"सुलोचना चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
|||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
३०. बाळा माझ्या कर अंगाई<br> |
३०. बाळा माझ्या कर अंगाई<br> |
||
३१. श्रीहरी गीत तुझे गाते<br> |
३१. श्रीहरी गीत तुझे गाते<br> |
||
==सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार== |
|||
* [[शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान]]चा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
||
<references/> |
<references/> |
१५:३४, १८ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
[ चित्र हवे ]
पुर्वाश्रमीच्या सुलोचना लाटकर,या चित्रपट अभिनेत्री आहेत.त्यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले.त्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आला.तो त्यांना दि.२६ जानेवारी २०१० रोजी देण्यात येणार आहे.[१]
एकापेक्षा एक सरस लावण्या आपल्या ठसकेबाज आवाजाने अजरामर करणाऱ्या "लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण" यांना नुकताच संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा "लता मंगेशकर" पुरस्कार (वर्ष २०१०साठी) जाहीर करण्यात आला. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन.
१७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचनाजींचा जन्म झाला. माहेरचे त्यांचे नाव होते सुलोचना कदम. मुंबईतील चाळ संस्कृतीत त्यांचे बालपण गेले. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातुन सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दु नाटकात बालभुमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहिण स्वतः कलाक्षेत्रात काम करत नसे पण त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायची आणि सुलोचनाजींनी उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. याच प्रोत्साहनातुन त्यांची गायिका होण्याची बीजे रोवली गेली. सुलोचनाजी यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय प्रशिक्षण मिळालेलं नव्हतं. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकुन ऐकुनच त्या गायनाचा रियाज करायच्या. आजच्या काळात नवोदित गायकांना अनेक सोयीसुविधा मिळतात, पण त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी हि कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची हि कला अधिक चिरकालीन टिकावी अशी निर्माण झाली आहे.
त्यावेळेस वत्सलाबाई कुंठेकर यांनी गायलेली "सांभाळ ग, सांभाळ ग, सांभाळ दौलत लाखाची" हि लावणी त्या वारंवार गुणगुणत असे आणि त्यासाठी आईकडुन त्यांनी भरपुर ओरडा हि खाल्ला होता. कारण त्यावेळेस मुलींनी लावणी ऐकु नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पण त्यांच्या आईला काय माहित होते की हिच मुलगी पुढे जाऊन "लावणीसम्राज्ञी" म्हणून नाव कमावणार आहे . मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी गायली ती आचार्य अत्रे यांच्या "हिच माझी लक्ष्मी" या चित्रपटात. संगीतकार होते वसंत देसाई आणि हि लावणी चित्रीत झाले होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचनाजींच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लावले. त्या लावणीचे शब्द होते "मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी..." . आचार्य अत्रे यांनीच त्यांना "लावणीसम्राज्ञी"असा किताब दिला.
१९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक होते "एस. चव्हाण". पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाजींचे लग्न झाले आणि सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. यादरम्यानच "रंगल्या रात्री अशा" या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलुन गेले. त्यातुनच खऱ्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. "मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटातुन त्यांनी लावणी आपल्या ठसकेबाज स्वरात सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातुन ठसका, खटका देण्याचे काम सुलोचनाजींइतक कुणीच उत्तम करू शकलेलं नाहीत. "पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहिजे" असे सुलोचनाजींचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावणीतुन येतोच.
लावणी गायनामध्ये नाव मिळवण्याआधी सुलोचनाजींनी विविध प्रकारची गाणी गायलेली होती. श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते, त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे पहिले गाणे गायले. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते "कृष्ण सुदामा". पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. फ्रॉकमध्ये आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जुन सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवानदादांच्या अनेक चित्रपटात पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत "सी. रामचंद्र" ("जो बिगड गयी वो किस्मत हु / नजर से नजर लड गयी जिगर में छूरी गड गयी हाय राम). पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करीयरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत "भोजपुरी रामायण" त्या गायल्या होत्या. मराठी व्यतिरीक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषेमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकार देखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकुन बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद सुलोचनाजींना दिली होती. सुलोचनाजींच्या आयुष्यातील आठवणींपैकी हि एक अतिशय महत्त्वाची आठवण. सुलोचनाजींचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकुन तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. असे अनेक सन्मानाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले आहेत. आपण सुलोचनाजींच्या लावण्या जेंव्हा ऐकत असतो त्यावेळेस संगीतातील त्यांची इतर मजल थोडी दुर्लक्षित होते.
पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार "मल्हारी मार्तंड" या चित्रपटासाठी त्यांना १९६५ साली मिळाला. त्यापलिकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेली गाणी आणि लावणी या प्रकाराला त्यांच्या गायनाने मिळवून दिलेली मान्यात आणि यामुळेच जनमानसांच्या ह्रदयात मिळालेले स्थान, त्यांचे केलेले कौतुक हा देखील एक सर्वोच्च पुरस्कार म्हणता येईल.
सुलोचना चव्हाण यांना उदंड आयुष्य लाभावे आणि असे अनेक पुरस्कार मिळावेत याच शुभेच्छांसहित पुन्हा एकदा "हार्दिक अभिनंदन!!!!"
त्यांची गाजलेली काही गाणी:
१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरूणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागलं कोल्हा
५. कळीदार कपूरी पानं, कोवळं छान, केशरी चुनाम रंगला काथकेवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष
९. मी बया पडली भिडंची, गाव हे हाय टग्याच
१०. मल्हारी देव मल्हारी
११. नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी
१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालु नवा
१३. गोरा चंद्र डागला
१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना
१५. पावना पुण्याचा आलाय गं
१६. रात्र श्रावणी आज राजसा पाऊस पडतोय भारी, पाखरू पिरतीच लाजुन बसलंय उरी
१७. आई चिडली, बाबा चिडला, काय करू तुझ्यावर माझा जीव जडला
१८. दर रात सुखाची नवसाची, मज झोपच येते दिवसाची
१९. हिरीला इंजिन बसवा
२०. कुठवर पाहु वाट सख्याची, माथ्यावर चंद्र की ग ढळला, अन् येण्याच वखत की ग टळला
२१. दाटु लागली उरात चोळी कुठवर आता जपायचं, औंदा लगीन करायचं
२२. अगं कारभारनी, करतो मनधरनी (सोबत जयवंत कुलकर्णी)
२३. करी दिवसाची रात माझी
२४. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं
२५. जागी हो जानकी
२६. बाई मी मुलखाची लाजरी
२७. राजसा घ्या गोविंद विडा
२८. लई लई लबाड दिसतोय ग
२९. घ्यावा नुसताच बघुन मुखडा
३०. बाळा माझ्या कर अंगाई
३१. श्रीहरी गीत तुझे गाते
सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार
- शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार