दिलीप अलोणे
डॉ. दिलीप व्यंकटेश अलोणे (जन्म - तोहोगाव जि. चंद्रपूर -हयात) हे ’लोकमान्य टिळक महाविद्यालय’, वणी (यवतमाळ जिल्हा) येथे प्राध्यापक आहेत. ते अमरावती विद्यापीठाच्या भाषा शाखेच्या अभ्यास मंडळाचे(बोर्ड ऑफ स्टडीज) २००७ सालापासून चेरमन आहेत. मार्च २०११पासून ते विद्यापीठाच्या विद्वत्सभेचे(ॲकॅडमिक काउन्सिलचे) सदस्य आहेत.
कारकीर्द
[संपादन]डॉ. दिलीप अलोणे हे जादूगार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. डॉ. दिलीप अलोणे हे विदर्भ कला परिषद, महाराष्ट्र नकलाकार संघ व वैदर्भीय जादूगार संघटनेचे अध्यक्ष होते (कोणत्या वर्षी ?). विदर्भ साहित्य संघाच्या ’युगवाणी’ या त्रैमासिकाच्या संपादक मंडळातही ते होते (कोणकोणत्या वर्षी ?).
’नव्वदोत्तरी मराठी कादंबरीतील ग्रामीण जीवनाचे वास्तव’ या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदी सरकारने त्यांची नेमणूक केली आहे.
’संपदा’ व ’सोनिया’ या अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या वाणांची निर्मिती प्रा. दिलीप अलोणे यांनी केली आहे.[ संदर्भ हवा ] कापूस, सोयाबीन, तूर, चणा यांच्या उत्पादन स्पर्धेत सर्वाधिक उत्पादनाचा प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
एकरी विक्रमी उत्पादन घेता घेता त्यांनी दोन नवी वाणेही विकसित केली आहेत. डोळ्यावर पट्टी बांधून बाइक चालविण्याचे धाडसी प्रयोग ते करतात. त्यांनी (२०१३सालपर्यंत) जादूचे ५००हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी तितक्याच कळकळीने ते झटतात.
कमवा आणि शिका, कचऱ्यातून कला असे विविध उपक्रम लोणे यांनी राबविले आहेत (केव्हा आणि कोठे?). टिळक कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजनाही त्यांनी सुरू केली होती. (केव्हा आणि कोठे?)
इतके हरहुन्नरी आणि धाडसी असून विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याच्या मूळ उद्दिष्टापासून प्रा. अलोणे ढळलेले नाहीत.[ संदर्भ हवा ]
खासगी जीवन
[संपादन]प्रा. दिलीप अलोणे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव देवयानी आहे.
व्यक्तिमत्त्व
[संपादन]धडपड्या स्वभाव आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व लाभलेले अलोणे यांचा सतत प्रयोगशील राहणे हा स्वभावगुण आहे.
नकलाकारी
[संपादन]नकलाकार म्हणून गेल्या चाळीस वर्षांच्या कालावधीत अलोणे यांनी २०१३ सालापर्यंत तीन हजारांहून अधिक नकलांचे कार्यक्रम केले आहेत. राज्यस्तरीय नकला महोत्सवाचे त्यांनी आयोजन केले होते. या लोकरंजनातून लोकप्रबोधनाच्या कार्यातील त्यांच्या "वेडा वृंदावन', "मावं लगन कवा होनार', "मला निवडून द्या', "पठ्ठे बापूराव' या नकला अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत.[ संदर्भ हवा ]
अभिव्यक्ती
[संपादन]- नियमित शेतीविषयक लेखन.
- शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर व विविध पिकांच्या उत्पादन वाढीसंदर्भात त्यांनी पाच चित्रफिती तयार केल्या आहेत.
- अशोक पवार यांचे ‘बिराड’ हे आत्मकथन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने प्रा. दिलीप अलोणे यांच्या कल्पनेतून ‘बिराड’ या लघु चित्रपटाची निर्मिती झाली आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन त्यांचेच आहे.
- शेतकरी आत्महत्यांच्या विषयावरील ’गर्भात मातीच्या दिस सोनियाचा’ या माहितीपटाची निर्मिती त्यांची आहे.
- ’जावे प्रेमाच्या गावा’, ’हसा आणि लठ्ठ व्हा’ हे एकपात्री कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
पुरस्कार
[संपादन]- कृषी प्रदर्शनात उत्कृष्ट क्रॉप शो पुरस्कार.
- महाराष्ट्र सरकारचा २००७ सालचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार.
- नकला या लोककलेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने २०११ सालचा लोककला पुरस्कार.