केंद्रबिंदू हा देशकार्याचा, सर्वसामान्यांच्या उत्थानाचाच असावा अशी त्यांची धारणा होती.
आनंदऋषीजी यांना मिळालेले सन्मान
- १९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधूंच्या संमेलनामध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचे प्रधान म्हणून घोषित करण्यात आले.
- १३ मे १९६४ साली अजमेर येथे (फाल्गुन शुक्ल एकादशीला) झालेल्या समारंभात आनंदऋषीजींना श्रीमान संघाचे दुसरे आचार्य म्हणून जाहीर करण्यात आले.
- आनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पूर्ण करून पुण्याला आल्यावर त्यांचा शनवारवाडा येथे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला.
- १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणून गौरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंडेशनची स्थापना झाली. हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.
- अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आहे.
मृत्यू
आनंदऋषीजीचा २८ मार्च १९९२ रोजी अहमदनगर येथे मॄत्यू झाला. तेथील आनंदऋषीजी हॉस्पिट्ल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आहे.