प्रतिभा रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रतिभा राय
Pratiba Ray 2010.JPG
प्रतिभा राय
जन्म २१ जानेवारी, १९४३ (1943-01-21) (वय: ७७)
ओडिशा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा उडिया
साहित्य प्रकार काव्य, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती ‘शील पद्म’
‘जगयासेनी’
‘पुण्यतोय’
‘नीलतृष्णा’
‘भागाबनारा देश’
'सास्था सती'
पती अक्षयचंद्र राय
पुरस्कार पद्मश्री (इ.स. २००७)
साहित्य अकादमी (इ.स. २०००)
ज्ञानपीठ (इ.स. २०११)

डॉ. प्रतिभा रे (जन्म : ॲलाबोल-कटक जिल्हा, ओरिसा, दिनांक २१ जानेवारी १९४३) या ओडिया भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांचे वडील पुरुषोत्तम दास गांधीवादी असल्याने डॉ. प्रतिभा रे यांच्या साहित्यावर त्या विचारसरणीची छाप आहे. घरात वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असलेल्या प्रतिभाताई वयाच्या नवव्या वर्षीच लिहू लागल्या. त्या एम.ए., एम.एड., आणि शिक्षणाच्या मानसशास्त्रात पीएच.डी. आहेत. ओरिसातील आदिवासी समाजातील गुन्हेगारीवर प्रतिभा रे यांनी संशोधन केले आहे.

डॉ. प्रतिभा रे याच्या १८ कादंबऱ्या, ३ प्रवासवर्णने, आणि २२ कथासंग्रह आहेत. त्यांच्या साहित्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्या ग्रामीण भागातही खूप विकल्या जातात.

प्रतिभा रे यांचे साहित्य[संपादन]

  • अपरिचिता (कादंबरी). या कादंबरीवर चित्रपट निघाला आहे.
  • बर्षा
  • बसंत बैशाख (१९७४)
  • यज्ञसेनी (कादंबरी)

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]