"अशोक रामचंद्र केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. अशोक रामचंद्र केळकर (जन्म : पुणे, २२ एप्रिल १९२९; ) हे एक आंतरराष... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
१५:४३, १५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
डॉ. अशोक रामचंद्र केळकर (जन्म : पुणे, २२ एप्रिल १९२९; ) हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक आहेत. मराठी अभ्यास परिषदेचे ते काही काळ(सुमारे७ वर्षे) अध्यक्ष आणि प्रमुख संपादक होते.
श्री. केळकर यांचे शालेय शिक्षण पुणे शहराच्या रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. प्रारंभीच्या काळात त्यांनी आग्रा विद्यापीठात भाषाशास्त्राचे अध्यापन केले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात त्यांनी लिंग्विस्टिक्स विथ अँथ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी. साठी संशोधन केले. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी बराच काळ भाषाशास्त्र शिकवले. सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी इन लिंग्विस्टिक्सचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
अशोक रा. केळकर यांनी मराठी, हिंदू, इंग्रजी या भाषांतून त्यांनी साहित्यसिद्धान्त, चिन्हभाषाशास्त्र व भाषा तत्त्वज्ञान या विषयांवर लेखन केले आहे.
अशोक रा. केळकर यांनी लिहिलेली पुस्तके
- कवितेचे अध्यापन
- त्रिवेणी
- द फोनॉलॉजी ॲन्ड मारफॉलॉजी ऑफ मराठी (इंग्रजी)
- प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा
- भेदविलोपन
- मध्यमा
- मराठी भाषेचा आर्थिक संसार
- रुजवात
- वैखरी
पुरस्कार
- भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार
- ’रुजवात’ या पुस्तकाला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार