"काकड आरती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''काकड आरती''' म्हणजे [[हिंदू]] धर्मात देवाला उठवण्याच्या कल्पनेने केलेली आरती होय. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः हिवाळ्यात काकड आरती केली जाते.
'''काकड आरती''' म्हणजे [[हिंदू]] धर्मात देवाला उठवण्याच्या कल्पनेने केलेली आरती होय. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः हिवाळ्यात काकड आरती केली जाते. देवाला झोपविण्यासाठी शेजारती केली जाते. धूपपात्राने देवाला ओवाळताना म्हणायच्या आरतीला धुपारती म्हणतात.


[[संत तुकाराम]], संत [[रामदास]], [[संत एकनाथ]], इ. संतांनी काकड आरत्या रचल्या आहेत.
[[संत तुकाराम]], संत [[रामदास]], [[संत एकनाथ]], इ. संतांनी काकड आरत्या रचल्या आहेत.

१९:१६, २० नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्याच्या कल्पनेने केलेली आरती होय. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः हिवाळ्यात काकड आरती केली जाते. देवाला झोपविण्यासाठी शेजारती केली जाते. धूपपात्राने देवाला ओवाळताना म्हणायच्या आरतीला धुपारती म्हणतात.

संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, इ. संतांनी काकड आरत्या रचल्या आहेत.


संत तुकारामांनी रचलेली काकड आरती-


भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |

पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती ||१||

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |

दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||

काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |

कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||

राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही |

मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||

विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |

कोटी रवी - शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||

तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |

विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||