"खंभातचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
शुद्धलेखन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[सौराष्ट्र]] म्हणजेच |
[[सौराष्ट्र]] म्हणजेच ''काठियावाड'' आणि [[गुजरात]]चा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला '''खंभातचे आखात''' म्हणतात. इंग्रजीत या आखाताचे नाव Gulf of Cambay असे आहे. |
||
मराठी भाषेत काठियावाडला काठेवाड आणि खंभातला खंबायत म्हणतात. अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत खंबायतच्या आखाताची हद्द समजण्यात येते. सुमारे २०० किमी. लांब, २४ ते २०० किमी. रुंद व सरासरी ८ ते १२ मीटर खोल असलेल्या या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान लहान नद्या मिळतात. नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत, भावनगर या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व पुढे कमी कमी होत गेले. |
|||
खंबायतच्या आखातात पाण्याखाली एक शहर सापडले आहे. हे शहर ९,५०० वर्षे जुने असावे. असे असेल तर हे जगातले सर्वात जुने शहर असले पाहिजे. |
|||
[[वर्ग:आखाते]] |
[[वर्ग:आखाते]] |
२१:५७, ८ जून २०१५ ची नवीनतम आवृत्ती
सौराष्ट्र म्हणजेच काठियावाड आणि गुजरातचा पश्चिम किनारा यांच्या दरम्यान असलेल्या समुद्राच्या पट्टीला खंभातचे आखात म्हणतात. इंग्रजीत या आखाताचे नाव Gulf of Cambay असे आहे.
मराठी भाषेत काठियावाडला काठेवाड आणि खंभातला खंबायत म्हणतात. अरबी समुद्राचा गुजरात राज्यामध्ये शिरलेला फाटा. सौराष्ट्राच्या दक्षिण टोकावरील दीवपासून सुरतच्या दक्षिणेकडील दमणपर्यंत खंबायतच्या आखाताची हद्द समजण्यात येते. सुमारे २०० किमी. लांब, २४ ते २०० किमी. रुंद व सरासरी ८ ते १२ मीटर खोल असलेल्या या आखातास पूर्वेकडून तापी, नर्मदा; उत्तरेकडून मही, साबरमती आणि तिन्ही बाजूंनी अनेक लहान लहान नद्या मिळतात. नद्यांनी आणलेल्या गाळामुळे खंबायत, भडोच, सुरत, भावनगर या एकेकाळच्या भरभराटलेल्या बंदरांचे महत्त्व पुढे कमी कमी होत गेले.
खंबायतच्या आखातात पाण्याखाली एक शहर सापडले आहे. हे शहर ९,५०० वर्षे जुने असावे. असे असेल तर हे जगातले सर्वात जुने शहर असले पाहिजे.