"मोरो केशव दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''मोरो केशव दामले''' (जन्म : मालगुंड, ७ नोव्हेंबर १८६८; नागपूर-पुणे दर...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

२१:४४, ३ मे २०१३ ची आवृत्ती

मोरो केशव दामले (जन्म : मालगुंड, ७ नोव्हेंबर १८६८; नागपूर-पुणे दरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू, ३० एप्रिल १९१३) हे मराठीतील व्याकरणकार व निबंधकार होते. त्याचा जन्म रत्नागिरीनजीकच्या मालगुंड या गावी झाला. त्यांचे वडील केसो विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक व पुढे रावसाहेब मंडलिक यांच्या वेळणे या गावच्या शेतीचे कारभारी होते. प्रसिद्ध कवी केशवसुत व पत्रकार सीताराम केशव हे मोरो केशवांचे अनुक्रमे थोरले व धाकटे बंधू. मधले बंधू मोरो केशव दामले हे मराठील नामवंत व्याकरणकार म्हणून प्रसिद्धी पावले.

शिक्षण व नोकरी

मोरो केशव दामले यांचे शालेय शिक्षण दाभोळ,बडोदे व अमरावती येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. इ.स. १८९२मध्ये बी.ए., व १८९४मध्ये इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन मोरो केशव मुंबई विश्वविद्यालयाचे एम.ए. झाले. इ.स. १८९४ ते १९०७पर्यंत त्यांनी उज्जैन येथील ’माधव कॉलेजात’ लॉजिक व फिलॉसॉफी या विषयांचे अध्यापन केले. १९०८ साली त्यांनी नागपूर येथे ’सिटी स्कूल’वरील सरकारी पद स्वीकारले.

मोरो केशव यांनी इ.स.१९०४मध्ये भरलेल्या शुद्धलेखन परिषदेत भाग घेतला होता आणि त्यासंबधीची सडेतोड मते त्यांनी ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केली होती.

मोरो केशव दामले यांच्या व्याकरणाआधी प्रसिद्ध झालेली मराठी भाषेच्या व्याकरणावरील पुस्तकांचे लेखक

  • इंग्रज लेखक :-
  • दादोबा
  • कृष्णशास्त्री चिपळूणकर
  • कृष्णशास्त्री गोडबोले
  • खेर,
  • (प्रौढबोधकार)रा.भि. जोशी
  • आगरकर
  • ’सुबोधव्याकरण’कार गुंजीकर,
  • रेव्हरंड नवलकर. यांचे व्याकरण इंग्रजीत होते.
  • रावजीशास्त्री गोडबोले (मराठी भाषेचे मध्यम व्याकरण)
  • बाळकृष्ण विष्णू भिडे
  • बाळशास्त्री जांभेकर
  • गंगाधरशास्त्री टिळक
  • गोपाळ जिवाजी केळकर
  • वागळे
  • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे ’श्रीज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण’ आदी.

इतकी व्याकरणे असूनसुद्धा ’मोरो केशव दामले’ यांचे व्याकरण सर्वोत्तम समजले गेले आणि सर्वाठाने गाजले. आजही त्या व्याकरणाच्या शालेय आवृत्त्या प्रसिद्ध होतात.

मोरो केशव दामले यांची ग्रंथरचना

  • त्यांचा ’शास्त्रीय मराठी व्याकरण नावाचा ९९० पृष्ठांचा ग्रंथ१९११मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथामुळे त्यांनी मराठीच्या व्याकरणकारांत अग्रस्थान मिळविले.
  • शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा (१९०५)
  • विचारभ्रमण आणि आधुनिक असंतोष (एडमंड बर्कच्या Present Discontentचे मराठी भाषांतर). हे पुस्तक ’ग्रंथमाला’नामक मासिकात क्रमाक्रमाने प्रसिद्ध होत असे.
  • न्यायशास्त्र निगन्मन (१८९६)
  • न्यायशास्त्र निगमन-२रे पुस्तक (१९०२). तर्कशास्त्रावरील ही दोन्ही पुस्तके बडोदा सरकारने प्रसिद्ध केली होती.

मृत्यू

१९१३ साली नागपूरहून पुण्यास येताना मोरो केशव दामले यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला.