"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ५: | ओळ ५: | ||
== मेघदूतावर आधारित चित्रे == |
== मेघदूतावर आधारित चित्रे == |
||
मेघदूतामध्ये कालिदासाने प्राचीनकालीन भारताची अनेक दृश्ये वर्णिली आहेत. त्यांच्यावर आधारित कल्पनाचित्रे अनेक चित्रकारांनी रंगवली आहेत. कदाचित त्यांपैकी सर्वात सुंदर चित्रे पुण्याचे चित्रकार नाना जोशी यांची म्हणावी लागतील. त्यांतील काही चित्रे http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/ ह्या त्यांच्या संकेतस्थळावर पहावयास मिळतील. |
मेघदूतामध्ये कालिदासाने प्राचीनकालीन भारताची अनेक दृश्ये वर्णिली आहेत. त्यांच्यावर आधारित कल्पनाचित्रे अनेक चित्रकारांनी रंगवली आहेत. कदाचित त्यांपैकी सर्वात सुंदर चित्रे पुण्याचे चित्रकार नाना जोशी यांची म्हणावी लागतील. त्यांतील काही चित्रे http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/ ह्या त्यांच्या संकेतस्थळावर पहावयास मिळतील. |
||
==मेघदूताचे अनुवाद== |
|||
* [http://www.kavitakosh.org/kk/मेघदूत_/_कालिदास हिंदी गद्य अनुवाद] |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
१३:२१, १५ जुलै २०१५ ची आवृत्ती
मेघदूत हे कवी कालिदासाने लिहिलेले संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. या महाकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला मेघाबरोबर धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी कुसुमाग्रज (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्तवाची.
कथासूत्र
अापल्या पत्नीच्या नादाने अापल्या अधिकारात - नेमून दिलेल्या कामात, गाफीलपणाने वागणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. बरेच वेळा यक्ष राजाने त्याला सावधगिरीचा इषारा देऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा होण्याचे लक्षण दिसेना, तेव्हा त्याला एक वर्ष विरहावस्थेत हद्दपारीची शिक्षा फर्माविण्यात अाली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरि' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने झाल्यावर कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतु प्राप्त झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्त्या एकदम उचंबळून अाल्या. त्यामुळे त्यास चेतन व अचेतन याचेही भान त्या निर्जन प्रदेशात राहिले नाही. त्याने मेघालाच दूत कल्पून अापल्या पत्नीला निरोप सांगण्याचे काम त्याजवर सोपविले. प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणाऱ्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन सांग म्हणून मेघाची अलका नगरीकडे यक्षाने रवानगी केली. अाणि येथेच या काव्याची परिसमाप्ति करण्यात अाली अाहे.[१]
मेघदूतावर आधारित चित्रे
मेघदूतामध्ये कालिदासाने प्राचीनकालीन भारताची अनेक दृश्ये वर्णिली आहेत. त्यांच्यावर आधारित कल्पनाचित्रे अनेक चित्रकारांनी रंगवली आहेत. कदाचित त्यांपैकी सर्वात सुंदर चित्रे पुण्याचे चित्रकार नाना जोशी यांची म्हणावी लागतील. त्यांतील काही चित्रे http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/ ह्या त्यांच्या संकेतस्थळावर पहावयास मिळतील.
मेघदूताचे अनुवाद
संदर्भ
- ^ संपादक: रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर यांचे संपादकीय निवेदन (महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत' (१९३५) भाषान्तरकार :रामचंद्र गणेश बोरवणकर)
बाह्य दुवे
- शोभना आगाशे. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170819:2011-07-15-20-01-01&catid=252:2009-12-30-13-45-38&Itemid=250. Missing or empty
|title=
(सहाय्य) - चित्रकार नाना जोशी. (इंग्रजी भाषेत) http://www.joshiartist.in/kalidas-meghaduta/. Missing or empty
|title=
(सहाय्य)