"अनुराधा पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अनुराधा पोतदार (माहेरच्या उषा घाटे) या मराठीतील एक कवयित्री आ...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

२२:१४, ३ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

डॉ. अनुराधा पोतदार (माहेरच्या उषा घाटे) या मराठीतील एक कवयित्री आहेत. त्यांचे वडील म्हणजे वि.द. घाटेआणि आजोबा म्हणजे दत्त (कवी). अनुराधा पोतदारांचे चिरंजीव डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि कन्या यशोधरा पोतदार-साठे हेही कवी आहेत.

अनुराधा पोतदार यांनी ’मराठीचा अर्थविचार’ असल्या तांत्रिक विषयावर पीएच.डी. केली आहे आणि त्या इ.स.१९८३पासून मराठीचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी आपला पहिला काव्यसंग्रह, ’आवर्त’ हा कवी दत्तांना अर्पण केला आहे. त्या दत्तकवींबद्दल लिहितात :-

धगीत पेटत्या लपविले कुणी
लावण्यवेलीचे नाजुक पिसे

किंवा,

तो आकाशातला धन्वंतरी
माझ्यावर इलाज करतो आहे
एक जळजळीत रेघ माझ्या
भाळावर त्यानं कधीचीच
ओढून ठेवली आहे
काट्याने काटा काढावा,
तसा दुःखाला
दुःखाचाच उतारा देऊन,
तो इलाज करतो आहे......