Jump to content

मधुबाला जव्हेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मधुबाला जव्हेरी, लग्नानंतर मधुबाला चावला (जन्म : गिरगांव (मुंबई) [इ.स. १९३७]] किंवा १९ मे, १९३५ - - सप्टेंबर ११, इ.स. २०१३:मुंबई) या एक मराठी गायिका होत्या. वडिलांचे नाव ननजीवनभाई जव्हेरी, त्यांच्या आई हिराबाई जव्हेरी आणि मावशी शामला माजगावकर.या दोघी बहिणींनी मिळून मुंबईत इ.स. १९२९ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वामी समर्थ संगीत विद्यालयाची स्थापना केली. याच संस्थेत मधुबाला जव्हेरी यांनी संगीताचे शिक्षण घेतले. मधुबाला जव्हेरी या उत्तम चित्रकार होत्या. संगीतज्ञ असल्याने त्यांनी काही गाणी संगीतबद्धही केली होती.

मधुबाला जव्हेरी या एम.ए. असून त्यांच्याकडे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची संगीत विशारद ही पदवी होती.

कारकीर्द

[संपादन]

१९५१ साली मधुबाला जव्हेरी यांना संगीत दिग्दर्शक मनोहर यांनी हिंदी चित्रपट ’भूले भटके’ मध्ये पार्श्वगायनाची संधी दिली, परंतु त्या चित्रपटाचे प्रकाशन खूप लांबले. त्याच वर्षी मधुबाला जव्हेरी यांनी दिग्दर्शक हंसराज बेहेल यांच्यासाठी ’राजपूत’ चित्रपटात पहिले गाणे गायले. जग्गू या १९५२ साली निघालेल्याचित्रपटात मधुबाला जव्हेरींनी एकूण सातापैकी पाच गाणी गायली होती.

१९५१ ते १९५८ अशी फक्त पाच वर्षांची कारकीर्द असलेल्या मधुबाला जव्हेरींनी ५५ हिंदी, २७ मराठी आणि ३ गुजराठी गाणी गायली.

मधुबाला जव्हेरी यांनी अनेक भावगीते गायली, आणि बऱ्याच हिंदी-मराठी चित्रपटांच्या त्या पार्श्वगायिका होत्या. त्यांच्या बहुतेक हिंदी गाण्यांचे संगीत दिग्दर्शक हंसराज बेहेल असत आणि मराठी गाण्यांचे वसंत पवार. मधुबाला जव्हेरी यांनी गायलेल्या बहुतेक द्वंद्वगीतात तलत महमूद असत.

मधुबाला जव्हेरी यांवी गाजलेली मराठी गीते

[संपादन]
 • अंबरात नाजुकशी (भावगीत)
 • अरे अरे नंदाच्या पोरा (लावणी, चित्रपट : सांगत्ये ऐका)
 • आज मी आळविते केदार (चित्रपट : अवघाची संसार)
 • काल रात सारी मजसी (लावणी, चित्रपट : सांगत्ये ऐका)
 • गगनी अर्धा चंद्र उगवला (भावगीत)
 • जिवाचा जिवलग नंदलाला (भावगीत)
 • दूर आर्त सांग कुणी छेडली (भावगीत)
 • धौम्य ऋषी सांगतसे कथा पांडवांना (गीत, सांगत्ये ऐका)
 • पाटलाची पोर (लावणी, चित्रपट : सांगत्ये ऐका)
 • मी आळविते जयजयवंती (भावगीत)
 • सप्रेम नमस्कार विनंती विशेष (चित्रपट : वैजयंता, सहगायक -वसंतराव देशपांडे)
 • सांगा या वेडीला (चित्रपट : सांगत्ये ऐका, सहगायक - विठ्ठल शिंदे)

मधुबाला जव्हेरी यांवी गाजलेली हिंदी गीते

[संपादन]
 • ऐ जमाने बता (सहगायक तलत महमूद; चित्रपट : दोस्त, १९५४)
 • क्यों दिल पे रखा हाथ है (दरबार, १९५५)
 • जायेगा जब यहॉं से तो कुछ भी साथना होगा (सहगायक मोहम्म्द रफी; चित्रपट : मोती महल, १९५२)
 • जा रे जा निंदिया जा (सहगायिका लता मंगेशकर; चित्रपट : झांझर, १९५३)
 • ठहर जरा ओ जानेवाले बाबू मिस्टर (सहगायक मन्‍ना डे आणि आशा भोसले; चित्रपट : राजकपूरचा ’बूट पॉलिश)
 • तेरा मेरा जनम का हैं साथ रे (आस्तिक, १९५६)
 • दिल मेरा, तेरा दीवाना (सहगायक तलत महमूद; चित्रपट : अपनी इज्जत, १९५२)
 • पीपल की छॉंव तले (चार चॉंद,१९५३)
 • माई घटा तू सावन (जग्गू, १९५२)
 • हाफिझ खुदा तुम्हारा (सहगायक तलत महमूद; चित्रपट नका़बपोश)