"वसुंधरा कोमकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
वसुंधरा श्रीखंड्यांच्या घरातही सांस्कृतिक बहार होती. त्यांची आई कलकत्त्यातील मराठी समाजात क्रियाशील अॅक्टिव्ह होती, तर त्यांचा मोठा भाऊ मनोहर हौशी नाटकवेडा आणि संगीतवेडा होता. खत्यांची बहीण प्रभा दिलरुबा वाजवायची; तर धाकटा भाऊ तबला. वसुंधराबाईंचे गाणेही कलकत्त्यातच आकाराला आले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या कलकत्त्याच्या 'ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स'सारख्या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायल्या होते आणि त्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार म्हणून त्यांना चांदीची छोटी तंबोरी मिळाली होती. |
वसुंधरा श्रीखंड्यांच्या घरातही सांस्कृतिक बहार होती. त्यांची आई कलकत्त्यातील मराठी समाजात क्रियाशील अॅक्टिव्ह होती, तर त्यांचा मोठा भाऊ मनोहर हौशी नाटकवेडा आणि संगीतवेडा होता. खत्यांची बहीण प्रभा दिलरुबा वाजवायची; तर धाकटा भाऊ तबला. वसुंधराबाईंचे गाणेही कलकत्त्यातच आकाराला आले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या कलकत्त्याच्या 'ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स'सारख्या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायल्या होते आणि त्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार म्हणून त्यांना चांदीची छोटी तंबोरी मिळाली होती. |
||
या पुरस्काराचा फायदा असा झाला की,. कलकत्ता आकाशवाणीवरील बुजुर्ग रेडिओ कलावंतांच्या संपावेळी संगीतसभेत गायलेल्या बालगायकांनाच बोलावले गेले. त्यात वसुंधराबाईंची वर्णी लागली आणि त्या लहान वयातच रेडिओ आर्टिस्ट बनल्या. |
|||
==मुंबईत आगमन== |
==मुंबईत आगमन== |
||
कलकत्ता आकाशवाणीच्या संगीत सभेत एकदा कुमार गंधर्वांचे गाणे झाले. गाण्यानंतर [[कुमार गंधर्व]] वसुंधराबाईंच्या घरी आले. गप्पा मारता मारता त्यांच्याकडे गाणे शिकवण्याचा विषय निघाला. कुमार गंधर्व गाणे शिकवायला तयार झाले, पण त्यांचा मुक्काम मुंबईतील ऑपेरा हाऊसला ’देवधर स्कूल ऑफिंडियन म्य़ुझिक’ या संस्थेत असल्याने वसुंधराबाईंना गाणे शिकण्यासाठी मुंबईला यावे लागेल असे ते म्हणाले. |
|||
१९४२ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. कलकत्ता हे ब्रिटिशांचे मुख्य केंद असल्यामुळे तिथे युद्धाचे वारे वाहू लागले. कलकत्त्यातील अनेक मराठी कुटुंबे पुन्हा महाराष्ट्रात परतली. वसुंधरा श्रीखंड्यांचे कुटुंबही १९४५-४६च्या आसपास मुंबईत आले. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाल्यावर समजले की कुमारांचे सतत संगीताचे दौरे चाललेले असत. मग देवधरमास्तरांनीच त्यांना शिकवायला सुरुवात केली. मुंबईत असतील तेव्हा कुमारजीही शिकवयाचे. पण मुंबईच्या मुक्कामात |
१९४२ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. कलकत्ता हे ब्रिटिशांचे मुख्य केंद असल्यामुळे तिथे युद्धाचे वारे वाहू लागले. कलकत्त्यातील अनेक मराठी कुटुंबे पुन्हा महाराष्ट्रात परतली. वसुंधरा श्रीखंड्यांचे कुटुंबही १९४५-४६च्या आसपास मुंबईत आले. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाल्यावर समजले की कुमारांचे सतत संगीताचे दौरे चाललेले असत. मग देवधरमास्तरांनीच त्यांना शिकवायला सुरुवात केली. मुंबईत असतील तेव्हा कुमारजीही शिकवयाचे. पण मुंबईच्या मुक्कामात वसुंधराबाईंचे संगीतशिक्षण मुख्यत: झालं ते प्रो. [[बी.आर देवधर|बी.आर देवधरांकडेच]] झाले. |
||
२२:४४, २ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
वसुंधरा कोमकली (जन्म : कलकत्ता, इ.स. १९३०; मृत्यू : देवास, मध्य प्रदेश, २९ जुलै, इ.स. २०१५) ह्या एक हिंदुस्तानी संगीत गायिका होत्या, कुमार गंधर्व यांची पहिली पत्नी भानुमती कंस यांचे निधन झाल्यानंतर कुमार गंधर्वांनी इ,स, १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. आणि त्या वसुंधरा कोमकली झाल्या. विवाह झाल्यावर पुढची ५३ वर्षे वसुंधरा कोमकली यांचे वास्तव्य देवास येथेच होते.
