"श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|श्रीनिवास विनायक कुलकर्णी}} श्रीनिवास रामचंद्र कुलकर्ण...
(काही फरक नाही)

२३:३०, १२ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती


श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी (जन्म : १९५६) हेे एक मराठी खगोल भौतिकशास्त्रज्ञ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत काम करतात.

कुलकर्णी यांचा जन्म दक्षिण महाराष्ट्रातल्या कुरुंदवाड या संस्थानी गावात झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकात हुबळी येथे झाले. त्यानंतर दिल्लीच्या आयआयटीतून ते १९७८ मध्ये भौतिकशास्त्र विषयात एमएस झाले. १९९० मध्ये एका उन्हाळी वर्गात बंगलोर येथे खगोलशास्त्र या विषयावरील व्याख्याने ऐकून त्यांना खगोलशास्त्रात रस निर्माण झाला.. पुढे ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्राध्यापक झाले. नंतर, २००१ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो झाले. या संस्थेचे भारतीय फेलो केवळ दहा ते अकरा आहेत, त्यांपैकी कुलकर्णी एक आहेत. २००३ मध्ये ते नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. सध्या कुलकर्णी हे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत 'स्पेस इन्फरनोमेट्री मिशन'चे सदस्य असून पालोमार व केक येथील प्रकाशीय वेधशाळांचे संचालक आहेत. रेडिओ लहरींवर काम करणारे खगोल भौतिकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सुरुवातीला ग्लोब्युलर क्लस्टर पल्सरच्या (स्पंदक तारा) शोधात काम केले होते.

श्रीनिवास कुलकर्णी हे इन्फॉसिसचे नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे भाऊ आहेत.

श्रीनिवास रामचंद्र कुलकर्णी यांचे संशोधन कार्य

  • ग्लीस २२९ या तपकिरी बटू ताऱ्याचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांच्या पथकात ते होते.
  • चार भुजांच्या दीíघकेचा शोध
  • द्वैती स्पंदक ताऱ्याचे प्रकाशीय समघटकांचा शोध.
  • पॅलोमार ट्रान्झियंट फॅक्टरी या नवीन अवकाशीय पदार्थ शोधणाऱ्या प्रकल्पात सहभाग.
  • बाह्य तारकीय स्रोतांमधील गॅमा किरणांचे स्फोट शोधले (१९९७).
  • मिलिसेकंड पल्सार' या स्पंदक ताऱ्याचा शोध लावणाऱ्या गटातले एक सहभागीे.
  • रेणवीय ढगांचा अभ्यास
  • सौम्य गॅमा रे रिपीटर्स हे नवताऱ्याचे अवशेष असतात, हे त्यांनी दाखवून दिले.

सन्मान

भारताच्या पंतप्रधानांनी श्रीनिवास कुलकर्णी यांना 'ब्रेन-गेन'सदृश योजनेनुसार भारतामध्ये येऊन बारा महिने कुठलेही संशोधन करण्यासाठी 'जवाहरलाल नेहरू फेलोशिप' दिली आहे.

श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार

  • अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा हेलेन वॉर्नर पुरस्कार (१९९१)
  • एनएसएफचा ॲलन टी वॉटरमन पुरस्कार (१९९२)
  • इन्फॉसिसचा पुरस्कार (२०१३)