"जी.ए. कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
|||
ओळ ८५: | ओळ ८५: | ||
== पत्रव्यवहार == |
== पत्रव्यवहार == |
||
* तत्कालीन साहित्यिक वर्तुळांत, कार्यक्रमांत प्रत्यक्ष ऊठबस जाणीवपूर्वक टाळणार्या जी.एं.चा पत्रव्यवहार मात्र दांडगा होता. त्यांनी आप्तांना, मित्रांना लिहिलेली पत्रे संपादित करून त्यांचे चार खंड 'जीएं.ची निवडक पत्रे' या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या [[सुनीता देशपांडे]] यांना लिहिलेल्या दीर्घपत्रांचा संग्रह म्हणजे पहिला खंड. दुसरा खंड सत्यकथेचे-मौजचे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांना लिहिलेल्या पत्रांचा आहे. उरलेले दोन खंड माधव आचवल( जी.एं.चे अंतरंग मित्र), [[म.द. हातकणंगलेकर]], कवी [[ग्रेस]], [[जयवंत दळवी]] अशा मित्रांना लिहिलेल्या पत्रांचे आहेत. या पत्रांमुळे जी.एं.च्या अफाट वाचनाचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते. |
* तत्कालीन साहित्यिक वर्तुळांत, कार्यक्रमांत प्रत्यक्ष ऊठबस जाणीवपूर्वक टाळणार्या जी.एं.चा पत्रव्यवहार मात्र दांडगा होता. त्यांनी आप्तांना, मित्रांना लिहिलेली पत्रे संपादित करून त्यांचे चार खंड 'जीएं.ची निवडक पत्रे' या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या [[सुनीता देशपांडे]] यांना लिहिलेल्या दीर्घपत्रांचा संग्रह म्हणजे पहिला खंड. दुसरा खंड सत्यकथेचे-मौजचे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांना लिहिलेल्या पत्रांचा आहे. उरलेले दोन खंड माधव आचवल( जी.एं.चे अंतरंग मित्र), [[म.द. हातकणंगलेकर]], कवी [[ग्रेस]], [[जयवंत दळवी]] अशा मित्रांना लिहिलेल्या पत्रांचे आहेत. या पत्रांमुळे जी.एं.च्या अफाट वाचनाचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते. |
||
* जीए आणि अनंत व आनंद अंतरकर यांच्यांमधील पत्रव्यवहार ’एका धारवाडी कहाणी’ नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाला आहे.जी.एंचे पत्रसाहित्य वाचणे हा उच्च प्रतीचा आनंद आहेच, शिवाय तो पुढील पिढ्यांच्या वाङ्मयीन अभ्यासाठी उपयुक्त आणि मोलाचा आहे. हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. |
|||
==आठवणी== |
==आठवणी== |
१३:५९, २७ जुलै २०१५ ची आवृत्ती
गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी उर्फ "'जी.ए.'"(जुलै १०, इ.स. १९२३ - डिसेंबर ११, इ.स. १९८७) हे मराठी लेखक, कथाकार होते. मूळ बेळगावचे असलेले जी.ए. धारवाडमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते.
जीवन
गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म जुलै १०, इ.स. १९२३ रोजी झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य धारवाड येथे गेले. त्यांनी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जातात. त्यांचे निधन डिसेंबर ११, इ.स. १९८७ रोजी झाले.
पुरस्कार
जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कादंबरीसाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला.
प्रकाशित साहित्य
जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. त्यांचे सर्व कथासंग्रह व इतर साहित्य खालीलप्रमाणे आहे:
शीर्षक | साहित्यप्रकार | प्रकाशक | प्रकाशनवर्ष (इ.स.) | भाषा |
---|---|---|---|---|
अमृतफळे | अनुवादित कथा[१] | काँटिनेंटल प्रकाशन, पुणे | इ.स. १९८० | मराठी |
आकाशफुले | कथासंग्रह (अनुवादित, रुपांतरित, आधारित कथा) |
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | २९ सप्टेंबर, इ.स. १९९० | मराठी |
एक अरबी कहाणी | अनुवादित कादंबरी | विश्वमोहिनी प्रकाशन, पुणे | ८ ऑक्टोबर, इ.स. १९८३ | मराठी |
ओंजळधारा | काँटिनेंटल प्रकाशन, पुणे | इ.स. १९८१ | मराठी | |
काजळमाया | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | इ.स. १९७२ | मराठी |
कुसुमगुंजा | कथासंग्रह | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई[२] | १० जुलै, इ.स. १९८९ | मराठी |
गाव | अनुवादित कादंबरी | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | १५ जानेवारी, इ.स. १९६७ | मराठी |
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड १[३] | पत्रसंग्रह | मौज प्रकाशन गृह, मुंबई | १० जुलै, इ.स. १९९५ | मराठी |
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड २[३] | पत्रसंग्रह | मौज प्रकाशन गृह, मुंबई | १० जुलै, इ.स. १९९८ | मराठी |
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड ३[४] | पत्रसंग्रह | मौज प्रकाशन गृह, मुंबई | १० जुलै, इ.स. २००६ | मराठी |
जी.एं.ची निवडक पत्रे; खंड ४[४] | पत्रसंग्रह | मौज प्रकाशन गृह, मुंबई | १० जुलै, इ.स. २००६ | मराठी |
डोहकाळिमा[५] | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | इ.स. १९८७ | मराठी |