बालपण आणि संगीत शिक्षण
वसुंधरा कोमकली (माहेरच्या वसुंधरा श्रीखंडे) यांचे वडील कलकत्त्याला टाटा कंपनीत होते. त्यावेळचे कलकत्ता एक सांस्कृतिक शहर होते. साहित्य, चित्र आणि संगीत, सर्वच ललितकलांचे माहेरघर असलेले कलकत्ता भारतीय संगीताचे मोठे केंद होते.
वसुंधरा श्रीखंड्यांच्या घरातही सांस्कृतिक बहार होती. त्यांची आई कलकत्त्यातील मराठी समाजात क्रियाशील अॅक्टिव्ह होती, तर त्यांचा मोठा भाऊ मनोहर हौशी नाटकवेडा आणि संगीतवेडा होता. खत्यांची बहीण प्रभा दिलरुबा वाजवायची; तर धाकटा भाऊ तबला. वसुंधराबाईंचे गाणेही कलकत्त्यातच आकाराला आले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या कलकत्त्याच्या 'ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स'सारख्या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायल्या होते आणि त्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार म्हणून त्यांना चांदीची छोटी तंबोरी मिळाली होती.
या पुरस्काराचा फायदा असा झाला की,. कलकत्ता आकाशवाणीवरील बुजुर्ग रेडिओ कलावंतांच्या संपावेळी संगीतसभेत गायलेल्या बालगायकांनाच बोलावले गेले. त्यात वसुंधराबाईंची वर्णी लागली आणि त्या लहान वयातच रेडिओ आर्टिस्ट बनल्या.
मुंबईत आगमन
कलकत्ता आकाशवाणीच्या संगीत सभेत एकदा कुमार गंधर्वांचे गाणे झाले. गाण्यानंतर कुमार गंधर्व वसुंधराबाईंच्या घरी आले. गप्पा मारता मारता त्यांच्याकडे गाणे शिकवण्याचा विषय निघाला. कुमार गंधर्व गाणे शिकवायला तयार झाले, पण त्यांचा मुक्काम मुंबईतील ऑपेरा हाऊसला ’देवधर स्कूल ऑफिंडियन म्य़ुझिक’ या संस्थेत असल्याने वसुंधराबाईंना गाणे शिकण्यासाठी मुंबईला यावे लागेल असे ते म्हणाले.
१९४२ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. कलकत्ता हे ब्रिटिशांचे मुख्य केंद असल्यामुळे तिथे युद्धाचे वारे वाहू लागले. कलकत्त्यातील अनेक मराठी कुटुंबे पुन्हा महाराष्ट्रात परतली. वसुंधरा श्रीखंड्यांचे कुटुंबही १९४५-४६च्या आसपास मुंबईत आले. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाल्यावर समजले की कुमारांचे सतत संगीताचे दौरे चाललेले असत. मग देवधरमास्तरांनीच त्यांना शिकवायला सुरुवात केली. मुंबईत असतील तेव्हा कुमारजीही शिकवयाचे. पण मुंबईच्या मुक्कामात वसुंधराबाईंचे संगीतशिक्षण मुख्यत: झालं ते प्रो. बी.आर देवधरांकडेच झाले.
वसुंधरा कोमकली यांना मिळालेले पुरस्कार
- पद्मश्री (२००६)
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार