"मधुबाला जव्हेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''मधुबाला जव्हेरी''', लग्नानंतर मधुबाला चावला (जन्म : इ.स.१९३७: ;मृत... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
(काही फरक नाही)
|
२१:५१, १४ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
मधुबाला जव्हेरी, लग्नानंतर मधुबाला चावला (जन्म : इ.स.१९३७: ;मृत्यू : मुंबई, सप्टेंबर ११, इ.स.२०१३ या एक मराठी गायिका होत्या. त्यांच्या आई हिराबाई जव्हेरी आणि मावशी शामला माजगावकर.या दोघी बहिणींनी मिळून मुंबईत इ.स.१९२९ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘स्वामी समर्थ संगीत विद्यालया‘ची स्थापना केली. याच संस्थेत मधुबाला जव्हेरी यांनी संगीताचे शिक्षण घेतले. मधुबाला जव्हेरी या उत्तम चित्रकार होत्या. संगीतज्ञ असल्याने त्यांनी काही गाणी संगीतबद्धही केली होती.
कारकीर्द
मधुबाला जव्हेरी यांनी अनेक भावगीते गायली, आणि बऱ्याच हिंदी-मराठी चित्रपटांच्या त्या पार्श्वगायिका होत्या. त्यांच्या बहुतेक हिंदी गाण्यांचे संगीत दिग्दर्शक हंसराज बेहेल असत आणि मराठी गाण्यांचे वसंत पवार.
मधुबाला जव्हेरी यांवी गाजलेली गीते
- अंबरात नाजुकशी
- आज मी आळविते केदार
- काल रात सारी मजसी
- गगनी अर्धा चंद्र उगवला
- जिवाचा जिवलग नंदलाला
- दूर आर्त सांग कुणी छेडली
- धौम्य ऋषी सांगतसे कथा पांडवांना
- मी आळविते जयजयवंती
- सप्रेम नमस्कार विनंती विशेष (चित्रपट :वैजयंता, सहगायक -वसंतराव देशपांडे)
- सांगा या वेडीला (चित्रपट : सांगते ऐका, सहगायक -विठ्ठल शिंदे)