"दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा''' ही कोल्हापूर येथे असलेली साहित...
(काही फरक नाही)

२१:०८, १० मे २०१३ ची आवृत्ती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा ही कोल्हापूर येथे असलेली साहित्य संस्था आहे. ही संस्था यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने इ.स. १९८७ साली स्थापन झाली. संस्थेचे कार्यक्षेत्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे दक्षिणेकडचे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर हे चार जिल्हे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा महाराष्ट्र सर्कारच्या साहित्य संस्कृती मंडळाकडून दरवर्षी ५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करीत असली तरी, ही संस्था या चार जिल्ह्यांतील एखाद्या गावी किंवा महाराष्ट्राच्या किंचित बाहेर असलेल्या बेळगाव-निपाणी येथे साहित्य संमेलने भरवते. संस्थेची आत्तापर्यंत आतापर्यंत कोल्हापूर, बेळगाव, सांगली, निपाणी, कुंभारगाव, येडेनिपाणी, नागठाणे, रेणावी, चिखली, माचीगड अशा विविध ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत. ग. ल. ठोकळ, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रणजित देसाई, आनंद यादव, शिवाजी सावंत, प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रमोद कोपर्डे, वसंत केशव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, अनंत तिबिले, प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रा. फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर आदींनी आतापर्यंत संमेलनाध्यक्षपद भूषवले आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २३वे साहित्य संमेलन कराड येथे २० जानेवारी २०१३ या दिवशी झाले. ’उपरा’कार लक्ष्मण माने संमेलनाध्यक्ष होते.


पहा : साहित्य संमेलने