Jump to content

"प्रतिभा रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''डॉ. प्रतिभा रे''' (जन्म : ॲलाबोल-कटक जिल्हा, ओरिसा, दिनांक २१ जानेवा...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

२१:४३, १९ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

डॉ. प्रतिभा रे (जन्म : ॲलाबोल-कटक जिल्हा, ओरिसा, दिनांक २१ जानेवारी १९४३) या ओडिया भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांचे वडील पुरुषोत्तम दास गांधीवादी असल्याने डॉ. प्रतिभा रे यांच्या साहित्यावर त्या विचारसरणीची छाप आहे. घरात वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असलेल्या प्रतिभाताई वयाच्या नवव्या वर्षीच लिहू लागल्या. त्या एम.ए., एम.एड., आणि शिक्षणाच्या मानसशास्त्रात पीएच.डी. आहेत. ओरिसातील आदिवासी समाजातील गुन्हेगारीवर प्रतिभा रे यांनी संशोधन केले आहे.

डॉ. प्रतिभा रे याच्या १८ कादंबऱ्या, ३ प्रवासवर्णने, आणि २२ कथासंग्रह आहेत. त्यांच्या साहित्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्या ग्रामीण भागातही खूप विकल्या जातात.

प्रतिभा रे यांचे साहित्य

  • अपरिचिता (कादंबरी). या कादंबरीवर चित्रपट निघाला आहे.
  • बर्षा
  • बसंत बैशाख (१९७४)
  • यज्ञसेनी (कादंबरी)

पुरस्कार