"दिलीप अलोणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. दिलीप अलोणे हे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महा...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१८:३२, २६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

डॉ. दिलीप अलोणे हे नाशिक जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालया प्राध्यापक आहेते सतत प्रयोगशील राहणे हे त्यांचा स्वभावगुण आहे.

धडपड्या स्वभाव आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व लाभलेले अलोणे हे जादूगार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. एकरी विक्रमी उत्पादन घेता घेता त्यांनी दोन नवी वाणेही विकसित केली आहेत. डोळ्यावर पट्टी बांधून बाइक चालविण्याचे धाडसी प्रयोग ते करतात. त्यांनी (२०१३सालपर्यंत) जादूचे ५००हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी तितक्याच कळकळीने ते झटतात.

कमवा आणि शिका, कचऱ्यातून कला असे विविध उपक्रम लोणे यांनी राबविले आहेत. गरजू विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजनाही त्यांनी सुरू केली होती.

अलोणे हे अमरावती विद्यापीठाच्या विज्ञान शाखा भाषा मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भ कला परिषद, महाराष्ट्र नकलाकार संघ, वैदर्भीय जादूगार संघटना वगैरेंचे ते अध्यक्ष होते; विदर्भ साहित्य संघाच्या ’युगवाणी’ या नियतकालिकाच्या संपादक मंडळातही ते होते. ’नव्वदोत्तरी मराठी कादंबरीतील ग्रामीण जीवनाचे वास्तव’ या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदी सरकारने त्यांची नेमणूक केली आहे.

’संपदा’ व ’सोनिया’ या अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या वाणांची निर्मिती प्रा. दिलीप अलोणे यांनी केली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, चणा यांच्या उत्पादन स्पर्धेत सर्वाधिक उत्पादनाचा प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

इतके हरहुन्नरी आणि धाडसी असून विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याच्या मूळ उद्दिष्टापासून प्रा. अलोणे ढळलेले नाहीत.

नकलाकारी

नकलाकार म्हणून गेल्या चाळीस वर्षांच्या कालावधीत अलोणे यांनी २०१३ सालापर्यंत तीन हजारांहून अधिक नकलांचे कार्यक्रम केले आहेत. राज्यस्तरीय नकला महोत्सवाचे त्यांनी आयोजन केले होते. या लोकरंजनातून लोकप्रबोधनाच्या कार्यात त्यांच्या "वेडा वृंदावन', "मावं लगन कवा होनार', "मला निवडून द्या', "पठ्ठे बापूराव' या त्यांच्या नकला अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत.

खासगी जीवन

प्रा. दिलीप अलोणे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव देवयानी आहे.

दिलीप अलोणे यांचे लेखन वगैरे

  • नियमित शेतीविषयक लेखन
  • शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर व विविध पिकांच्या उत्पादन वाढीसंदर्भात त्यांनी पाच चित्रफिती तयार केल्या आहेत.
  • अशोक पवार यांचे ‘बिराड’ हे आत्मकथन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने प्रा. दिलीप अलोणे यांच्या कल्पनेतून ‘बिराड’ या लघु चित्रपटाची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन त्यांचेच आहे.
  • शेतकरी आत्महत्यांच्या विषयावर ’गर्भात मातीच्या दिस सोनियाचा’ या माहितीपटाची निर्मिती त्यांनी कली आहे.
  • ’जावे प्रेमाच्या गावा’, ’हसा आणि लठ्ठ व्हा’ हे एकपात्री कार्यक्रम त्यांनी केले आहेत.

पुरस्कार

  • कृषी प्रदर्शनात उत्कृष्ट क्रॉप शो पुरस्कार.
  • महाराष्ट्र सरकारचा २००७ सालचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार.
  • नकला या लोककलेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने २०११ सालचा लोककला पुरस्कार.