दिवस तुडवत अंधाराकडे | नाटक | अप्रकाशित | इ.स. १९५३ | मराठी |
निळासावळा | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | १४ जानेवारी, इ.स. १९५९ | मराठी |
पारवा | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | सप्टेंबर, इ.स. १९६० | मराठी |
पिंगळावेळ | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | इ.स. १९७७ | मराठी |
पैलपाखरे | कथासंग्रह (चार अनुवादित दीर्घकथा) |
परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | १० जुलै, इ.स. १९८६ | मराठी |
बखर बिम्मची | बाल-किशोरसाहित्य | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | २६ नोव्हेंबर, इ.स. १९८६ | मराठी |
माणसे-अरभाट आणि चिल्लर | आत्मचरित्रपर ललितलेखन | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | ११ मार्च, इ.स. १९८८ | मराठी |
मुग्धाची रंगीत गोष्ट | बाल-किशोरसाहित्य | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | २६ नोव्हेंबर, इ.स. १९८६ | मराठी |
रक्तचंदन | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | सप्टेंबर, इ.स. १९६६ | मराठी |
रमलखुणा | कथासंग्रह | काँटिनेंटल प्रकाशन, पुणे | जून, इ.स. १९७५ | मराठी |
रान | अनुवादित कादंबरी | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | इ.स. १९६७ | मराठी |
रानातील प्रकाश | अनुवादित कादंबरी | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | ३० जुलै, इ.स. १९६८ | मराठी |
लॉर्ड ऑफ दी फ्लाईज | अनुवादित कादंबरी | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | इ.स. १९८७ | मराठी |
वैर्याची एक रात्र | अनुवादित आत्मकथा, मूळ: आय सर्व्हाइव्ड हिटलर’स ओव्हन्स- ले.ओल्गा लेंग्येल | विश्वमोहिनी प्रकाशन, पुणे | २२ मे, इ.स. १९८२ | मराठी |
शिवार | अनुवादित कादंबरी | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | इ.स. १९६८ | मराठी |
सांजशकुन | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | इ.स. १९७५ | मराठी |
सोनपावले | कथासंग्रह | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | ११ डिसेंबर, इ.स. १९९१ | मराठी |
सोन्याचे मडके | अनुवादित कादंबरी | विश्वमोहिनी प्रकाशन, पुणे | ११ डिसेंबर, इ.स. १९९१ | मराठी |
स्वातंत्र्य आले घरा | अनुवादित कादंबरी | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई | ३० जून, इ.स. १९६८ | मराठी |
हिरवे रावे | कथासंग्रह | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई | सप्टेंबर, इ.स. १९६२ | मराठी |
अन्य भाषांमध्ये अनुवाद
- नियतिदान - संपादक म.द.हातकणंगलेकर, निशिकांत मिरजकर; जी.ए.मित्रमंडळ प्रकाशन; १९९२. वितरण : पॉप्युलर प्रकाशन, नई दिल्ली. जी.एं.च्या काही कथांचे हिंदी अनुवाद.
पत्रव्यवहार
- तत्कालीन साहित्यिक वर्तुळांत, कार्यक्रमांत प्रत्यक्ष ऊठबस जाणीवपूर्वक टाळणार्या जी.एं.चा पत्रव्यवहार मात्र दांडगा होता. त्यांनी आप्तांना, मित्रांना लिहिलेली पत्रे संपादित करून त्यांचे चार खंड 'जीएं.ची निवडक पत्रे' या नावाने मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या सुनीता देशपांडे यांना लिहिलेल्या दीर्घपत्रांचा संग्रह म्हणजे पहिला खंड. दुसरा खंड सत्यकथेचे-मौजचे संपादक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांना लिहिलेल्या पत्रांचा आहे. उरलेले दोन खंड माधव आचवल( जी.एं.चे अंतरंग मित्र), म.द. हातकणंगलेकर, कवी ग्रेस, जयवंत दळवी अशा मित्रांना लिहिलेल्या पत्रांचे आहेत. या पत्रांमुळे जी.एं.च्या अफाट वाचनाचे, व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते.
- जीए आणि अनंत व आनंद अंतरकर यांच्यांमधील पत्रव्यवहार ’एका धारवाडी कहाणी’ नावाच्या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाला आहे.जी.एंचे पत्रसाहित्य वाचणे हा उच्च प्रतीचा आनंद आहेच, शिवाय तो पुढील पिढ्यांच्या वाङ्मयीन अभ्यासाठी उपयुक्त आणि मोलाचा आहे. हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
आठवणी
- ’प्रिय बाबुअण्णा’ या नावाच्या पुस्तकाद्वारे जी.एं.च्या मावसभगिनी नंदा पैठणकर यांनी जी.एं.च्या आठवणी सांगितल्या आहेत.
संदर्भ व नोंदी
- ^ लिऑन सर्मेलियन (इंग्लिश: Leon Surmelian) याच्या अॅपल ऑफ इम्मॉरटॅलिटी (इंग्लिश: Apple of Immortality) पुस्तकातील काही अनुवादित कथा.
- ^ संपादक म.द. हातकणंगलेकर; निळासावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन या चार कथासंग्रहातील निवडक कथा.
- ^ a b संपादक: म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत.
- ^ a b संपादक: म.द. हातकणंगलेकर, सु.रा. चुनेकर, श्री.पु. भागवत.
- ^ संपादक म.द.हातकणंगलेकर; जी.एं.च्या अप्रकाशित, व प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्याचे संकलन.