"जाई निंबकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या '''जाई निंबकर''' (जन्म : १४ ऑक्टोबर... |
(काही फरक नाही)
|
२१:५५, ८ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या जाई निंबकर (जन्म : १४ ऑक्टोबर १९३२) या इरावती कर्वे आणि धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव दिनकर धोंडो कर्वे यांच्या कन्या. [[बी.व्ही.निंबकर|बोनबिहारी विष्णू निंबकर] हे जाई निंबकरांचे पती. गौरी देशपांडे या जाई निंबकराच्या धाकट्या भगिनी.
जाई निंबकर (माहेरच्या जाई कर्वे) या पुणे विद्यापीठातून बी.ए. झाल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठातून समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. केले. इ.स. १९५९पासून जाई निंबकर लेखन करीत आहेत. इंग्रजी-मराठी कादंबऱ्या, इंग्रजी कथासंग्रह, अनेक इंग्रजी-मराठी स्फुट लेख, आणि परदेशी लोकांना मराठी शिकविण्यासाठी लिहिलेली पुस्तके असा त्यांचा मोठा ग्रंथसंभार आहे.
जाई निंबकरांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील फलटणजवळच्या शेंदुर्णी गावात असते. तेथे त्यांच्या पतींनी आणि मुलींनी चालविलेली निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) ही समाजकार्य करणारी बिनसरकारी स्वायत्त संस्था आहे. जाई निंबकरांच्या मुली चंदा, नंदिनी आणि मंजिरी या त्या संस्थेत काम करतात.