"नाना मुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नाना मुळे हे गायकांना साथ करणारे एक प्रसिद्ध मराठी तबलावादक होत.... |
(काही फरक नाही)
|
१०:५४, २० जून २०१५ ची आवृत्ती
नाना मुळे हे गायकांना साथ करणारे एक प्रसिद्ध मराठी तबलावादक होत.
एके काळी नाना मुळे फक्त रंगमंचावरील गायक कलावंतांच्या गाण्यांना तबल्याची साथ करीत. मात्र जशीजशी संगीत नाटके कमी होऊ लागली तसेतसे नाना रंगमंचावर नसलेल्या अन्य गायकांनाही साथ करू लागले.
पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, श्रीमती शोभा गुर्टू, पं. कुमार गंधर्व, पं. सी.आर. व्यास इतकेच काय, जुन्या पिढीतील उस्ताद अमीर खानसाहेबांपासून ते पुढच्या पिढीतील अनेक तरुण गायकांना नाना मुळे यांन तबल्याची साथ केली. या सर्वांच्या बरोबर असंख्य कार्यक्रम वाजवले. इतके कार्यक्रम वाजवले, की नानांना अनेक महिने कुटुंबीयांचे दर्शनही होत नसे. नामवंत गवयांच्या साथीच्या निमित्ताने त्यांचे संपूर्ण भारतभर भ्रमण तर झालेच, शिवाय अनेक परदेश दौरेही झाले.
उस्ताद अमीर खानसाहेबांना लागणारा अतिविलंबित लयीतील झुमरा ठेका असो, नाहीतर श्रीमती शोभा गुर्टूसारख्या उपशास्त्रीय गायनातील सम्राज्ञीबरोबर ठुमरीतील रंगतदार, नजाकतदार वादन असो. ख्याल, उपशास्त्रीय गायनातील ठुमरी असो, नाट्यगीते असोत, नाना सगळ्यात पारंगत. उमेदवारीच्या काळात जिथे जिथे शक्य आहे, अशा सर्व ठिकाणी सर्व गायनप्रकारांबरोबर, अगदी कीर्तनांपासून नानांनी साथ केली.
अतिशय दमदार ठेका, ठेक्यातील अक्षरांचे माधुर्य, त्याचबरोबर उस्ताद घम्मणखॉंसाहेबांकडून घेतलेली लग्गी-नाडा किंवा तबल्यातील उपशास्त्रीय गायनप्रकारात साथसंगतीची विशिष्ट तालीम यामुळे नाना मुळे हे सर्व गवयांचे आवडते साथीदार होते. नानांनी सतत ५० वर्षे गायकांची तबल्यावर साथ केली, आणि नंतर निवृत्ती घेतली.